घर नीटनेटके ठेवायला अनेकांना आवडते. खरंतरं ही सवय सगळ्यांनाच असायला हवी. ज्या ठिकाणी आपण सामान ठेवतो तो वॉर्डरोबदेखील स्वच्छ, नीटनेटका आणि ऑर्गनाईज असायला हवा. काही जणांना ते शक्य होत नाही. कितीही मोठी जागा असली तरी देखील त्यांचे सामान त्यामध्ये काहीही केल्या नीट बसत नाही.त्यातच आपण कपाटात अशा काही वस्तू ठेवतो ते ठेवण्याची आपल्याला काहीही गरज नसते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या कपाटात चुकूनही ठेवायला नकोत त्या जाणून घेऊया. यामागे केवळ शास्त्र नाही तर त्या खराब होण्याचीही शक्यता असते.
खाण्याचे पदार्थ
खूप जणांना कपाटात खाण्याचे पदार्थ ठेवायची सवय असते. खाण्याचे पदार्थ ठेवत असाल तर तुम्ही ते आताच कपाटात काढून टाका.कपाटात खाण्याचे पदार्थ न ठेवण्यामागे कारण असे की, कपाटात कोंदट असे वातावरण असते. त्यात हवा जाण्यास अजिबात जागा नसते. त्यामुळे अशा गोष्टी खराब होण्याची शक्यता असते. सुका मेवा, चॉकलेट किंवा काही तिखट पदार्थ असे अजिबात कपाटात ठेवू नका.
टोकदार गोष्टी
खूप जणांना रात्री अपरात्री काहीही खाण्याची इच्छा होते अशावेळी एखादं फळ कापून खाऊ या विचाराने खूप जण सुरी किंवा टोकदार गोष्टी या कपाटात ठेवून देतात. असं म्हणतात की, एखादे हत्यारं कपााटात अथवा जवळ ठेवू नये. ते हत्यार असले तरी देखील त्याला भावना असतात. टोकदार वस्तू या इजा पोहाचवण्यासाठी असतात. अशा गोष्टी नात्यांमध्ये दुरावा आणू शकतात. कपाट हे शक्यतो आपण आपल्या घराच्या आतल्या खोलीत किंवा जिथे झोपतो तिथे ठेवतो. त्यामुळे इतर काही समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.
तुटलेल्या दुभंगलेल्या वस्तू
काही वस्तू आपण कधीही वापरणार नसतो. पण कोणीतरी त्या दिलेल्या असतात. त्यांच्याप्रती आपल्या काही भावना असतात. त्यामुळे त्या टाकल्या जात नाहीत. पण तुटलेल्या आणि दुभंगलेल्या अशा काही गोष्टी तुमच्याकडे राहून गेल्या असतील. तर त्या काढून टाका. कपाटातील जागा अडवण्यासोबत ते तुमच्या कपाटात नकारात्मक उर्जादेखील निर्माण करतात. त्यामुळे तुम्ही कपाटात अशा वस्तू अजिबात ठेवू नका.
जुने खराब फोटो
खूप जणांच्या कपाटात जुने आणि खराब असे फोटो असतात. त्यांचा तुमच्याशी काहीही संबंध नसेल तर असे फोटो काढून टाका. जुनी बील, जुने बाद झालेले कागद हे अडगळ निर्माण करतात. शिवाय नकारात्मक उर्जादेखील निर्माण करतात. खूप जणांच्या कपाटात नाहक बीलाचे बंडल किंवा साठवलेली रद्दी असते. आज बघू, उद्या बघू असे करुन ती वर्षानुवर्षे साठून राहते. तुमच्याकडेही अशीच रद्दी साठवून राहात असेल तर तुम्हावा वेळ काढून ते कपाट रिकामी करण्याची गरज आहे. कपाटात असलेल्या या गोष्टीमुळे उंदरांचा सुळसुळाट होऊ शकतो. त्याने देखील एक प्रकारची मरगळ घरात जाणवते .
आता तुमच्या वॉर्डरोबमध्ये अजिबात ठेवू नका या गोष्टी. ज्यांना कपाट आवरण्याची गरज आहे त्यांनामध्ये नक्की टॅग करा.