बॉलीवूडमध्ये टायगर श्रॉफचा एक स्पेशल चाहता वर्ग आहे. टायगरच्या डान्स, फिटनेस आणि अॅक्शन मूव्हजवर अनेक जण घायाळ होतात. त्यामुळे त्याला फिटनेस, डान्स आणि अॅक्शनसाठी खास फॉलो केलं जातं. आतापर्यंत टायगरच्या सर्व चित्रपटात काही ना काही तर खासियत दिसून आली आहे. लवकरच त्याचा हिरोपंती 2 चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटात टायगर नेहमी पेक्षा वेगळं अचंबित करणारं काही तरी करणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी यात तो एक गाणं गाणार असं जाहीर करण्यात आलं होतं. आता म्हणे तो या चित्रपटासाठी खास स्टिक फायटिंगचं नवं स्किल शिकला आहे.
‘हिरोपंती 2’ ची उत्सुकता
टायगर श्रॉफने हिरोपंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. जॅकी श्रॉफचा मुलगा म्हणून चाहत्यांनी त्याचं अभिनयात करिअर करणं मान्य केलं. मात्र टायगरने त्यापुढे जात डान्स, फिटनेस आणि अॅक्शनमुळे स्वतःचं वेगळं स्थान बॉलीवूडमध्ये निर्माण केलं. मात्र टायगरला एवढ्यावर समाधान मानायचं नाही. म्हणूनच तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. हिरोपंती 2मध्ये तो चक्क गाणंही गाणार आहे आणि त्याने या चित्रपटासाठी नवा फायटिंग फॉर्म शिकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर या चित्रपटासाठी खास स्टिक फायटिंग शिकला आहे. हा मार्शल आर्टचा एक प्रकार असून याआधी टायगरच्या कोणत्याच चित्रपटात तो दाखवण्यात आलेला नाही. स्टिक फायटिंग कला ही कलारीपयट्टू या भारतीय मार्शल आर्टच्या अंतर्गत येते. चित्रपटात नेहमी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी हिरोपंतीमध्ये या कलेचा अविष्कार टायगर दाखवणार आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘हिरोपंती 2’
हिरोपंती 2 चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवालाचा हा चित्रपट अहमद खान दिग्दर्शित करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ए. आर. रहमान यांचं संगीत असणार आहे आणि यात दोन गाणी चक्क टायगरने गायली आहेत. या महिन्यात ईदच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. हिरोपंती चित्रपटाचा सीक्वल असला तरी या चित्रपटातील कथानक आणि अॅक्शन नक्कीच वेगळ्या असतील अशी आशा चाहत्याना वाटत आहे. कारण हिरोपंती 2 साठी साजिद नाडियाडवालाने स्वतःचं सर्व कसब पणाला लावलं आहे. कारण त्याला नेहमी त्याचा प्रत्येक चित्रपट बेस्ट करायचा असतो. हिरोपंती 2 चं शूटिंग जगभरातील प्राईम लोकेशन्सवर करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाच्या एक्शन सीक्वेंसेजसाठी त्याने हॉलीवूडच्या काही अॅक्शन दिग्दर्शकांना त्याच्या चित्रपटासोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हिरोपंती 2 चं भारत, इग्लैंड, रशिया, थायलॅंड आणि अबूधाबीमध्ये शूटिंग केलं गेलं आहे. शिवाय दिग्दर्शकांच्या मते हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि अदभूत अनुभव देणारा असेल. बागी, बागी 2, बागी 3 आणि हिरोपंतीनंतर आता टायगरचा आणखी एक स्टेप पुढे असा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आशा आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक