डोळे सुंदर दिसण्यासाठी अनेक जण हल्ली आयलॅश सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतात. ज्यांच्या आयलॅश (पापण्या) लहान आहेत अशांना आयलॅश मोठे असावेत असे कायम वाटते. अशावेळी फेक लॅशेश लावून खूप जण आपली ही हौस भागवून घेतात. पण लांबलचक लॅशेश हे काही काळासाठ म्हणजे अवघ्या काही तासांसाठी राहते. शिवाय असे लावलेले आयलॅश खोटे दिसते. तुमच्या डोळ्यांना लावले जाणारे आयलॅश हे अगदी तुमच्या लॅशेश आहेत असे वाटणारा एक प्रकार म्हणजे आयलॅश एक्स्टेंशन. आयलॅश एक्स्टेंशनमुळे लॅशेश सुंदर जरी दिसत असले तरी देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
असे केले जाते आयलॅश एक्सटेन्शन
आयलॅश एक्स्टेन्शन ही एक नवी पद्धत आहे. ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांना या पापण्या एक एक करुन बसवल्या जातात. असे करताना एक विशिष्ट ग्लू वापरला जातो. एक-एक करुन फेक लॅशचा केल लावला जातो. इतकेच नाही.तर तुम्हाला हवी असलेली केसांची लांबी देखील मिळते. हे केस काही काळासाठी तुमच्या डोळ्यांवर राहतात. त्यानंतर ते आपोआप गळून पडतात. त्यामुळे ते वेगळे असे काही वाटत नाही.
… पण
आयलॅश एक्स्टेंशन हे प्रोफेशनल व्यक्तींकडून करणे फारच गरजेचे असते. कारण डोळे हा सगळ्यात संवेदनशील असा अवयव आहे.
- आयलॅश एक्स्टेंशन करताना तुमचे डोळे बंद करुन तुमच्या सगळ्या आयलॅश या वरच्या दिशेने एकत्र केल्या जातात. त्यासाठी एक विशिष्ट जेल लावली जाते.
- त्यामुळे डोळ्याचा वरचा भाग हा बराच लाल होतो. जेल लावताना ती जेल योग्य प्रमाणात लावणे देखील गरजेचे असते. कारण हा ग्लू डोळ्यांसाठी हानिकारक ठरु शकते.
- आयलॅश करताना तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरु शकतो.
- आयलॅश चांगले दिसतात म्हणून ते रोज किंवा काही वेळाने करणे ही चांगले नाही. कारण त्यामुळे तुमच्या मुळातील लॅशेश गळून पडण्याची शक्यता असते.
- आयलॅशेश करताना खूप खबरदारी घ्यावी लागते. जर त्याचे शास्त्रशुदध ज्ञान असलेले एक्सपर्ट असतील तरच त्यांच्याकडूनच तुम्ही ते करुन घ्या.
स्वच्छता पाळा
डोळ्यांना काहीही केल्यानंतर तेथील स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची असते. डोळ्यांना ग्लू असल्यामुळे त्याच्या आजुबाजूला घाण साचू शकते. ती योग्य वेळी स्वच्छ केली नाही तर डोळ्यांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना कोणताही मेकअप केला असेल तर तो काढा.
आता आयलॅश एक्स्टेंशन करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करायला विसरु नका.