चंदनाचा सुगंध पूजापाठ करताना मनाला प्रसन्न करतो. दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा असो वा एखादा सण चंदनाशिवाय तो पूर्ण होत नाही. सुंदर दिसण्यासाठी अनेक फेसपॅक अथवा सौंदर्योत्पादनात चंदन, चंदन पावडर, चंदनाचे तेल वापरलं जातं. तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात चंदन अथवा चंदन पावडर असतेच. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास असू दे अथवा चेहऱ्यावरील एखादी समस्या त्यावर चंदनाचा पॅक अथवा चंदन उगाळून लावलं की पटकन आराम मिळतो. यासाठीच जाणून घ्या चंदनाची पारख करण्याच्या या काही सोप्या टिप्स.
चंदनाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या
चंदनाचे प्रकार
भारतात विविध प्रांतामध्ये चंदनाची लागवड केली जाते. भारताबाहेरही चंदन विकत मिळतं. मात्र भारतात चंदनाचे मुख्य दोन प्रकार आढळतात. एक चंदन आणि दुसरं रक्तचंदन. चंदन पिवळट रंगाचं असतं तर रक्त चंदन हे लाल रंगाचे असते. लाल रंगाचे रक्तचंदन बऱ्याचदा त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं. तर चंदन देवपूजा, सौंदर्यसाधने, औषधोपचारांसाठी वापरलं जातं. चंदन एक दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे तिची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. सहाजिकच चंदनाचे गुणधर्म आणि कमी पूरवठा यामुळे ते महाग असते. चंदन महाग असल्यामुळे ते विकत घेताना पारखून घ्यायला हवं. कारण आजकाल बाजारात कोणत्याही लाकूड अथवा पावडरला चंदनाचा सुंगध देऊन विकलं जाण्याची शक्यता असते. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
लाल चंदनमुळे कमी होतील चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग
चंदनाची पारख करण्यासाठी सोप्या टिप्स
या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही प्युअर चंदन खरेदी करू शकता.
- नामांकित दुकानदाराकडून चंदन विकत घ्या कारण त्यांच्याकडे चंदन विकण्याची अधिकृत परवानगी असते.
- दुकानाच्या वेबसाईटवर इतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया असतात त्या वाचून मग निर्णय घ्या.
- लोकल मार्केटमध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे.
- चंदन पावडरचे टेक्चर पाहा. जर ते खूप गाळलेले असेल तर चंदन पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे.
- सुगंध पाहा चंदनाचा सुगंध मंद असतो पण भेसळ असेल तर ती लपवण्यासाठी उग्र चंदनाचा गंध त्यात मिसळण्यात येतो. या प्रमाणावरून चंदन ओळखता येते.
- जर तुम्ही विकत घेतलेले चंदन अथवा चंदन पावडर स्वस्त असेल तर तुमची भेसळयुक्त चंदन देऊन फसवणूक केली जाऊ शकते. कारण खरे चंदन खूप महाग असते ते स्वस्तात देणे पडवणारे नाही.
- अधिकृत लोगो अथवा ट्रेडमार्क असलेल्या विक्रेत्याकडून चंदन विकत घेणे योग्य मार्ग आहे.
- चंदनाचे लाकूड विकत घेताना त्यातील थोडा तुकडा जाळा. कारण जर ते खरे असेल तर जळताना शेवटपर्यंत त्याचा सुंगध येत राहिल. बनावट लाकडाचा सुगंध शेवटपर्यंत टिकणार नाही.
- चंदनाचे लाकूड थोडे रगडल्यास त्याला चंदनाचा मंद सुगंध येईल याउलट बनावट लाकडात हा सुगंध उग्र असेल.
चंदन पाउडर फेसपॅकचे फायदे (Chandan Powder Face Pack In Marathi)