ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Thor Love and Thunder

हॉलिवूडवर चढलाय भारताचा रंग, Thor Love and Thunder चे नवे पोस्टर बघितले का!

‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ नंतर आता मार्वल स्टुडिओचा थॉर: लव्ह अँड थंडर’  हा आणखी एक चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केले आहे. मार्वल स्टुडिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. नवीन पोस्टरमध्ये चित्रपटाचा अभिनेता ख्रिस हेम्सवर्थची वेगळी शैली पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या या नव्या लूकमुळे लोकांमध्ये या चित्रपटाच्या भारतीय कनेक्शनची चर्चा रंगली आहे.

पोस्टरमध्ये दिसतोय गॉड ऑफ थंडर ‘थॉर’ चा वेगळा लूक 

या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच ख्रिस हेम्सवर्थच्या पात्राची सर्वत्र चर्चा होत आहे. वास्तविक, पोस्टरमध्ये ख्रिस ध्यानमुद्रेत दिसत आहे, तसेच त्याने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या पोस्टरमध्ये, ख्रिसच्या नवीन लूकवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले गेले आहे, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक सोशल मीडियावर या चित्रपटाचे  भारताशी काही कनेक्शन असू शकेल का याबद्दल अंदाज लावत आहेत.

ट्रेलरला मिळाला चांगला प्रतिसाद 

मार्वल स्टुडिओच्या डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मार्वल युनिव्हर्सचे चाहते जगभर पसरलेले आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, मार्वल स्टुडिओ आणखी एका सुपरहिरो चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतणार आहे आणि या मार्वलच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. थॉर’: लव्ह अँड थंडर’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. इंडिया मार्वलने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज केला, जो लगेच चाहत्यांच्या पसंतीस उतरला. दोन मिनिटे आणि 14 सेकंदांच्या या ट्रेलरला 2.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी’ मधील कॉर्ग हा थॉरची कथा सांगताना दिसतोय. तो थॉरच्या परिवर्तनापासून त्याच्या प्रेमापर्यंतच्या घटनांबद्दल मुलांना सांगतो.

8 जुलै रोजी येणार हा चित्रपट 

ख्रिस हेम्सवर्थचा हा चित्रपट 8 जुलै रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 7 जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना तीन वर्षांनंतर  थॉरला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. ख्रिस हेम्सवर्थ आणि नताली पोर्टमॅन ही ब्लॉकबस्टर जोडी चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा थॉरचा चवथा चित्रपट असणार आहे. 2011 मार्वलने गॉड ऑफ थंडर ‘थॉर’ हा सुपरहिरो प्रेक्षकांना दिला तेव्हापासूनच प्रेक्षक या सुपरहीरोच्या प्रेमात पडले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केल्यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला ट्रेलर लाँच केला, ज्यामध्ये सर्वांचे संरक्षण करण्यासाठी थॉर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये आलेला दिसतो आहे.अव्हेंजर्स एंडगेम मध्ये नैराश्याच्या सामना केल्यावर थॉर आता पुन्हा शत्रूशी लढण्यास सज्ज आहे. 

ADVERTISEMENT

ट्रेलरमध्ये दिसली थरारक ऍक्शन 

‘थॉर: लव्ह अँड थंडर’च्या दोन मिनिटांच्या ट्रेलरची सुरुवात ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’ या चित्रपटातील चाहत्यांच्या आवडत्या कॉर्गने केली आहे जो थॉरच्या साहसांच्या कथा सांगताना दिसतोय. यानंतर, ट्रेलरमध्ये आपल्याला चित्रपटातील खलनायक ‘गॉर’’ची पहिली झलक पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये जेन फॉस्टरची एन्ट्री सर्वांनाच आश्चर्यचकित करते. या चित्रपटात ती माईटी थोरची भूमिका साकारताना दिसणार आहे. गॉरची भूमिका स्वीकारून  ‘ख्रिश्चन बेल’ने मार्वल युनिव्हर्समध्ये प्रवेश केला आहे. गॉरचे पात्र “हॅरी पॉटर” चित्रपटातील लॉर्ड वोल्डमॉर्टची आठवण करून देते. 

नव्या चित्रपटात थॉरबरोबर काय घडते हे बघण्यासाठी सगळे मार्वल फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT