आपल्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा एक अभ्यास केला जातो. समुद्रशास्त्रानुसार आपल्या अंगावर असणाऱ्या तिळांचा एक विशिष्ट अर्थ आणि महत्त्व सांगण्यात येते. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर तीळ असतात. पण असं म्हणतात हातावर अर्थात तुमच्या तळहातावर असणाऱ्या तिळांना विशेष महत्त्व असतं. माणसाच्या हातावरील रेषा या त्याचे नशीब, आयुष्यातील रहस्य आणि त्याच्या व्यक्तित्वाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हाताावरील रेषांप्रमाणेच हातावरील तिळांनाही तितकंच महत्त्व आणि अर्थ असतो. पण याचा नक्की अर्थ काय हे तुम्हाला नक्कीच सर्वांना माहीत नसणार आणि याचीच खास माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना याची माहिती असतेच. पण आपल्यालाही सामान्य माणूस म्हणून याविषयी जाणून घेण्यात रस असतो. हातावर असणारे तीळ हे तुम्हाला शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळं मिळवून देतात. चला तर पाहूया नक्की काय अर्थ आहे.
बुध पर्वतावर असणारा तीळ
हाताचे सर्वात लहान बोट अर्थात करंगळीच्या खाली बुध पर्वत असतो. हा पर्वत धन, ऐश्वर्य आणि संपत्तीच्या बाबतीत ज्ञान देतो
तीळ असल्यास – ज्या व्यक्तीच्या बुध पर्वतावर तीळ असतो त्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. पण अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे अत्यंत घातकी ठरू शकते. कोणत्याही व्यापारी व्यक्तीच्या हातावर असा तीळ असेल तर त्याला कधी ना कधीतरी व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
गुरू पर्वतावर तीळ
Freepik
गुरू पर्वत हा तर्जनी या बोटाच्या खाली असतो. या पर्वतावरून व्यक्तीच्या महत्वाकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजतात.
तीळ असल्यास – गुरू पर्वतावर तीळ असल्यास, अशी व्यक्ती अत्यंत भाग्यवान समजली जाते. पण जीवनात कधी ना कधी तरी अशा व्यक्तीच्या सन्मानाला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यात समस्या येऊ शकते.
सूर्य पर्वतावर तीळ
सूर्य पर्वत हा हातावरील अनामिका बोटाच्या खाली असतो. या पर्वतावनुसार व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टींच्या बाबतीत ज्ञान प्राप्त होते. विशेषतः या पर्वतावरून व्यक्तीची नोकरी आणि सामाजिक प्रसिद्धी किती असू शकेल याबाबत कळते.
तीळ असल्यास – तीळ जर तुमच्या अनामिका बोटावर असेल तर अशा व्यक्तीला नोकरी संबंधित अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. सूर्य पर्वतावर तीळ असेल तर अशा व्यक्ती चारचौघांमध्ये पटकन मिसळून बोलू शकत नाहीत. त्यामुळे समाजाता या व्यक्तींना तितकेसे स्थान मिळत नाही.
हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर
राहू पर्वतावर तीळ
Freepik
हातावर राहू पर्वत हा मधोमध असतो. मस्तिष्क रेषेच्या खाली असणारा हा पर्वत आणि भाग्य रेषा याच पर्वतावरून शनी पर्वतापर्यंत जाते.
तीळ असल्यास – राहू पर्वतावर तीळ असणे अत्यंत फायदेशीर असते. तीळ हाताच्या अगदी मधोमध असेल तर अशा व्यक्तीला अचानक एखाद्या कामात यश मिळतं. आधी अशा व्यक्तींना संघर्ष करावा लागतो. या व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करतात तिथे त्यांना चांगल्या पदावर काम मिळते.
हाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही
चंद्र पर्वतावर तीळ
हातावर चंद्र पर्वत हा शुक्र पर्वताच्या विरुद्ध दिशेला असतो. हा पर्वत व्यक्तीच्या आरोग्य आणि मानसिकतेबाबत सांगतो
तीळ असल्यास – जर तुमच्या हातावरील चंद्र पर्वतावर तीळ असेल तर तुम्हाला नैराश्याची समस्या उद्भवू शकते. चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो. त्यामुळे मानसिक स्थिती यावरून कळते.
शुक्र पर्वतावर तीळ
शुक्र पर्वत अंगठ्याच्या खालच्या भागावर असतो आणि जीवनरेषेने वेढलेला असतो. या पर्वतानुसार तुमचे लग्न आणि प्रेमसंबंध किती आहेत आणि कसे होईल याचे ज्ञान मिळते.
तीळ असल्यास – जर तुमच्या शुक्र पर्वतावर तीळ असेल तर अशा व्यक्ती अत्यंत खर्चिक असतात. पण त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर प्रेमसंबंधामध्ये या व्यक्तींना धोका मिळू शकतो. ज्या व्यक्तींच्या हातावरील शुक्र पर्वतावर तीळ आहे अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.
हाताच्या या रेषा सांगतात होणार प्रेमविवाह की अरेंज मॅरेज
हातावर असणारे तीळ आणि त्याचे फळ
- विवाह रेषेवर असणारा तीळ चांगला नाही असे म्हटले जाते. विवाहरेषेच्या खालच्या बाजूला हा तीळ असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदारासह जमवून घेणे कठीण आहे आणि हा तीळ जर विवाहरेषेच्या वरच्या बाजूला असेल तर तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी हे योग्य नाही
- हृदयरेषेवर तीळ असल्यास तुम्हाला हृदयाशी संबंधित मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते
- मस्तिष्क रेषेवर तीळ असल्यास कोणत्याही मानसिक आजाराशी या व्यक्तीला झुंजावे लागते
- मध्यमा बोटावर तीळ असेल तर यामुळे सुख आणि संपत्ती दोन्ही प्राप्त होते
- डाव्या हातावर तीळ असल्यास, या व्यक्ती पैसे भरपूर कमावतात पण खर्चही तितकाच करतात
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक