प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेट (Secret) असतं. काही सिक्रेट अशी असतात जी कोणासोबतही शेअर करायची नसतात. तर काही सिक्रेट ही आपल्या मनातील ओझ हलकं करण्यासाठी शेअर करत असतो. काही सिक्रेट ही अशी असतात जी कोणासोबत शेअर करायचं हे तुम्हाला माहीत असायला हवं. कोणतंही सिक्रेट शेअर करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवे. हाच आहे आपला आजचा विषय. तुम्हालाही असं काही माहीत असेल आणि शेअर करायचं असेल तर तुम्ही काय करायला हवे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला करुया सुरुवात
तुमच्या आयुष्यात असं काय सिक्रेट आहे?
सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात नेमकं सिक्रेट आहे तरी काय?
आता सिक्रेट ही वेगवेगळी असतात. एखादे जुने रिलेशनशीप, भांडणं, चोरी, अनैतिक संबंध, खोटेपणा किंवा मुद्दाम रचलेला एखादा कट असे काही सिक्रेट कोणाच्याही आयुष्यात असू शकतात. यातील काही सिक्रेट ही क्षुल्लक असतात. पण तरीदेखील ती आयुष्यात वादळ आणण्यासाठी पुरेशी असतात.
- एखादे पास्ट रिलेशनशीप तुमच्या सध्याच्या आयुष्यात नक्कीच अडथळा आणू शकते. पण कधी कधी नव्या नात्याची सुरुवात करताना या भूतकाळातील गोष्टी सांगून टाकून आपल्या डोक्यावरील ओझे अनेकांना उतरवायचे असते. पण सरसकट काही गोष्टी सांगून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा जोडीदार किंवा ज्याला सांगत आहात ती व्यक्ती समजूतदार आहे का? हे देखील पाहावे लागते. कारण या गोष्टी खूपच संवेदनशील असतात. कोणालाही हे सांगितल्यामुळे तुमच्या आयुष्यात नाहक अडचणी येण्याची शक्यता असते. हे असे सिक्रेट आहे. ज्यामुळे खूप जणांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे.
- रिलेशनशीप संपल्यानंतर आयुष्यात पुढे जाणेही गरजेचे असते. काही जण जुन्या नात्यातही स्वत:लाही गुंतवून ठेवतात. अशा व्यक्तिंना दोन नात्यातील जबाबदारी सांभाळणे फार कठीण जाते. अशावेळी हे सिक्रेट असे सिक्रेट आहे जे सांगताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे असे सिक्रेट शेअर करताना खूप विचार करायला हवा.
- अनाहुतपणे कधी कधी आपल्याकडून काही चोरी झाली असेल तर ती चोरी पचवणे देखील काही जणांना जमत नाही. पण चोरी हा असा काही गुन्हा नाही की ज्याची तुम्हाला माफी मिळू शकत नाही. केलेली चोरी तुम्हाला झोपू देत नसेल तर तुम्ही त्याविषयी तुम्ही लगेचच सांगून टाका. त्या दबावाखाली राहण्यापेक्षा ते सांगून टाकणे कधीही चांगले.
- एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी तुम्ही कट केलेला असेल किंवा कोणाचा काटा काढण्यासाठी तुम्ही काही केले असेल.तर त्याबद्दल तुम्ही कोणाला तरी सांगून टाकणे कधीही चांगले. या गोष्टीही अनेकदा तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यामुळे अशावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या आणि चांगला सल्ला देणाऱ्या माणसाला तुम्ही हे सिक्रेट शेअर करा.
- ज्या सिक्रेटने कोणाचे तरी नुकसान होणार असेल तर असे सिक्रेट कोणालाही सांगताना विचार करा. इतकेच नाही एखादे सिक्रेट शेअर करताना नुकसान जरी होणार नसले तरी देखील तुम्ही थोडासा विचार करा.
आता सिक्रेट शेअर करताना या काही गोष्टींचा नक्की विचार करा.