ADVERTISEMENT
home / Care
केसांचा रंग बदलताना या गोष्टी घ्या लक्षात

केसांचा रंग बदलताना या गोष्टी घ्या लक्षात

केसांना कलर करण्यापूर्वी आपल्याला कितीतरी प्रश्न पडतात. नेमका कोणता रंग लावायचा? त्याची काळजी कशी घ्यायची ? वगैरे वगैरे.. एकदा केसांना रंग केल्यानंतर तो आवडला नाही की,मग विचारता सोय नाही. माझ्या केसांच्या बाबतीतही मला तसाच काहीसा अनुभव आला. सहसा आपल्याकडे आजही पांढरे झालेले केस काळे करण्याची पद्धत आहे. त्या आधी केस रंगवणे हे फार कोणाला रुचत नाही. पण हल्ली सगळ्याच तरुण मुली त्यांच्या केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात. कधी केसांना लाल करा कधी मल्टीकलर.. ट्रेंडमध्ये राहायचे असेल तर असे काहीतरी करावेच लागते. पण केसांना केलेला रंग बदलताना तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणे फारच आवश्यक असते. तुम्ही केसांचा रंग बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती फार उपयुक्त आहे.

केसांना कलर करण्याआधी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

केसांना रंग करताना घ्या ब्रेक

घ्या थोडा ब्रेक

shutterstock

ADVERTISEMENT

तुम्ही केसांना आधी रंग केला असेल आणि तुम्हाला केसांचा रंग बदलायचा असेल तर तुम्ही लगेचच केसांचा रंग बदलू शकत नाही. जर तुम्ही एकापाठोपाठ केसांचा रंग बदलत राहिलात तर तुमचे केस डॅमेज होण्याची शक्यता असते. तुमचे केस कितीही चांगले असले तरीदेखील केमिकल्सच्या सतत प्रयोगामुळे तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना रंग करण्यामध्ये तुम्ही  3 ते 4 महिन्यांचा ब्रेक घ्यायला हवा. कारण त्यामुळे तुमच्या केसांना होणारा त्रास कमी होईल. 

केसांना निरोगी ठेवण्यासाठी वापरा सल्फेट-फ्री शँपू

नव्या रंगाची निवड

रंगाची निवड करताना

shutterstock

ADVERTISEMENT

खूप जणांना त्यांच्या केसांचा रंग सतत बदलायला आवडतो. केसांचा रंग बदलणे कितीही सोपे असले तरी त्याची काळजी घेणे फारच कठीण असते. जर तुम्ही ग्लोबल ( संपूर्ण केसांना कलर केला असेल) आणि त्यानंतर तुम्हाला केसांना हायलाईट्स करायचे असेल आणि अशावेळी तुम्ही निवडणारा रंग योग्य पद्धतीने कलर झाला नाही तर मात्र तुम्हाला थोडा त्रास होण्याची शक्यता असते. तुम्हाला इच्छित असलेला रंग अजिबात मिळणार नाही.त्यामुळे असा रंग करुन फायदा नाही. विशेषत: हायलाईट्स हे तुमच्या मागच्या केसांवर उठून दिसणे फार गरजेचे असते तरच त्याचा फायदा असतो.

केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश

केसांची वाढ

प्रत्येकाच्या केसाची वाढ ही वेगवेगळी असते. काहींचे केस पटकन वाढतात तर काहींच्या केसांना वाढायला बराच वेळ लागतो. तुम्ही आधी केसांना केलेला रंग जर तुमच्या केसांच्या टोकापर्यंत आला असेल तर तुम्ही लगेच रंग करण्याची घाई करु नका. जर तुम्ही तोच रंग पुन्हा लावणार असाल तर ठिक. पण जर तुम्ही रंग बदलणार असाल तर ही घाई करु नका. काही दिवस केसांची  आणखी वाढ होऊ द्या. केसांना रंग येणार नाही एक त्यामागील गोष्ट असली तरी केसांच्या टिप्स खराब होण्याची यामध्ये शक्यता असते. 

प्रोडक्टची निवड

प्रोडक्टची निवड

ADVERTISEMENT

shutterstock

आपण सतत प्रयोगशील असायला हवे ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा काहीबाबतीत तुम्ही खूप प्रयोग करणे चांगले नसते तुम्हाला एखाद्या विशिष्ट कंपनीने बनवलेले रंग वापरायची सवय असेल तर त्याचा वापर सुरु ठेवा. तुम्हाला कोणते दुसरे प्रोडक्ट वापरुन पाहायचे असती तरीदेखील तुम्हाला काही गोष्टी माहीत हव्यात. आणलेला नवीन रंग तुमच्या त्वचेला तुमच्या केसांना शोभतो की, नाही याची चाचणी घेऊन बघा. प्रत्येक प्रो़डक्टमध्ये  केमिकल्सचे प्रमाण भिन्न असते.त्यामुळे तुम्हाला याची माहिती अगदी हमखास हवी. 

आता केसांचा रंग बदलण्याआधी तुम्ही या काही गोष्टी अगदी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात म्हणजे तुमच्या केसांना त्रास  होणार नाही. 

.

ADVERTISEMENT
17 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT