ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
CoronaVirus : घरात असावी या वस्तूंची तरतूद

CoronaVirus : घरात असावी या वस्तूंची तरतूद

कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. चीन, डेन्मार्क, अल साल्वाडोर, फ्रान्स, आर्यलंड, इटली, न्यूझीलंड, पोलंड आणि स्पेनमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. ही एक अशी आणीबाणीची स्थिती असते ज्यामध्ये लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. ही परिस्थिती आज महाराष्ट्रावर ओढवली आहे. त्यामुळे आपण ही या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार असायला हवं. लॉकडाऊनच्या या काळात तुमच्या कुटुंबाला खाण्यापिण्याच्या गोष्टीबाबतही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. जाणून घ्या कसं करता येईल लॉकडाऊनमध्ये किचनचं प्लॅनिंग.

Shutterstock

  • धान्य आणि कडधान्याची तरतूद

लॉकडाऊनच्या काळात हिरव्या भाज्या कितपत उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे घरात कडधान्य आणि धान्य मुबलक प्रमाणात आणा. रोजच्या भाज्यांना पर्याय म्हणून मूग, मटकी ही कडधान्य आणि धान्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरी हे चांगले पर्याय आहेत. जे तुम्ही घरात आवश्यक प्रमाणात भरू शकता. फक्त हे अन्नधान्य घरी आणल्यावर ते व्यवस्थित पॅक करून ठेवा. 

ADVERTISEMENT
  • भाज्यांमधील पर्याय

न टिकणाऱ्या भाज्यांऐवजी तुम्ही रताळ, गाजर किंवा बटाटे या भाज्यांना प्राधान्य द्या. या रोजच्या आहारात समाविष्ट करा. या भाज्यांमुळे तुम्हाला फायबर मिळेल. या भाज्या फ्रिजमध्येही बरेच दिवस राहतील. पण त्या फ्रिजमध्ये ठेवण्याआधी स्वच्छ धुवून ठेवा. 

  • सुकामेवा 

सुकामेवा बऱ्याच काळापर्यंत टिकतो आणि खराबही होत नाही. वर्क फ्रॉम होम करता करता तुम्ही स्नॅक्स म्हणून सुकामेवा खाऊ शकता. त्यामुळे सुकामेवा नक्की घ्या. हा सुकामेवा फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये स्टोर केल्यास उत्तम आहे. 

  • फळं 

लॉकडाऊनमध्ये केळ, सफरचंद, संत्र, द्राक्ष आणि पीच ही फळं खाणं चांगलं ठरेल. पण तुम्हाला केळी फ्रिजमध्ये ठेवता येणार नाहीत. पण सफरचंद तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. 

  • अंडी 

भूक लागल्यावर अंडी खाणं हा प्रोटीन देणारा चांगला स्त्रोत आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडल्यास अंड्याचं कार्टन घ्या. अंडी सामान्य तापमान आणि फ्रिजमध्ये दोन्ही प्रकारे ठेवू शकता. 

ADVERTISEMENT
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

खरंतर दूधाची तरतूद करण्याची गरज भासणार नाही. कारण सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये दूध आणि औषधांची दुकानं सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे दूध जास्त आणायची गरज नाही. जर तुम्हाला खाली न उतरता घरपोच दूध हवं असल्यास तुम्ही सुपरडेलीसारख्या एपचा वापर करू शकता. ज्यावर अजूनही दूध घरपोच दिलं जात आहे. जर तुमच्या सोसायटीत डेलिव्हरी बॉयला यायची परवानगी नसल्यास ते गेटवर दूध ठेवून जाऊ शकतात. दूधाऐवजी तुम्ही पर्याय म्हणून दुधाची पावडर किंवा टेट्रापॅक दूध आणून ठेवू शकता. 

  • रेडी टू ईट पदार्थ आणि सुका खाऊ

बाजारात रेडी टू ईट सूप्स आणि पदार्थ मिळतात. त्यांचाही पर्याय तुम्ही घरात आणून ठेवा. तसाच सुका खाऊही आणून ठेवल्यास मधल्या वेळेत खाण्याचा प्रश्न सुटेल.

वाचा – विज्ञानावर आधारीत चित्रपट

लक्षात घ्या लॉकडाऊन असलं तरी घरात भारंभार सामान आणून ठेवू नका. कोणत्याही वस्तू जास्त प्रमाणात तुम्ही घरात आणून ठेवल्यास त्या खराब होण्याचीही भीती आहेच. गरज असल्यास घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त वेळ घरातच राहा. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

24 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT