निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहार, विहार आणि व्यायाम याबाबत नेहमीच सावध असायला हवं. तुम्ही काय आणि कधी खाता याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. असं म्हणतात “An Apple a Day Keeps the Doctor Away” अर्थात सफरचंद खाण्याचे तुमच्या आरोग्यावर नेहमीच चांगले फायदे होतात. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स आणि पोषक तत्त्व असतात. पण सफरचंद खाण्याची वेळ योग्य असेल तर त्याचा लाभ अधिक चांगला मिळतो. कारण त्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्ही आजारपणापासून दूर राहता. यासाठीच जाणून घ्या सफरचंद खाण्याचे फायदे
वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)
सफरचंद खाण्याचे फायदे
दररोज एक सफरचंद प्रत्येकाने खायला हवं. कारण सफरचंद खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला ह्रदयाचे आजार होत नाहीत. शिवाय ज्यांना गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. त्यांनी जर नियमित सफरचंद खाल्लं तर पोटाच्या समस्या दूर राहतात. जे लोक नियमित सफरचंद खातात अथवा सफरचंदाचा रस पितात त्यांना अस्थमासारखे गंभीर श्वसनाचे विकार होत नाहीत. सफरचंदामध्ये असलेले फायबर्स आणि अॅंटि ऑक्सिडंट तुमच्या दातांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी, मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित सफरचंद खाऊ शकता.
फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे (List of Fiber Rich Foods In Marathi)
सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती
सफरचंद खाणं लाभदायक असलं तरी जर ते योग्य वेळी खाल्लं तरच त्याचा योग्य तो लाभ शरीराला मिळू शकतो. फळं नेहमी दिवसा म्हणजेच सूर्यास्त होण्याआधी खावीत असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. म्हणूनच सफरचंददेखील सूर्य मावळण्याआधी खावं. याचाच अर्थ संध्याकाळी, रात्री सफरचंद खाऊ नये. सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्ता करताना सफरचंद खाणे अथवा सफरचंदाचा रस पिणे. कारण सकाळी सफरचंद खाण्यामुळे तुमच्या शरीरात त्याचे योग्य पचन होते आणि त्यातील गुणधर्म शरीराला योग्य प्रमाणात मिळतात.
यासोबत लक्षात ठेवा सफरचंद नेहमी सालीसकट खावं आणि कापून बराच वेळ ठेवलेलं सफरचंद कधीच खाऊ नये. कारण त्यातील पोषक घटक नष्ट होतात.