ADVERTISEMENT
home / आपलं जग
लहान मुलांचे कपडे खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

लहान मुलांचे कपडे खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

आईवडिलांना आपली लहान मुलं नेहमीच आकर्षक आणि गोंडस दिसावी असं वाटत असतं. ज्यामुळे लहान मुलांसाठी आकर्षक, पार्टीवेअर कपडे जास्त खरेदी केले जातात. आजकाल ट्विनिंग करण्याची पद्धत असल्यामुळे आई अथवा बाबाच्या कपड्यांसोबत मॅच होणारे अथवा एकसमान कपडे मुलांसाठी खरेदी केले जातात. तुम्ही मुलांसाठी हवे तसे कपडे खरेदी करू शकता. मात्र त्यांच्या आरोग्यासाठी कपडे आरामदायक आहेत का हे मात्र जरूर तपासा, कारण बऱ्याचदा असे कपडो घातल्यावर मुलं चिडतात आणि रडू लागतात. यासाठीच लहान मुलांचे कपडे खरेदी करताना पालकांना या गोष्टी माहीत हव्या.

फॅब्रिक

बाहेर गेल्यावर लहान मुलं तेव्हाच शांत आणि आनंदी राहतात जेव्हा त्यांनी आरामदायक कपडे घालते असतात. मात्र पालकांना मुलांनी आकर्षक दिसावं याची जास्त हौस असते. त्यामुळे ते आपल्या मुलांसाठी परीसारखे दिसणारे, जास्त लेअरचे अथवा  क्यूट कपडे खरेदी करतात. असे कपडे घातल्यावर मुलं खूप छान दिसतात. मात्र काही क्षणात त्यांना अशा कपड्यांचा त्रास होऊ लागतो आणि ती चिडून रडारड करतात. यासाठीच कोणताही ड्रेस खरेदी करताना त्याचं कापड तपासा. तुमच्या बाळाच्या ड्रेसचं फॅब्रिक आरामदायक नसेल तर काहीच फायदा नाही. लहान मुलांना नेहमी सूती, मऊ कपडे आवडतात. 

साईज

लहान मुलं पाहता पाहता मोठी होतात. लहान मुलांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे तुमच्या लहान मुलांसाठी योग्य साईझचे कपडे खरेदी करणं तुमच्यासाठी कठीण आणि वेळ काढणारं ठरू शकतं. कारण जर तुमच्या मुलांना कपडे व्यवस्थित आले नाहीतर तर ते बदलावे लागतात. सध्याच्या वातावरणात कपडे एक्सेंज करणं फार कठीण काम आहे. यासाठी निवडतानाच त्यांची योग्य साईझ पाहून कपडे खरेदी करा. एक साईझ मोठे कपडे घेणं नक्कीच फायद्याचं ठरेल. 

बचत

आजकाल लहान मुलांचे कपडे मोठ्यांपेक्षा जास्त महाग मिळतात. शिवाय तुमची मुलं वाढत्या वयात आहेत त्यामुळे ती पटापट मोठी होणार. अशा वेळी मुलांच्या कपड्यांसाठी अति पैसे खर्च करणं मुळीच शहाणपणाचं नाही. उलट लहान मुलांना साधे, स्वस्त आणि आरामदायक कपडे कसे घेता येतील याचा विचार करा. कारण तुम्ही कितीही महाग घेतले तरी ते  कपडे मुलं जास्त दिवस घालणारच नाहीत. त्यामुळे आधी बजेट ठरवा आणि मग खरेदी करा. 

ADVERTISEMENT

तुमच्या मुलांची आवड

आजकाल लहान मुलंही खूप स्मार्ट झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार कपडे घ्यायचे असतात. कधी कधी मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे घेतले नाहीत तर ते कपडे मुलं घालतच नाहीत. यासाठी मुलांना कपडे घेताना त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करा. नाहीतर तुमचे पैसे वाया जातील. 

04 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT