वेकेशन सीझन सुरू होताच अनेक जण ट्रॅव्हल प्लॅन आखतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सगळे घरात अडकून पडले होते. मात्र आता पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत आहे त्यामुळे फिरायला जायचा बेतही आखण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. फिरण्यासाठी काही जण उंच डोगर, थंड हवेची ठिकाणं निवडतात तर काहींना निळाशार समुद्र किनारा भुरळ घालतो. यंदा जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत. यासोबतच सर्वांसोबत शेअर करा हे 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi
सनस्क्रिन सोबत ठेवण्यास मुळीच विसरू नका
बीच हॉलिडेवर जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सनस्क्रिन… कारण जर तुम्ही सनस्क्रिनशिवाय समुद्र किनारी फिरण्यास गेला तर तुमची स्कीन चांगलीच टॅन होते. विशेष म्हणजे हे सनटॅन निघण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे समुद्रकिनारी फिरताना चांगले एसपीएफ असलेले सनस्क्रिन सतत जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वेळी वापर करा. तुमच्यासाठी खास महाराष्ट्रातील अप्रतिम समुद्रकिनारे (Beaches In Maharashtra)
डिहायड्रेट होण्याची आहे शक्यता
समुद्रकिनारी सकाळी अथवा संध्याकाळी फिरताना तुम्हाला जास्त त्रास होत नाही. मात्र दिवसभर तुम्ही बीचजवळ असाल तर मात्र तुमचे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी अशा ठिकाणी फिरताना सतत पाणी, ज्युस, नारळपाणी प्या. ज्यामुळे तुमचे शरीर सतत हायड्रेट राहिल.

गॉगल,स्कार्फ आणि हॅट आहे महत्त्वाचे
सध्या कोकण, केरळ अथवा मालदिव्ज ही ट्रॅव्हल डेस्टिनेशन अनेकांना भुरळ घालत आहेत. मात्र या ठिकाणी जाताना तुमच्या बॅगमध्ये काही महत्त्वाच्या अॅक्सेसरीज असायलाच हव्या. जसं की स्कार्फ, टोपी अथवा हॅट आणि गॉगल शिवाय तुम्ही बीचवर फिरूच शकत नाही. कारण समुद्रकिनारी निसर्ग तुम्हाला आकर्षित करत असतो. मात्र त्याच निसर्गाचा एक भाग असलेल्या सूर्यप्रकाशात तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
वॉटरप्रूफ बॅग आणि फूटवेअर
समुद्रकिनारी फिरताना तुमच्या हातातील वस्तू भिजू नयेत यासाठी एखादी वॉटरप्रूफ बॅग कॅरी करा. ज्यामध्ये समुद्रकिनारी भिजल्यावर तुम्ही तुमचे ओले कपडे आणि वस्तू ठेवू शकता. शिवाय समुद्रकिनारी फिरताना उंच टाचेच्या, लेदरच्या अथवा नाजूक फूटवेअर वापरणं टाळा. कारण त्यामुळे तुमचा प्रवासातील आनंद कमी होण्याची शक्यता आहे.
वॉटरप्रूफ कॅमेरा अथवा मोबाईल
समुद्र किनारे निळेशार आणि अथांग असतात. तिथला निसर्ग पाहताना तुमची तहान भूक हरपू शकते. सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी एक मनमोहक नजारा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. पण हे सर्व क्षण टिपण्यासाठी तुमच्याजवळ जर वॉटरप्रूफ कॅमेरा अथवा मोबाईल असेल तर क्या बात है… वॉटफप्रूफ गॅजेट्स असतील तर तुम्ही समुद्राच्या लाटेवर स्वार होत हे क्षण वेचू शकता. निसर्गप्रेमींसाठी खास जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार (Nature Quotes In Marathi)