डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षिका, बँकर असे करिअरचे पर्याय आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहीत असतील. पण आता यामध्ये अशा एका करिअरची भर पडली आहे. ते करिअर म्हणजे व्लॉगिंग (vlogging). मोबाईलचा कॅमेरा सुरु केला आणि दिवसभर आपण काय करतो हे दाखवणारे अनेक चॅनल्स आपल्याला हल्ली दिसतात. लोकांनाही वेळ काढण्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे ते बघायला आवडते. व्लॉगिंग करताना रेसिपी, फॅशन, लाईफस्टाईल असे अनेक विषय मांडता येतात. एकदा तुमचा चाहता वर्ग तयार झाला की, मग तुम्हाला चांगलाच अंदाज येतो. पण असे करताना देखील तुम्हाला काही गोष्टी टाळणे खूप जास्त गरजेचे असते. अशा काही गोष्टी व्लॉगिंग करण्याच्या आधी तुम्हाला माहीत हव्यात
विषय ठरवा
सोशल मीडिया इतका मोठा आहे की, त्यातून तुम्हाला ओळख मिळवायची असेल तर तुम्हाला विषय काय निवडणार आहे ते माहीत असायला हवे. तुम्हाला काय येते? या प्रश्नावरुन याची सुरुवात करा. कारण तुम्हाला एकच व्हिडिओ करुन प्रसिद्ध होता येत नाही. सातत्याने काही गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला जी गोष्ट करणे शक्य असेल ती गोष्ट जाणून घेत मगच व्लॉगिंग करायला हवे. उगाचच कोणीतरी सांगतं म्हणून तुम्ही चॅनेल सुरु करु नका. पहिले काही दिवस तुम्हाला सतत व्हिडिओ टाकावे लागतात. त्यासाठी तुमच्याकडे विषयांची आणि व्हिडिओची बँक असायला हवी.
पैसा खर्च करण्याची गरज नाही
हे करिअरचं असं एक माध्यम आहे ज्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे मोजावे लागत नाही. हल्ली कॅमेराचा फोन सगळ्यांकडे असतो. असा फोन घेऊन तुम्ही छान व्हिडिओ तयार करायला घेऊ शकता. सुरुवातीच्या काळात तुम्ही शून्य पैशातूनच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवता येतील याची यादी बनवायला हवी. पैसा खर्च न करता लोकांना काय आवडतील असेच व्हिडिओ करा. नवा कॅमेरा, नवा सेटअप, खास जागा, बॅकड्रॉब असं काही सुरुवातीला लागत नाहीत त्यामुळे पैसे खर्च न करता तुम्ही तुमच्या व्लॉगिंगचा श्री गणेशा करा
चुकीच्या गोष्टी टाळा
सध्या या प्लॅटफॉर्मवर असे काही पाहायला मिळते की, त्यामुळे अरे यांनी असा का तमाशा लावला?अशा कमेंट काहींना येतात. त्यांना जबाबदार त्यांचा कंटेट असतो. स्क्रिन टाईम, प्ले टाईम वाढवण्यासाठी खूप जण काही काही व्हिडिओ करतात. अर्वाच्च शिव्या, नको ती भांडण आणि अंगप्रदर्शन अशा काही गोष्टी अनाहूतपणे होतात. अशा गोष्टी कंटेट सुचत नाही तेव्हा होतो. पण ही चुकी अजिबात करु नका. कारण अशामुळे तुमची चुकीची पब्लिसिटी होऊ शकते. त्यामुळे नको ते काहीही करु नका. तुमची चुकीची पब्लिसिटी अजिबात करु नका.
व्लॉगकडेच लक्ष द्या
तुम्हाला करिअर करायचं असेल आणि नाव कमवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्लॉगकडे लक्ष देणे देखील गरजेचे असते. कोणत्याही नको त्या गोष्टी करुन लोकांना कंटाळा देण्यापेक्षा तुम्हाला रोज काय चांगले करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमचे चाहते कसे वाढतील याचा विचार करा. सोशल मीडियाचा विचार करा. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात.
आता हे करिअर सुरु करण्याआधी या काही गोष्टी लक्षात ठेवा