ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
हिवाळ्यात मधुमेहींनी त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक

हिवाळ्यात मधुमेहींनी त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक

मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता हा एक जीवनशैलीचा आजार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. रक्तातील असंतुलित साखरेची पातळी त्वचेसह शरीराच्या अनेक अवयवांवर प्रतिकूल परिणाम करते. मधुमेहाचा शरीरावरील प्रत्येक भागावर परिणाम होतो आणि यामध्ये त्वचेचाही समावेश आहे. मधुमेह किंवा मधुमेहापूर्वीची स्थिती असलेल्या बहुतेक लोकांना त्वचेसंबंधी वारंवार समस्या आढळतात. जगभरात 75 टक्क्याहून अधिक नागरिक टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाने पीडित आहे. जेव्हा शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीरातील द्रवाचा –हास होतो आणि त्वचा कोरडी होऊ लागते. याबाबत डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ यांच्याकडून आम्ही हिवाळ्यात मधुमेहींनी त्वचेची काय विशेष काळजी घ्यायची हे समजून घेतले. 

मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर (Home Remedies for Diabetes In Marathi)

मधुमेहामुळे उद्भवणारी त्वचेची समस्या

Shutterstock

ADVERTISEMENT
  • मधुमेहामुळे त्वचेची नवीन समस्या उद्भवू शकते आणि जुन्या समस्या आणखी तीव्र होऊ शकतात.
  • मधुमेहामुळे रक्तातील उच्च ग्लुकोज पातळी शरीरात रक्ताभिसरण होण्यासाठी अडचणी निर्माण करते.
  • रक्ताभिसरण योग्यरित्या होत नसल्याने त्वचा बरी होण्याची क्षमता कमी होते तसेच त्वचेचे कोलेजेन खराब होत
  • त्वचेच्या पेशी उत्तमरित्या कार्य करण्याची क्षमता गमावतात आणि त्वचा अधिक संवेदनशील होते.
  • शरीरातील अतिरिक्‍त साखर घालवण्यासाठी शरीर त्या पाण्याचे लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर मधुमेहींच्या हातापायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर त्वचा कोरडी होऊ शकते.कोरड्या त्वचेमुळे खाज सुटू शकते, त्वचेवर क्रॅक येतात आणि त्यामुळे त्वचेचा संसर्ग, जळजळ, लालसरपणा अशा समस्या दिसू लागतात
  • बुरशीजन्य संक्रमण: बुरशीजन्य संसर्ग कुणालाही होऊ शकतो परंतु मधुमेह असलेल्या लोकांमध्ये याची जास्त शक्यता असते. त्वचा लाल होणे, खाज सुटणे, फोड व  पुरळ  येणे आदी समस्या दिसू लागतात.
  • त्वचेवर लहान फोड दिसतात, ते मुरुमांसारखेच असतात परंतु दुर्लक्ष केल्यास ते पिवळसर किंवा लालसर तपकिरी रंगासह सुजलेल्या आणि कडक त्वचेचे ठिपके बनतात. यासाठी तुम्ही योग्य बॉडी लोशनचा वापर करा.

काय करावेत उपाय

1. मधुमेह नियंत्रणात ठेवा. त्वचा कोरडी असेल तर मॉईश्चरायझरचा वापर करा

2. त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरडया किंवा खाज-या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.

3. त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्‍टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे आणि मलम लावा. निर्जंतुक कापसाने छोट्या जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्‍टरची भेट घ्या.

4. हिवाळ्यात थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.

ADVERTISEMENT

5. तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्‌सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.

6 आपली त्वचा विशेषत: अंडरआर्म्स, स्तनाच्या खाली, पायाची बोटं आणि मांडीच्या सभोवतालच्या समस्येच्या भागात त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. सनस्क्रीनचा वापर करा

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त असतो या आजारांचा धोका

घरगुती उपचार

दोन चमचे मधात अर्धा चमचा हळद मिसळून बनवलेल्या स्किन पॅकचा वापर करा. त्वचेवर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच ठेवून द्या. मध त्वचेला मॉइस्चराईज करते आणि हळद संसर्गाविरोधात लढण्यासाठी मदत करते.

ADVERTISEMENT

कच्च्या हळदीचा चहा पिऊन वाढवा प्रतिकारशक्ती

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT