भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोना धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यासाठी सर्वच स्तरावर योग्य ती काळजी घेतल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी फिरणं यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अनेक कंपन्यानी सुरक्षेसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या घरात अक्षरशः कोंडले गेले आहेत. मात्र या काळात गृहनिर्माण सोसायटीजमध्येही काही नियम पाळले गेले पाहिजेत ज्यामुळे लोक त्यांच्या घरातदेखील सुरक्षित राहू शकतील.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीने कोणते नियम पाळावे
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात न घाबरता आपल्या घरात राहणं हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये काही गोष्टींची दक्षता घेतल्यास कोरोनाचं संकट नक्कीच कमी होऊ शकतं.यासाठीच याबाबत सोसायटीमध्ये जागरुकता निर्माण करायला हवी. याशिवाय सोसायटीने कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करायला हवी.
- कोरोना झालेल्या कुटुंबाला बहिष्कृत न करता त्यांच्यासाठी औषधे, अन्न, पाणी, फळं, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्था पूरवावी.
- या सर्व गोष्टी पूरवताना कोरोना ग्रस्तांच्या घराच्या दरवाज्या बाहेर त्या वस्तू ठेवाव्या त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू नये.
- आयसोलेशन करणं हा शारीरीक अंतर ठेवण्याचा फक्त एक मार्ग आहे. मात्र अशा लोकांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत तुम्ही फोन अथवा व्हिडिओ कॉल करून संपर्क साधू शकता.
- शिवाय एखाद्या घरात कोरोनाचे संक्रमण झाले असेल तर त्याबद्दल इतर कुटुंबाना लगेच व्हॉट्सग्रुपवर माहिती द्यावी. ज्यामुळे इतर कुटुंबांना योग्य ती काळजी घेता येईल.
- सोसायटीमधील लिफ्ट, पार्क, पायऱ्या, कोरोनाग्रस्त राहत असलेला फ्लोअर आणि इतर सार्वजनिक ठिकाणे वेळच्या वेळी सॅनिटाईझ करून घ्यावे.
- लॉकडाऊनच्या काळात सोसायटीमधील पार्क, जिम, खेळण्याची मैदाने, क्लब हाऊस बंद ठेवावे.
- सोसायटीच्या मुख्य द्वाराजवळ सॅनिटाईझर आणि सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी.
- सोसायटीमध्ये व्यवस्था करणाऱ्या सफाई कामगारांना योग्य त्या सूचना द्याव्या. ज्यामुळे सफाई कामगार संक्रमित होणार नाहीत.
- सोसायटीमध्ये कोणत्याही कारणांसाठी लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध असावेत.
- सोसायटीमध्ये येणारे मदतनीस, लॉन्ड्री बॉयज, सिक्युरिटी गार्डस, ग्रोसरी वेंडर, न्यूजपेपर वेंडर आणि व्हिजिटर्स यांना सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक असावे.
- सिक्युरिटी गार्डच्या परवानगीशिवाय सोयायटीमध्ये कोणतीही बाहेरची व्यक्ती येण्यास बंदी असावी.
pexels
कोरोना झालेल्या व्यक्तीच्या घरातील लोकांनी काय काळजी घ्यावी –
जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती संक्रमित झाली असेल तर योग्य ती काळजी घेतल्यास इतरांना संक्रमण होणे टाळता येऊ शकते.
- कोरोनाची लक्षणे आढलल्यास संपूर्ण परिवार आण त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची त्वरित कोरोनाची चाचणी करून घेणे.
- कोरोनाग्रस्त लोकांना योग्य ते वैद्यकीय उपचार देणे.
- कोरोनाची लक्षणे कमी प्रमाणात असतील तर त्वरीत स्वतःला आयसोलेट करून घेणे.
- कोरोनाची लागण झालेल्या लोकांनी स्वतःच्या वस्तू जसं की, कपडे, प्लेट, चमचे स्वतःच स्वच्छ कराव्या ज्यामुळे कुटुंबातील इतरांना कोरोनाचा धोका कमी होतो.
- कोरोनाची लागण झाल्याचे सोसायटीमध्ये त्वरीत कळवणे. ज्यामुळे सोसायटीमधील इतरांना योग्य ती काळजी घेता येईल.
- तुमच्या रूममध्ये सॅनिटाईझर, ग्लोव्ज, पीपीई किट, साबण, टॉवेल, कपडे, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, औषधे, गरम पाण्याची किटली, वाफ घेण्याचे मशीन अशा गोष्टींची तरतूद घरच्यांना करण्यास सांगणे
- आहार आणि औषधे घेण्याचा कंटाळा न करणे
- सतत वैद्यकीय सल्ला घेणे आणि त्रासदायक परिस्थिती असल्यास रूग्णालयात जाणे
- या गोष्टी नीट पालन केल्यास १४ दिवसांमध्ये तुमची कोरोनामधून सुखरूप सुटका होऊ शकते.
- शिवाय योग्य ती काळजी घेतल्यामुळे इतरांना तुमच्यामुळे कोरोनाची लागण होणे टाळता येऊ शकते.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स
कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा