ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
paisley prints

काय आहे पॅस्ले प्रिंट्स फॅशन, कशी कराल स्टाईल

बाहेर जाताना महिला नेहमी सर्वात पहिल्यांदा लक्ष देतात ते म्हणजे स्टायलिंगवर. त्यामुळे अगदी अभिनेत्रींनादेखील नेहमी स्टायलिस्टची गरज भासते. आपल्याला कोणता आऊटफिट हवा, त्यासाठी कोणता रंग हवा आणि कोणते प्रिंट्स हवेत याकडे प्रत्येक महिलेचे व्यवस्थित लक्ष असते. साधारणतः प्रिंट्समध्ये तुम्ही फ्लोरलपासून ते स्ट्राईप्सपर्यंत सर्व स्टाईल्स वापरत असाल. पण तुम्हाला एखादे सटल प्रिंट हवे असेल तर तुम्ही एका सुंदर लुकसाठी नक्कीच पॅस्ले प्रिंट्स (paisley prints) चा पर्याय निवडायला हवा. पॅस्ले प्रिंट्स एक असा प्रिंट आहे, जो कधीच स्टाईलमधून बाहेर जात नाही आणि त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या स्टाईलमध्ये ही फॅशन समाविष्ट करून घेऊ शकता. इतकंच नाही तर पॅस्ले प्रिंट्स तुम्हाला अत्यंत उठावदार आणि आकर्षक लुक मिळवून देते. तुम्ही आऊटफिट म्हणून तर हे वापरू शकताच पण त्याशिवाय इतर स्टाईलदेखील करू शकता. 

बॉटम वेअर स्वरूपात करा स्टाईल

तुम्हाला पॅस्ले प्रिंट्स एका स्टायलिश अंदाजात घालयची असेल तर तुम्ही बॉटम वेअर स्वरूपात वापरा. तसं तर पॅस्ले प्रिंट्सचे शॉर्ट्स अत्यंत स्टनिंग दिसतात. पण आता हवामान बदल असल्याने तुम्ही शॉर्ट्सच्या ऐवजी पॅस्ले प्रिंट्स लेग पँट अथवा सैलसर पँटसह घालू शकता. हे पॅस्ले प्रिंट्स तुम्हाला प्लेन व्हाईट टॉपसह अधिक चांगले दिसतात. तुम्ही आऊटिंगसाठी जर हे घालणार असाल तर आपल्या नेकपिसने तुम्ही हा लुक अधिक स्टायलिश करू शकता. 

पॅस्ले प्रिंट्स स्कार्फ 

Instagram

बऱ्याचदा असं होतं की, आपण एकदम प्लेन आऊटफिट कॅरी करतो. उदाहरणार्थ प्लेन टॉप अथवा टी-शर्टसह जिन्सचा लुक कंटाळवाणा वाटतो. अशावेळी तुम्ही तुमच्या लुकमध्ये रंग आणि स्टाईल भरण्यासाठी पॅस्ले प्रिंट्सचा स्कार्फ वापरू शकता. आजकाल बाजारात वेगवेगळ्या रंगाचे पॅस्ले प्रिंट्स स्कार्फ तुम्हाला दिसतात. हे स्कार्फ तुम्ही कोणत्याही आऊटफिट्स अर्थात कुरता वा टीशर्टवरदेखील वापरू शकता. तुम्ही तुमचा लुक या स्कार्फने अधिक स्टायलिश करू शकता. 

पॅस्ले प्रिंट्स साडी ब्लाऊज 

पॅस्ले प्रिंट्सची साडी नेसणे तर सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला ओव्हरऑल लुकमध्ये पॅस्ले प्रिंट कॅरी करणे आवडत नसेल तर तुम्ही पॅस्ले प्रिंट्स साडी ब्लाऊज घालू शकता. तुम्ही प्लेन साडीसह एम्ब्रॉडिड हेव्ही पॅस्ले प्रिंट्स ब्लाऊज घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही मिस मॅच अथवा कलर कॉन्ट्रान्स्टिंग पर्यायदेखील निवडू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक दिसतो. 

ADVERTISEMENT

फुटवेअरच्या रूपात करा कॅरी 

Instagram

तुम्ही जर पॅस्ले प्रिंट्स एका इंटरेस्टिंग स्वरूपात कॅरी करण्याचं मन बनवलं असेल तर तुम्ही हिल्समध्ये याचा वापर करू शकता. फुटवेअरदेखील महत्त्वाचे आहे. तुमच्या स्टाईलसाठी पॅस्ले प्रिंट्सच्या हाय हिल्स अतिशय सुंदर दिसतील. या हिल्स फुटवेअर तुम्हाला अधिक सुंदर दिसण्यास मदत करतात. तुमच्या स्टाईल स्टेटमेंटला चार चाँद लावण्यासाठी नक्कीच याचा उपयोग करून घेता येतो. जिन्स पासून ते अगदी कुलाट्स, शॉर्ट्स आणि एखाद्या एथनिक वेअरसहदेखील तुम्ही हिल्स स्टाईल करू शकता. 

पॅस्ले प्रिंट्स बॅग दिसतील अधिक सुंदर 

हँडबॅग्ज तुम्हाला अधिक बोल्ड दर्शवितात आणि तुमच्या स्टाईलमध्ये अधिक चांगला आणि उठावदार लुक आणतात. पण तुम्हाला सटल स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही पॅस्ले प्रिंट्स बॅगचा नक्कीच वापर करू शकता. 

03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT