ADVERTISEMENT
home / आपलं जग
things you should keep in mind if you live alone in marathi

घरात एकटे राहत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात

नोकरी निमित्त अथवा शिक्षणानिमित्त अनेक तरूण मुलांमुलींना त्यांच्या घरापासून दूर शहरात एकटं राहवं लागतं. कधी कधी कामानिमित्त आईवडील अथवा घरातील इतर मंडळी बाहेरगावी जातात. अशा वेळी जर तुम्ही आजारी पडला आणि तुमच्याजवळ दुसरं कोणीच नसेल तर काय करावं हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कधी कधी एकटं राहण्याशिवाय पर्याय नसेल तर सावधपणे काही गोष्टींची काळजी घ्या. कारण अशा वेळी तुमच्या मदतीला कोणी येणार नसेल तर स्वतःच स्वतःची  मदत तुम्हाला करता येईल.

एकटं असताना या गोष्टी ठेवा लक्षात

लहानपणापासून कुटुंबात राहणाऱ्या लोकांना जर एकटं राहवं लागलं तर खूप त्रास होतो. पण अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतली तर तो काळ तुमच्यासाठी नक्कीच सुसह्य ठरू शकतो.

घरगुती उपायांनी करा वात रोग उपचार मराठी (Vaat Rog Home Remedies In Marathi)

घरात वाणसामान आणि जीवनावश्यक गोष्टींचा स्टॉक ठेवा 

आजकाल कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती आपण निरनिराळ्या शॉपिंग अॅपवरून सहज मागवू शकतो. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून आवडते पदार्थ मागवणे हे तर तुमच्यासाठी एका क्लिकची कमाल आहे. पण असं असलं तरी घरात एकटं असताना थोडं वाणसामान आणि गरजेच्या गोष्टी स्टॉक करून ठेवा. कारण मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येकाला याचे महत्त्व नक्कीच समजले असेल. घरात कोणी नसताना अथवा इतर कोणाची मदत नसताना या गोष्टींचा तुम्हाला फायदाच होतो.

ADVERTISEMENT

डेंग्यूची लक्षणे आणि डेंगू वर उपाय मराठी जाणून घ्या (Dengue Symptoms In Marathi)

आपात्कालिन फोननंबरची लिस्ट बनवा 

एका फोनवरून तुम्ही कोणत्याही गोष्टी मदत सहज मिळवू शकता. पण जर तुम्ही घरात एकटं असताना आजारी पडला तर मदतीसाठी कोणाची मदत लवकर मिळेल त्यांचे नाव आणि नंबर तुम्हाला माहीत असायला हवी. कारण अशा वेळी स्वतःला सांभाळताना या गोष्टी तुम्हाला कदाचित आठवणार नाहीत. यासाठी घरात एक अशी फोननंबरची लिस्ट ठेवा ज्यामध्ये सिक्युरिटी गार्ड, वॉचमेन, सोसायटी ऑफिसचे नंबर्स, ओळखीचे शेजारी, मित्रमंडळी यांचे फोननंबर असतील. 

कावीळ ची लक्षणे आणि घरगुती उपचार (Kavil Symptoms In Marathi)

प्रथमोचाराची किट तयार ठेवा

गरज नसताना कशाला आजारपणाचा विचार करायचा अथवा औषधे कशाला घेऊन ठेवायची असं तुम्हाला वाटू शकतं. पण जर तुमच्या जवळ कोणीच नसेल आणि तुम्ही एकटे असाल तर अशा वेळी तुम्हाला या औषधांची पटकन मदत मिळू शकते. यासाठी घरात पॅरासिटीमॉल, थर्मामीटर, जखमेवरील मलम, बॅंडएड्स, खोकल्यावरील सिरप अशी काही गरजेची औषधे आणि उपचाराचे साहित्य जवळच ठेवा. 

ADVERTISEMENT
12 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT