ADVERTISEMENT
home / Budget Trips
रिसॉर्टला जाताना या गोष्टी ठेवा लक्षात मग करा बुकिंग

रिसॉर्टला जाताना या गोष्टी ठेवा लक्षात मग करा बुकिंग

नोव्हेंबर- डिसेंबर महिना आला की, वीकेंड पिकनिकचे वेध लागतात. मुंबईपासून जवळ मस्त मजा मस्ती करता येईल अशा ठिकाणी जाण्यासाठी लोकं गुगल करु लागतात. लोकांना सगळ्यात जास्त आवडते ते म्हणजे रिसॉर्ट. थंडीचा महिना असला तरी मस्त पाण्यात डुंबून मजा करण्याचा आनंद सगळ्यांनाच लुटायचा असतो. म्हणूनच रिसॉर्टला सर्वाधिक पसंती दिली जाते. पण कधी कधी नुसत्या फोटोंवरुन बुकिंग करणे हे भारी पडते. मनात वेगळी तयार करत आपण ज्यावेळी त्या रिसॉर्टला पोहोचतो त्यावेळी आपण इथे का आलो असे अनेकांना वाटू लागते. त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही रिसॉर्टच बुकिंग करत असाल तर त्यापूर्वी या गोष्टींचाही विचार करा

भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi)

बुकिंग कोणासाठी?

फोटो प्रातिनिधीक

Instagram

ADVERTISEMENT

कोणत्याही रिसॉर्टचे बुकिंग हे केवळ रेटवर अवलंबून नसते तर तुम्ही कोणाला सोबत घेऊन जाणार आहात त्यावर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही मित्रांचा ग्रुप- फॅमिली किंवा कपल असे जाणार असाल तर तुम्हाला त्यानुसार सोयी पाहाव्या लागतात. मित्रमैत्रिणींचा ग्रुप ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी मजा हे एकमेव उद्दिष्ट असते अशावेळी रिसॉर्टमध्ये काही सोयी नसल्या तरी चालतील. पण कुटुंबाला किंवा कपलने बाहेर जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.  कुटुंब/ कपल किंवा महिलांची पिकनिक असेल तर तेथील रुम्स, कपडे बदलण्याची सोय अशा काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कारण या गोष्टी आधीच पाहून घेणे गरजेचे असते. 

जेवणाची सोय

Instagram

रिसॉर्ट बुक करताना तुम्ही जेवणाची सोय कशी आहे ते देखील पाहायला विसरु नका. कारण जेवणावरच सगळा दिवस कसा जाणार ते ठरते. त्यामुळे व्हेज- नॉनव्हेज अशा जेवणाची सोय कशी केली जाते. त्याचे सर्व्हिंग, वेळा हे सगळं जाणून घ्या. शिवाय त्या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या काही खास गोष्टी बनवून दिल्या जातील का ते पाहा. कुटुंबासोबत फिरताना कधीकधी घरातील काही लोकांना विशेषत: लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना काही खास जेवणाची गरज असते. त्यामुळे त्या सगळ्या सोयी आहेत का पाहा.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ही 10 ठिकाणं आहेत अजून अज्ञात पण अविस्मरणीय- Offbeat Places In Maharashtra

पार्टी प्लेस की आरामाची जागा

रिसॉर्ट हे मजा मस्ती करण्यासाठी असते. पण काही ठिकाणी इतका धिंगाणा असतो की, अनेकांना या गोष्टी आवडत नाही. रिसॉर्टमध्ये जाऊन फक्त मजा- मस्ती आणि आराम करण्याची इच्छा असते. त्यामुळे तिथे कोणत्या प्रकारचा क्राऊड येतो ते जाणून घ्या. काही ठिकाणी केवळ पार्टी या होत असतात. त्यामुळे दारु किंवा डीजेचा धिंगाणा असतो. त्यामुळे तुम्ही आधीच चौकशी करुन घ्या. कारण तिथे गेल्यानंतर तुमच्या आनंदावर विरजण पडायला नको.

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही…मग तुम्ही कधी जाताय?

रुम्स आहेत कशा?

रुम्सही नीट पाहा

ADVERTISEMENT

Instagram

 जर तुम्ही राहणार असाल तर प्रत्येकाच्या रुम्सच्या कल्पना अगदी फिक्स असतात. काहींना राहायला एकदम लक्झरी रुम्स हव्या असतात.  त्यामुळे राहण्यासाठी रुम्स योग्य आहेत की नाही ते देखील पाहा. कारण जर रुम्स चांगले नसतील तर असे ठिकाण तुम्हाला मुळीच आवडणार नाही. त्यामुळे गुगल करताना तेथील हॉटेलपेक्षाही लोकांनी टाकलेले फोटो पाहा आणि मगच ते ठिकाण निवडा. 

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही रिसॉर्टचे बुकिंग करा अन्यथा तुम्ही केलेला प्लॅन चांगला होणार नाही.

03 Nov 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT