ADVERTISEMENT
home / लग्नसराई
लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला येते माहेराच्या ‘या’ गोष्टींची आठवण

लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला येते माहेराच्या ‘या’ गोष्टींची आठवण

लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात खास असते. लग्नानंतर तुमच्या संसाराला सुरूवात होते. लग्नानंतरचा काळ हा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा, आनंदात जगण्याचा, नवी स्वप्न पाहण्याचा असतो. लग्नानंतर स्त्री आणि पुरूष दोघांचे आयुष्य बदलत असते. मात्र लग्नानंतरच्या आयुष्याचा परिणाम सर्वात जास्त स्त्रीवर झालेला जाणवतो. ती तिचे आईवडील, लहानपणापासूनच्या गोड आठवणी, माहेर सोडून सासरी येते. आजकाल सासर आणि माहेर यामध्ये फार फरक नसला तरी लग्नानंतर प्रत्येकीला माहेरच्या काही गोष्टी आठवतातच. 

लग्नानंतर नववधूला आठवतात या खास माहेरच्या गोष्टी

लग्नानंतर माहेरची आठवण येणं स्वाभाविक आहे. पण लग्नानंतर अनेक वर्षांनीदेखील तुम्हाला माहेरच्या या गोष्टी आठवू शकतात.

आईच्या हातचं

आईच्या हातच्या जेवणाची  किंमत तुम्हाला आईपासून दूर गेल्याशिवाय नक्कीच कळत नाही. लहानपणापासून तुम्ही जिच्या हातची चव चाखली असते ती तुम्हाला सासरी नक्कीच मिळत नाही. सासरचे जेवण कितीही चांगले अथवा पंचपक्कान्नाचे असो तुम्हाला तुमच्याय आईच्या  हातचा साधा वरणभात मिळावा असं सतत वाटत राहतं. नव्या घरात अॅडजस्ट होताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे खाण्या-पिण्याची ऑर्डर नाही देऊ शकत. मात्र आईकडे मात्र कितीही चांगलं जेवण असलं तरी तुम्हाला हवा तो पदार्थ हव्या तशा पद्धतीने तुम्ही हट्टाने आईकडून घेऊ शकता. लहानपणीपासूनची ही खाण्यापिण्याची सवय तुम्हाला लगेच तोडणं कठीण जात आणि सतत माहेरची आठवण येत राहते. 

तुमची रूम

लग्नानंतर तुमची खास खोली असू शकते. मात्र ती तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शेअर करावी लागते. खोलीमधील वॉर्डरोब, बाथरूम  आणि इतर वस्तूंवर नेहमीच त्याचा पहिला हक्क असतो. कारण त्याच्या खोलीत आता तुम्ही आलेला आहात. त्यामुळे लग्नानंतर काही दिवस तरी तुम्हाला तुमची खोली, तुमच्या वस्तू सतत आठवत राहतात. एकदा संसारात रमल्यावर मात्र ती खोली सर्वस्वी तुमची होते. त्या रूमवर अथवा घरावर तुमचा हक्क निर्माण होतो. मात्र तो हक्क निर्माण होईपर्यंत तुम्हाला तुमच्या माहेरच्या  रूम आणि वस्तूंची आठवण येणं स्वाभाविक आहे. 

ADVERTISEMENT

भावंडांसोबत भांडण

बहीण भाऊ असो वा बहीण बहीण असो तुमचे  तुमच्या भावंडांसोबत एक वेगळंच बॉडिंग असतं. माहेरी असताना  तुम्ही बराच काळ त्यांच्यासोबत भांडण्यात घालवला असेल. मात्र आता लग्नानंतर तुमचं नातं अचानक बदलू लागतं. तुम्ही स्वतःच्या भावंडांसोबत नॉर्मल आणि फॉर्मल वागू लागता. लग्नानंतर तुम्हालादेखील भावंडांकडून आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळू लागते. तुम्ही सासरी असो वा माहेरी तुमची भावंडे तुमच्यासोबत पूर्वीसारखी वागत नाहीत अथवा भांडत नाहीत. त्यामुळे तुम्ही लग्नानंतर भावंडासोबत भांडणे नक्कीच मिस करू शकता. 

साखर झोप

माहेरी असताना दुपारपर्यंत अंथरूणात लोळत पडणारी मुलगी सासरी गेल्यावर मात्र वेळेत उठून स्वतःची आणि घरातील कामे आटपू लागते. हा बदल प्रत्येक स्त्रीमध्ये आपोआप होतो. मग ती स्वतंत्र कुटुंबात असो वा एकत्र कुटुंबात. लग्नानंतर ती तिच्या घरातील जबाबदाऱ्या लीलला पेलू लागते. मात्र या  सर्वात तिची सकाळची ती साखर झोप मात्र कुठेतरी हरवून बसते. त्यामुळे लग्नानंतर तुम्ही तुमची माहेरची साखर झोप नक्कीच मिस करू शकता.

तुमचा बेड आणि पांघरूण

लग्नानंतर नव्या घरी गेल्यावर सर्वच काही नवे असतं. नवीन घर, नवीन बेडरूम, नवीन बेड आणि नवीन पांघरूण… त्यामुळे लग्नानंतर वर्षानूवर्षे तुम्ही वापरत असतेला बेड  आणि पांघरूण तुम्हाला माहेरी सोडून द्यावं लागतं. बऱ्यादचा जागा बदलण्यामुळे, बेडरूम, बेड आणि पांघरूण बदलण्यामुळे तुम्हाला शांत निवांत झोप येत नाही. त्यामुळे काही दिवस तुम्हाला तुमच्या घरात अॅडजस्ट होण्यासाठी लागू शकतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

साखरपुड्यात करता येतील अशा क्युट हेअरस्टाईल

लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Thane)

लग्नाच्या शुभेच्छा, वधूवरांना द्या असे आशिर्वाद (Marriage Wishes In Marathi)

ADVERTISEMENT
08 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT