ADVERTISEMENT
home / केस
Tips for Straight Hair Care in marathi

स्ट्रेटनिंग केलेले केस लवकर खराब होऊ नयेत यासाठी सोप्या टिप्स

वातावरणातील बदल, प्रदूषण, आहार, आरोग्य समस्या अशा अनेक गोष्टींचा केसांवर परिणाम होत असतो. त्यामुळे केस नकळत निस्तेज आणि गुंतणारे होतात. अशा वेळी केस मॅनेज करण्याचा सोपा मार्ग म्हणजे केसांवर स्ट्रेटनिंग अथवा स्मुदनिंग ट्रिटमेंट करणं. ज्यामुळे बऱ्याच महिला पार्लरमधून अशा महागड्या ट्रिटमेंट केसांवर करून घेतात. मात्र जर तुम्ही केस काही कालावधीसाठी सरळ अथवा स्मूथ करून घेतले असतील तर तुम्हाला केसांची काही बाबतीत काळजी घ्यावीच लागते.

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

स्ट्रेटनिंग केलेल्या केसांची अशी घ्या काळजी

केस सरळ केल्यानंतर काही दिवस केसांची अशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे.

योग्य शॅंपू आणि कंडिशनर लावा

केस स्ट्रेट केल्यावर जर तुम्ही त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होऊ शकतात. कारण स्ट्रेंटनिंग आणि स्मुदनिंग करताना अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केसांवर केला जातो. त्यामुळे हेअर ट्रिटमेंट केल्यावर त्याला योग्य असाच शॅंपू आणि कंडिशनर केसांसाठी वापरावे लागते. यासाठी तज्ञ्जांच्या मदतीने अशा शॅंपू आणि कंडिशनरची निवड करा ज्यामुळे तुमच्या केसांना पुरेसा मऊपणा आणि चमक मिळेल.

ADVERTISEMENT

हेअर मास्कचा वापर करा

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हेअर मास्कचा वापर खूप गरजेचा असतो. कारण हेअर मास्कमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि नैसर्गिक मॉईस्चराईझचा वापर केलेला असतो. आर्गन ऑईल, शीया बटरचा वापर केलेले मास्क केसांसाठी अतिशय उत्तम ठरतात. यासाठी आठवड्यातून एकदा केसांना योग्य हेअर मास्क जरूर लावा. 

घरी अथवा पार्लरमध्ये हेअर स्पा जरूर करा 

केस स्ट्रेट आणि मऊ राहण्यासाठी केसांची योग्य निगा राखणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी महिन्यातून एकदा तुम्ही पार्लरमध्ये हेअर स्पा नक्कीच करू शकता. मात्र जर पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तर घरीच हेअर स्पा करा. आजकाल बाजारात विविध प्रकारचे हेअर स्पा कीट मिळतात. आर्गन ऑईल, रोजमेरी, ओट्स असे घटक असलेले हेअर मास्क केसांसाठी खूप फायद्याचे ठरतात. तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक घटकांनी देखील हेअर मास्क बनवू शकता. 

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

नियमित हेअर सीरम लावणं गरजेचं 

हेअर सीरममुळे केसांचे बाहेरील धुळ, माती, प्रदूषण, केमिकल्सपासून संरक्षण होतं. आजकाल उत्तम दर्जाचे हेअर सीरम बाजारात विकत मिळतात. जर तुमचे केस वारंवार कोरडे होत असतील अथवा नुकतेच स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट केलेले असतील तर हेअर वॉश नंतर केस सुकल्यावर केसांना हेअर सीरम लावण्यास विसरू नका. सीरममुळे केसांचे संरक्षण होतेच शिवाय केस मऊ आणि हायड्रेट राहतात. नैसर्गिक घटक असलेले सीरम केसांसाठी निवडणं नेहमीच फायद्याचं ठरेल. 

ADVERTISEMENT

केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम (Hair Serum To Get Silky Hair)

01 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT