ADVERTISEMENT
home / Mythology
देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी

देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी

 

प्रत्येक हिंदू घर देव्हाऱ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.आपआपल्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. काही जणांकडे लाकडाचा, काचेचा तर काहींकडे संगमरवरी किंवा मार्बलचा देव्हारा असतो. घराच्या योग्य कोपऱ्यात किंवा जागी देव्हारा ठेवला जातो. हल्ली इतक्या नवीन प्रकारचे देव्हारे येतात की, या देव्हाऱ्यांमध्ये देवपूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे देखील असतात. कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात. तुम्ही देव्हाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देव्हारा हा अडगळीचा एक कोपरा बनून गेला आहे. खूप जणं देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवतात. तुम्हीही देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा आहे.

या दिवशी नखं कापल्याने होईल भरभराट

देव्हाऱ्यात या गोष्टी कधीही ठेवू नका

देव्हाऱ्यात या गोष्टी कधीही ठेवू नका

Instagram

 

काही वस्तू या अगदी सगळ्यांच्याच देव्हाऱ्यात अनाहुतपणे ठेवल्या जातात. तुमच्याही देवघरात असतील तर आताच त्या काढून टाका

ADVERTISEMENT
  • पूजाविधीसाठी आणलेली सामग्री जर शिल्लक राहिली असेल तर आपण ती तशीच पिशवी भरुन देव्हाऱ्यात ठेवून देतो. पण असे करणे अजिबात चांगले नाही. कारण अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टी अशांती आणतात. एकतर पूजेसाठी आणलेले सगळे साहित्य पूर्ण वापरा किंवा जर ते शिल्लक राहिले असेल तर ते विसर्जित करणे अधिक चांगले 
  • आपण देवाला हार घालतो किंवा फुलं वाहतो. पण ती फुलं खूप जण देव्हाऱ्यात तशीच ठेवून देतात किंवा घातलेला हार तसाच देव्हाऱ्यात ठेवतात. त्यामुळे फुलं तशीच वाळतात अशी वाळलेली फुलं ही नकारात्मक उर्जा पसरवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे फुलं वाहिल्यानंतर ती त्याच दिवशी संध्याकाळी काढून विसर्जित करावी किंवा झाडांमध्ये टाकावी. पण देव्हाऱ्यात ठेवू नये. 
  • बरेचदा एखादी मूर्ती तुटकी किंवा भग्न झाली की ती आपण विसर्जित करण्यासाठी म्हणून देव्हाऱ्यात ठेवतो आणि ती तशीच पडून राहते. अशा मूर्ती लगेच काढून टाका. कारण त्यामुळे नकारात्मक उर्जा पसरते शिवाय अनेक अडचणी येतात. 
  • खूप जणांच्या घरात शंख देखील असतात. असे शंख हे संध्याकाळी पूजेच्या वेळी वाजवले जातात. पण जर तुमच्या देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख असतील तरी देखील ते शुभ मानले जात नाही. त्यामुळे देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका. 
  • खूप जणांना घरी शिवलिंग ठेवण्याबाबतही अनेक शंका असतात. शिवलिंग हे फारसच संवेदनशील असते. कारण शिवलिंग घरात ठेवायचा विचार करत असाल तर तुम्ही अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंग देव्हाऱ्यात ठेवू नका. कोणत्याही सल्ल्याशिवाय तुम्ही देव्हाऱ्यात शिवलिंग अजिबात ठेवू नका. 
  •  देव्हाऱ्यात खूप जणांना जुने जुने फोटो ठेवायची सवय असते. असे अजिबात करु नका.  कारण असे जुने फोटो ठेवणे हे देखील अजिबात चागंले नाही  असे फोटो देव्हाऱ्यात ठेवण्याऐवजी तुम्ही ते भिंतीवर लावा. त्यासाठीही योग्य सल्ला घ्या. 
    कडक मंगळ आणि सौम्य मंगळ, फायदे आणि तोटे

 

देव्हारा हा स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका. जर त्या असतील तर असाच काढून टाका. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा मिळेल.

‘या’ गोष्टींमुळे आहे अक्षय्य तृतीया सर्वार्थाने महत्त्वपूर्ण

गुरुपृष्यामृत योगाची माहिती आणि पौराणिक कथा

16 Jun 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT