हल्ली सगळ्यांचे आयुष्य सोशल मीडिया झालेले आहे. काहीही झाले तरी देखील खूप जण त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर टाकत असतात. सोशल मीडियाशी कनेक्ट राहण्यात काहीच वाईट नाही. उलट जगासोबत आपणही पुढे जायला हवे. पण असे करताना खूप जण अशा काही चुका करतात त्याचे रुपांतर काही मोठ्या चुकांमध्ये नक्कीच होऊ शकते. ज्यांना सोशल मीडिया वापरायची संपूर्ण माहिती आहे. ज्यांना यातले सगळे कळते त्यांचीही या माध्यमातून फसवणूक झालेले अनेक किस्से आहेत. अशी फसवणूक टाळायची असेल तर सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी तुम्ही अजिबात शेअर करु नयेत हे माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया सोशल मीडियावर काय शेेअर करु नये या गोष्टी माहीत हव्यात.
पैसाअडका
खूप जणांना आपण कुठे राहतो किती श्रीमंत आहोत याचे प्रदर्शन करायला फार आवडते. पण सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म त्यासाठी नाही. काही गोष्टी ज्यावेळी तुम्ही शेअर करता त्यावेळी तुमच्याकडे अनेकांच्या नजरा वळतात.वाईट प्रवृत्तीच्या लोकांना त्यातून काही फायदा मिळेल का? त्यातून काही कमावता येईल का? याकडे अधिक लक्ष असते. तुम्ही राहते ठिकाण, तुमचे घर दाखवले तर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतात.
उदा. अनेकदा तुम्ही साध्या दुकानात जरा भाव केला तरी विकणारी व्यक्ती तुमच्या त्या राहणीमानावरुन तुमच्याशी हुज्जत घालू शकते. एवढं असून तुम्ही देऊ शकत नाही असे होऊन जाते.
त्यामुळे पैसा अडका, घर, श्रीमंती याचे प्रदर्शन करु नका.
कुटुंबाची ओळख
सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायला तुम्हाला आवडत असेल ही चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही कुटुंबातील व्यक्तींची ओळख करुन देऊ नका. जरी तुमचे अकाऊंट कोणी पाहात नाही असे वाटत असले तरी देखील काही जणांची नजर असते. तुम्ही क्रिएट करत असलेला कंटेट ॲडल्ट अशा गटात मोडणारा असेल तर ही चूक अजिबात करु नका. कुटुंबाची ओळक करुन दिल्यामुळे नाहक तुमच्या कुटुंबावर त्याचा ताण येतो. काही वेळा कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याचा वाईट अनुभव येऊ शकतो.
उदा. कुटुंबात पती, मुलगा यांची ओळख शक्यतो टाळा. जर करुन देणार असाल तर किती माहिती शेअर करणार आहात ते डोक्यात असू द्या.
रिलेशनशीपचा अतिरेक
खूप जण सोशल मीडियावर रिलेशनशीपचा अतिरेक करतात. प्रेम दाखवणे गुन्हा नाही. पण तुमचा जर काही भूतकाळ असेल तर अशावेळी काही गोष्टी करताना थोडे सावध राहा. कारण या गोष्टीमुळे तुमच्या भूतकाळातील व्यक्तीला उगागच नको ते करण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे रिलेशनशीपचा फार अतिरेक करु नका. मोजक्या पोस्ट शेअर करणे ठीक. पण काही जण हल्ली व्हिडिओही पोस्ट करतात. पण त्यामुळे तुमच्या काही खासगी गोष्टी लोकांना कळतात. लोकांना त्यात रस निर्माण होतो. मग याचा परिणाम वाईट कमेंट्सवर होतो. या कमेंट्स सहन झाल्या नाहीत की, मग काहीतरी रिप्लाय देऊन वाद उद्भवण्यापेक्षा या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या नाही का!
सोशल मीडिया हा आपल्याचसाठी आहे. पण त्याचा उपयोग कसा करायचा आणि काय शेअर करायचे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे थोडे जपून शेअरिंग करा.