ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Tips to Help You Cook Faster in Marathi

घरी अचानक आले पाहुणे तर असा करा झटपट स्वयंपाक

भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भवः हा संस्कार दिला जातो. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची परंपरा आपल्याकडे असते. आपल्या घरी पाहुणे आल्यावर त्यांच्या पाहुणचारासाठी काहीतरी खायला करावे असं प्रत्येकाला वाटतं. अशा वेळी मस्त फक्कड मेजवानीचा बेत आखला जातो. पण जर कधी पाहुणे अचानक आले आणि तुम्ही स्वयंपाकाची तयारी केलेली नसेल तर या टिप्स वापरून पटकन बनवा स्वयंपाक… ज्यामुळे घरात तुमच्या कौतुकाचे गोडवे गायले जातील आणि तुम्हाला उत्तम पाहुणचार केल्याचे समाधानही मिळेल.

असा करा झटपट स्वयंपाक –

घरात अचानक पाहुणे आले अथवा स्वयंपाक वाढवण्याची वेळ आली तर तुमच्याकडे पाककलेचे हे कौशल्य असायलाच हवे.

सर्वात आधी थोडा वेळ घ्या आणि विचार करा –

स्वयंपाकाला सुरूवात करण्यापूर्वी पाच मिनीट विचार करा आणि काय करायचं आहे ते ठरवा. कारण जर अशा वेळी तुम्ही जास्त पदार्थ बनवत बसला तर तुम्हाला खूप वेळ लागेल. पण पुलाव, पावभाजी, कढीभात, दालखिचडी, बिर्याणी, पास्ता, थालीपिठ, पराठे असे काही पदार्थ तुम्ही कमी वेळातही पटकन बनवू शकता. अशा वेळी चायनिज, पास्ता, पिझ्झा सारखे वन पॅन मिल जास्त फायद्याचे ठरतात. त्यामुळे काय बनवणार याचा विचार करून थेट तयारीलाच लागा. भाज्या आणि फळं झटपट कापण्यासाठी सोप्या किचन टिप्स

गॅसवर पाणी गरम करत ठेवा –

पटकन स्वयंपाक करायचा असेल तर सोपा मार्ग म्हणजे एका भांड्यात पाणी गरम करणे. कारण तुम्हाला पुलाव करायचा असो वा एखादी करी जर तुमच्याकडे गरम पाणी असेल तर तुमचा स्वयंपाकाचा वेळ नक्कीच वाचू शकतो.

ADVERTISEMENT
Tips to Help You Cook Faster in Marathi

स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स

फ्रीजमधील साहित्य बाहेर काढून ठेवा –

एकदा पुलाव, भाजी, करी काय करायचं ठरलं की त्यानुसार फ्रीजमध्ये असलेलं साहित्य आधी बाहेर काढा. ज्यामुळे ते सामान्य तापमानाला येईल आणि तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचेल. कारण फ्रीजमधील तापमान आणि अन्नपदार्थ शिजवण्याचे तापमान यात फरक असेल तर तुमचे पदार्थ लवकर शिजत नाहीत. अंडी, मटन, चिकन, चीज, बटर असे पदार्थ वेळीच बाहेर काढून ठेवणं शहाणपणाचे ठरेल. किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स

स्वयंपाकाची रूपरेषा ठरवा –

एकदा काय करायचं हे ठरलं की पदार्थ तुम्ही एका मागोमाग एक कसे करणार हे ठरवा. त्यानुसार कृती करायला लागा. ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. समजा तुम्ही भाजी, बिर्याणीचा भात शिजत ठेवल्या असतील तर त्या वेळेत पटकन पोळ्यांचे कणीक मळून घ्या, भाज्या चिरून घ्या, पापड तळून घ्या, कोथिंबीर करून ठेवा. ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. आजकाल प्रत्येकाकडे तीन ते चार बर्नरच्या शेगड्या असतात, ओव्हन, एअर फ्रायर असतात. त्यामुळे काही पदार्थ त्यात बनवले तर झटपट स्वयंपाक तयार होऊ शकतो. 

कुकर आणि उथळ आणि पसरट भांडी वापरा – 

लवकर स्वयंपाक करण्याची आणखी एक सोपी युक्ती म्हणजे स्वयंपाकासाठी योग्य भांड्यांची निवड करणे. जर तु्म्ही थोडी पसरट आणि उथळ भांडी, पॅन स्वयंपाकासाठी वापरले तर तुमचा स्वयंपाकाचा वेळ नक्कीच वाचेल. कारण अशा भांड्यांना गरम होण्यासाठी कमी वेळ लागेल आणि त्यात जास्त अन्न एकाच वेळी तयार होईल. कुकरमध्ये अन्नपदार्थ शिजवणे घाईच्या वेळी सोपे जाते. यासाठी बटाटे, चिकन, मटण, बिर्याणीचा भात, भाज्या शिजवण्यासाठी कुकरच वापरा.

ADVERTISEMENT

आठवड्याची तयारी करून ठेवा –

तुमच्याकडे वरचेवर पाहुणे येत असतील तर हा बेस्ट पर्याय ठरेल. जर तुम्ही आठवड्याच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली तर आयत्या वेळी स्वयंपाक जास्तीचा करावा लागला तरी सोयीचं ठरतं. यासाठी दर आठवड्याचे लसूण आल्याची पेस्ट, ओले खोबरे, भाज्या निवडणे, व्हेजिटेबल आणि चिकन स्टॉक बनवणे, मसाले वाटण करून ठेवणे, दाण्याचा कूट बनवणे अशी तयारी करून ठेवा. ज्यामुळे झटपट स्वयंपाक करणं सोपं जाईल. 

01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT