ADVERTISEMENT
home / Fitness
तुमचीही तिशी आली आहे का जवळ…तर तुम्ही करायला हवेत हे बदल

तुमचीही तिशी आली आहे का जवळ…तर तुम्ही करायला हवेत हे बदल

वयोमानानुसार तुम्ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक बदल करावे लागतात. साधारण पंचविशी गेली की, तुमच्या सवयींमध्ये अधिक बदल होत जातात. तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढतात. त्यानंतर येणारा महत्वाचा काळ असतो तो म्हणजे तुमची तिशी.. आता तुमची तिशी आली म्हणजे तुम्ही म्हातारे झाला नाहीत. पण तरीही तुम्ही अशा वयोगटात आहेत जिथे तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या असतात. तुमचे करिअर असते. तुमच्या शरीरातही या वयोमानानुसार बदल होतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्यात काही सवयींमध्ये बदल करणे आवश्यक असते.

पिनट बटर लव्हर्ससाठी खूषखबर, असं ठरतं आरोग्यवर्धक

आहारात करा बदल

जंक फूडला म्हणा नाही

shutterstock

ADVERTISEMENT

आता तुम्हाला सगळ्यात आधी जर काही बदल करायचा असेल तर तो तुम्हाला तुमच्या आहारात करायचा आहे. काही पदार्थ तुम्ही तिशी नंतर टाळायले हवे. त्यामध्ये खास करुन येते जंक फूड.. बर्गर, पिझ्झा,चायनीज, कोल्ड्रींक अशा काही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी अधिक घातक ठरतात याचे कारण असे की, तिशीनंतर तुमची पचनसंस्था मंदावते. काही पदार्थ पचण्यास तुम्हाला अडथळा येतो. जर तुमचे पचन योग्य झाले नाही तर तुम्हाला अपचनाचा त्रास सतत होऊ लागतो. सतत पिक्त होणे, मळमळल्यासारखे वाटणे असे त्रास तुम्हाला सतत होत राहतात. त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ टाळता आले तर फारच उत्तम 

जेवणाच्या वेळा पाळणे महत्वाचे

वेळेवर घ्या जेवण

shutterstock

आता ज्या प्रमाणे तुम्हाला आहारामध्ये काही बदल करायचे आहेत. अगदी तसेच तुम्हाला जेवणांच्या वेळांमध्येही बदल करायचे आहेत. जर तुम्ही योग्यवेळी आहार घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. नाश्ता- दुपारचे जेवण- संध्याकाळचा नाश्ता- रात्रीचे जेवण यांच्या वेळा ठरवून घ्या. शक्यतो उशीरा काही खाण्याचे प्लॅन करु नका. रात्री 9.30 नंतर जर तुम्ही जेवत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तितक्या जेवणाच्या वेळा पाळणेच चांगले.

ADVERTISEMENT

गोड पदार्थांचे सेवन

गोड पदार्थ टाळा

shutterstock

जर तुम्हाला खूप गोड खाण्याची सवय असेल तर ती सवय तुम्ही आताच सोडा. कारण तुम्ही गोड पदार्थांचे सेवन अति केले तर याचा परिणाम तुमच्या झोपेवर, तुमच्या पचनावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. शरीरीत आर्टीफिशिअल साखरेचे प्रमाण जास्त झाले तर तुम्हाला कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही गोडपदार्थांचे सेवन टाळलेले बरे. शिवाय या काळात जर तुम्ही गोडाचे अधिक सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढून तुमचे वजनही वाढू शकते. एकदा वजन वाढले की, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. एकदा गोड खाण्याची सवय लागली की, त्यावर नियंत्रण मिळवणेही कठीण होऊन जाते.

पिरेड्सच्या तारखा नेहमी चुकतात,जाणून घ्या कारणं आणि इलाज- Home Remedies For Delayed Period

ADVERTISEMENT

कॅफेनचे अति सेवनही त्रासदायक

कामाच्या अति ताणामुळे बरेचदा जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन करतात. जर तुम्ही कॉफीचे अति सेवन केले तर तुमच्यावर वार्धक्याच्या अधिक खुणा दिसू लागतात. वयाच्या आधी वाधर्क्य येणे चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला हेअरफॉल होण्याचीही शक्यता असतो.

दुधाचे सेवन टाळा

दुग्धजन्य पदार्थांचे टाळा सेवन

shutterstock

दुधामुळे तुम्हाला आवश्यक असलेले कॅल्शिअम मिळते. हे खरे असले तरी तिशीनंतर तुम्हाला दुधाची फार आवश्यकता नाहीत. त्यामुळे तुम्ही दूध आणि दुग्धजन्यपदार्थांचे सेवन करु जास्त करु नका. दुग्धजन्य पदार्थ हे प्रक्रिया केलेले असतात. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

कॅन्ड फूड

आर्टिफिशिअली साठवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका

Shutterstock

वयाच्या तिशीनंतर कॅन्ड फूड खाणे तुमच्या शरीरासाठी चांगले नाही. जर तुम्ही कॅन्ड फूड खात असाल तर ते खाणे आताच बंद करा. कारण या कॅन्ड फूडचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. कॅन्ड फूडमध्ये पॅक केलेले पदार्थ अनेक प्रक्रिया केल्यानंतर पॅक केले जातात. त्यामुळे तुम्ही ते पदार्थ न खाल्लेलेच बरे असतात. त्यामुळे तुम्ही कॅन्ड फूड खाऊ नका. 

त्यामुळे आता तुम्ही तिशीत प्रवेश करणार असाल तर ही काळजी अगदी आवर्जून घ्या आणि निरोगी राहा.

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

03 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT