ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
Tips for Styling Sweaters in Marathi

हिवाळ्यात स्वेटरने करा अशी हटके स्टाईल

हिवाळा सुरू होताच उबदार कपडे घालण्याची गरज भासू लागते. आजकाल निरनिराळ्या प्रकारचे स्टेटर बाजारात सहज मिळतात. हिवाळ्यात अशा जाड, लोकरीच्या कपड्यांमध्येही थोडं स्टायलिश दिसायचं असेल तर थोडे प्रयोग फॅशनमध्ये करायला हवेत. काही टिप्स आणि हॅक्स ट्राय केले तर तुम्ही तुमच्या साध्या स्वेटरमध्येही आकर्षक आणि फॅशनेबल दिसू शकता. यासाठी यंदाच्या हिवाळ्यात तुम्ही अधिक स्टायलिश दिसावं यासाठी आम्ही शेअर करत आहोत काही सोप्या फॅशन टिप्स

स्वेटर आणि स्वेटशर्टचे हे प्रकार नक्की ट्राय करा (Types Of Sweater And Sweatshirt)

स्वेटर सोबत करा अशी स्टाईल

स्वेटर प्लेन असो वा प्रिंटेड, बॉटमसाठी जीन्स निवडा अथवा शॉर्ट स्कर्ट फक्त या टिप्स फॉलो करा आणि दिसा अधिक स्टायलिश

क्लासिक हाफ टक

क्लासिक हाफ टक स्टाइल करून तुम्ही स्वेटरमध्येही फॅशनेबल दिसाल. या स्टाइलला काही लोक फ्रेंच टक असंही म्हणतात. यासाठी तुम्हाला फक्त तुमचं स्वेटर थोडं ऑफ सेंटर टक करायचं आहे.ज्यामुळे तुम्हाला एक छान आकर्षक लुक मिळेल. यासाठी स्वेटर परिधान केल्यावर ते फक्त तुमच्या आवडत्या दिशेने अर्धे टक खरा. टक केलेल्या भागा व्यतिरिक्त इतर भाग खाली सोडा. ज्यामुळे तुम्ही उंच आणि स्टायलिश दिसाल.

ADVERTISEMENT

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

ट्विस्ट टक

तुम्ही स्वेटरसोबत लॉंग जीन्स, शॉर्ट अथवा स्कर्ट काहिही परिधान करा. मात्र तुमच्या बॉटममध्ये मध्यभागी थोडं स्वेटर टक करा आणि सुंदर दिसा.  जर तुमचं स्वेचर प्लेन असेल तर यामुळे तुमचा लुक अधिक खुलून दिसेल. ट्विस्ट टक लुक व्हाइट बटन अप शर्टसोबत जास्त चांगला वाटतो.

बॅक टक

पुढील दिशेला टक करण्याप्रमाणे तुम्ही स्वेटर मागच्या दिशेनेही टक करू शकता. यासाठी स्वेटरला रबरबॅंडने एक गाठ बांधा अथवा सिंपल पद्धतीने बॉटममध्ये मागच्या बाजूने स्वेटर टक करा.  मात्र ही फॅशन करताना पुढील आणि कडेकडील बाजूने स्वेटर व्यवस्थित करा ज्यामुळे तुम्हाला एक हटके लुक मिळेल. 

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

ADVERTISEMENT

बेल्ट टक

तुम्ही लॉंग स्वेटर अथवा स्वेटर ड्रेस घातला असेल तर त्यावर बेल्ट टक केल्यामुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल. यासाठी एक पातळ जाडीचा बेल्ट घ्या आणि तो तुमच्या स्वेटरवर टक करा. स्वेटर अथवा ड्रेसचा वरचा भाग थोडा ओढून घ्या आणि त्याने तुमचा बेस्ट झाकून टाका. ज्यामुळे बेल्ट दिसणार नाही पण लुक मात्र जबरदस्त दिसेल. जर तुम्ही यासाठी टर्टल नेक स्वेटर ट्राय केलं तर तुम्ही अधिक स्टायलिश दिसाल. 

13 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT