कामाचे टेन्शन, जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे हल्ली खूप जणांचे मन शांतच नसते. सतत काहीना काही मनात सुरु असते. बरेचदा अशांत मन हे प्रगतीस बाधक ठरते. याशिवाय अनेक गोष्टी बिघाडण्यासाठी कारणीभूत देखील ठरते. मन शांत असेल तर अनेक गोष्टी अगदी सहज होऊ शकतात. तुम्हालाही सतत अस्वस्थ असल्यासारखे वाटत असेल किंवा आपली काम होत नाही असे होत असेल तर मन शांत ठेवण्यासाठी काही सवयी तुम्ही नक्कीच लावून घ्यायला हव्यात. या अशा सवयी नक्कीच तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतील.
जाणून घ्या काय आहे अग्नी मुद्रा आणि त्याचे फायदे
दोन मिनिटं डोळे बंद करुन पडा
काम करुन घरी आल्यानंतर तुम्ही दोन मिनिटांची विश्रांती घेणे गरजेचे असते. त्यामुळे घरी आल्यानंतर कपडे बदलून सगळ्यात आधी बेडवर पहुडा. त्यामुळे दिवसभराचा आणि प्रवासाचा आलेला क्षीण कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. ज्याप्रमाणे आपण शवासन करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हात पाय सैल सोडून डोळे बंद करुन तुम्हाला थोडासा आराम मिळतो. अशावेळी दिवसभरात घडलेल्या काही गोष्टी आठवतात. त्यावर आपली चूक असेल तर ती शांतपणे कळण्यासही मदत होते. त्यामुळे घरी थकून आल्यानंतर किंवा घरातच असताना थोडी काम केल्यानंतर थोड्यावेळासाठी तुम्ही निवांत राहा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
आंघोळीला जा
शरीर फ्रेश करण्यासाठी आपण रोज आंघोळ करतो. आंघोळ केल्यामुळे शरीराचा मळ जातो. पण कधी कधी खूप थकवा आला असेल आणि मनात ना ना प्रश्नांचा गोंधळ असेल तर अशावेळी तुम्ही थेट आंघोळीला जा. गरम किंवा थंड कोणत्याही पाण्याची आंघोळ केल्यामुळे मन शांत होते. एकदम फ्रेश वाटते. कधी कधी आपल्याला आपल्याच चुका कळत नसतात. किंवा एखाद्याशी मनभेद झाल्यानंतर ते मनभेद कसे मिटवावेत हे कळत नसतात. जर तुम्ही आंघोळ करताना थंड डोक्याने याचा विचार केला तर तुम्हाला नक्की फायदा डोक्यातून विचारांचा गोंधळ काढायला मदत मिळेल.
धावायला जा
जर तुमच्या मनात खूप विचारांचा गोंधळ झाला असेल तर कानात हेडफोन्स घालून मस्त लांब धावायला जा. धावताना आपण बरीच एनर्जी खर्च करतो. ही एनर्जी खर्च केल्यामुळे मनातून अनेक वाईट विचार बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यामुळे शक्य असेल तेवढ्या मोकळ्या वातावरणात तुम्ही मस्त धावायला जा. मनातून अनेक गोष्टी एकांतात बाहेर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे शक्य असेल तर धावा आणि हातापायांना शक्य नसेल तर किमान चालायला तरी जा. तुम्हाला तुमच्यामध्ये नक्की फरक झालेला जाणवेल.
आवडत्या पेयाचा घ्या घोट
कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टीने देखील आपल्या मनाला समाधान मिळत असते. चहाचा किंवा कॉफीचा घोट ही आपल्यासाठी स्ट्रेस बस्टर असू शकतो. त्यामुळे घरात आल्यानंतर किंवा एखाद्या आवडीच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन तुम्ही मस्त चहा किंवा कॉफीचा घोट घ्या आणि बघा तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. कॉफी पिण्याचे फायदे अनेक आहेत. खूप जणांना कॉफी आणि चहामुळे एक वेगळी किक मिळते. एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही असे काहीतरी करा.
मन शांत ठेवण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की करा.
अधिक वाचा
या कारणासाठी प्रत्येकाने करायला हवं गार्डनिंग, आरोग्य राहते ठणठणीत
बायपोलर डिसऑर्डर – एक मानसिक विकार (Bipolar Disorder In Marathi)