ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
coffee with karan

कॉफी विथ करणमध्ये प्रथमच तीन खान एकत्र लावणार का हजेरी 

कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनची चाहते खूप वाट पाहत आहेत. या चॅट शोमध्ये, फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्स कॉफीचे घोट घेताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये शेअर करतात. या सिझन मध्ये कोण कोण सहभागी होणार याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत व अनेक पाहुण्यांची नावे समोर येत आहेत. आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, या सीझनमध्ये तिन्ही खान म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान पाहुणे म्हणून सहभागी होऊ शकतात.

तीन खान पहिल्यांदाच एकत्र येण्याची शक्यता 

टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, शोमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान एकत्र दिसणार आहेत. या तिन्ही खानांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. हे तिन्ही सुपरस्टार दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी हे तिघेही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. याशिवाय दक्षिणेतील अनेक मोठे कलाकारही या शोचा भाग असू शकतात. आजकाल साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अनेक पाहुण्यांची नावे येत आहेत समोर 

कॉफी विथ करणच्या सीझन 7 मध्ये सहभागी होणाऱ्या अनेक पाहुण्यांची नावे समोर येत आहेत. त्यात नवविवाहित जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, बेस्ट फ्रेंड्स जान्हवी कपूर आणि सारा अली खान या नावांचा समावेश आहे. याशिवाय पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना देखील या चॅट शोचा भाग असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ, विकी कौशल, रणवीर सिंग, अक्षय कुमार यांच्यासह अनेक मोठे स्टार्स या शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील गुपिते शेअर करताना दिसू शकतील.

OTT वर दिसणार कॉफी विथ करणचा नवा सिझन 

कॉफी विथ करण सीझन 7 हा टीव्हीवर नाही तर OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर स्ट्रीम केला जाईल. सन 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालेल्या कॉंट्रोव्हर्सीनंतर तसेच कोरोनामुळे हा शो थांबवण्यात आला होता. कॉफी विथ करणचा शेवटचा सीझन 2019 मध्ये आला होता. यावर्षी मात्र मोठ्या सस्पेन्ससह, करण जोहरने त्याच्या लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनची घोषणा केली. करण जोहरने यापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती आणि जड अंतःकरणाने म्हटले होते की कॉफी विथ करण परत येणार नाही. करण जोहरने ही पोस्ट शेअर करताच सर्वत्र खळबळ उडाली होती. ही पोस्ट पाहून लोक नाराज झाले. पण नंतर, करण जोहरने घोषणा केली की आता कॉफी विथ करणचा नवीन सीझन टीव्हीवर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल.

ADVERTISEMENT

जान्हवी कपूर व सारा अली खान दिसणार एकत्र 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कॉफी विथ करणच्या सीझन 7 च्या पहिल्या काही भागांमध्ये, जान्हवी कपूर सारा अली खानसोबत सामील होणार आहे. याआधीही जान्हवी कपूर आणि सारा अली खान इतर टीव्ही शोमध्ये एकत्र दिसल्या आहेत. कॉफी विथ करणचा हा एपिसोड खूप धमाकेदार असेल असे बोलले जात आहे. हा एपिसोड यावर्षी जून महिन्यात रिलीज होऊ शकतो असा अंदाज आहे. 

हे खास एपिसोड बघण्यासाठी आणि  स्टार्सच्या खाजगी आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

09 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT