ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
व्हजायनल स्वच्छतेबाबत या गोष्टी आहेत फार महत्वाच्या

व्हजायनल स्वच्छतेबाबत या गोष्टी आहेत फार महत्वाच्या

व्हजायनल स्वच्छता ही महिलांसाठी फारच महत्वाची आहे.  हल्ली व्हजायनल स्वच्छतेसाठी अनेक प्रोडक्ट मिळतात. व्हजायनल वॉश आणि वाईप्स असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला तुमच्या सोयीनुसार निवडता येतात. स्वच्छतेसाठी अॅडव्हान्स असे पर्याय उपलब्ध असले तरी तुम्ही त्याचा वापर आणि त्याची निवड कशी करता हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. कोणतेही प्रोडक्ट तेथे वापरण्याआधी काही महत्वाच्या गोष्टीही तुम्ही जाणून घेणे गरजेचे असते. या गोष्टी कोणत्या ते आता आपण जाणून घेऊया.

अशा प्रकारे घ्या आपल्या ‘प्रायव्हेट पार्ट’ च्या हायजीनची काळजी

प्रोडक्टची निवड

हल्ली व्हजायनल वॉश आणि वाईप्स असे दोन प्रकार मिळतात.  व्हजायनल वॉश हे जेल बेस्ड प्रोडक्ट आहे. तर वाईप्स हे लिक्विड आणि टिश्यू बेस्ड असतात. तुमच्या रोजच्या वापरासाठी व्हजानल वॉश हे एकदम परफेक्ट असते. तर प्रवासासाठी वाईप्स हे चांगले असतात. त्यामुळे प्रोडक्ट निवडताना तुम्ही कोणत्या वापरासाठी निवडत आहात याचा विचार करुन ते घ्या. 

*बिकिनी वॅक्ससंदर्भात A To Z माहिती जी प्रत्येक महिलेला माहीत हवी

ADVERTISEMENT

व्हजायनल स्वच्छतेबाबत या गोष्टी ठेवा लक्षात

  • व्हजायनल स्वच्छता ही फार महत्वाची असते. म्हणून तुम्ही आंघोळीच्यावेळी तुम्ही  याचा वापर तुम्ही करु शकता.  हातावर अगदी कॉईनपेक्षा ही कमी लिक्विड घेऊन तुम्ही व्हजायनाच्या जागी लावा. त्या ठिकाणी अगदी हलक्या हाताने फेस काढून थंड किंवा कोमट पाण्याने ती जागा स्वच्छ करुन घ्या. 
  • दिवसातून दोनवेळा तुम्ही याचा वापर करा. रात्री झोपताना आंघोळ करत नसाल तरी देखील तुमचा हा भाग स्वच्छ करायला विसरु नका. 
  • काही जणांना OCD अर्थात अधिक स्वच्छता करण्याची सवय असते. त्यांना आपली व्हजायना कायम स्वच्छ आणि कोरडी राहावी असे वाटते. त्यामुळे ते सतत व्हजायनल वॉशचा उपयोग करतात. जर तुम्ही याचा सतत वापर केला तर तुमची तेथील त्वचा कोरडी होते. व्हजायनाची जागा ही नाजूक असते. तिथे असा वॉशच्या उपयोगाने आलेला कोरडेपणा आला की, त्या त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो. या कोरडेपणामुळे तेथील त्वचा रॅशेश येऊ शकतात. 
  • प्रवासात तुम्ही वाईप्सचा वापर करायला हवा. कारण अशावेळी तुमच्या पँटीवर लघवीचे काही थेंब सांडण्याची शक्यता असते. लघवीमुळे तुमची तेथील जागा कायम ओली राहते. त्याची दुर्गंधी तर येतेच पण तेथील त्वचेला त्याचा अधिक त्रास होतो. 
  • जर तुम्ही व्हजायनाचे केस नियमितपणे काढत असाल तर त्यासाठी मिळणाऱ्या व्हजायनल फोमचा वापर करतात. तुमच्या तेथील त्वचेचा PF बॅलन्स राखणे फारच गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने केस काढा. 
  • व्हजायनाचे केस काढल्यानंतर त्या ठिकाणी नवे केस येताना अनेकांना पुरळ किंवा मोठे पिंपल्स येतात. केस तोडीमुळे आणि तेथील भाग झाकलेला असल्यामुळे तुम्हाला हा त्रास केस येईपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घेताना तो भाग स्वच्छ आणि कोरडा राहील असे पाहा. 

आता व्हजायनाच्या स्वच्छतेची काळजी घेत तुम्ही काही गोष्टींचे पालन करा आणि त्वचेची व्यवस्थित काळजी घ्या.

जाणून घ्या व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं आणि घरगुती उपचार (Home Remedies For Vaginal Yeast Infection In Marathi)

व्हजायनल स्वच्छतेसोबतच तुम्हाला तुमच्या इतर स्वच्छतेची काळजी असेल तर तुम्ही MyGlammचे हे प्रोडक्ट बिनधास्त निवडू शकता. 

 

ADVERTISEMENT
29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT