थंडी सुरू झाली की प्रत्येक माणसाच्या शरीरानुसार, वेगवेगळ्या समस्या होत असतात. काही जणांना सायनसच्या समस्या होतात तर काही जणांना सर्दीचे वेगवेगळे त्रास होतात. काही जणांना नाकातून पाणी येणे, खोकला होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर काही जणांना सर्वता जास्त त्रास होतो तो म्हणजे थंडीमध्ये नाक थंड होण्याचा. काही जणांना रात्रभर गोधडी ओढून घेतली तरीही शरीर गरम राहते मात्र नाक इतके थंड होते की, त्यामुळे रात्रभर त्रास होतो आणि झोपही येत नाही. नाक थंड झाल्यावर लवकर सुन्न होते आणि त्यामुळे थंडी सर्दी होणे अत्यंत कॉमन आहे. पण थंडीमध्ये नाक नक्की थंड का होते आणि यापासून दूर कसे राहायचे आणि यावर उपाय काय हे आपण या लेखातून पाहणार आहोत.
थंडीत नाक थंड का होते?
थंडीमध्ये नाक थंड होणे हे अत्यंत सामाईक लक्षण आहे. याच्यामागे ऋतुंमधील बदल यासह तुमच्या शरीराचे तापमानही तितकेच महत्त्वाचे ठरते. नाक थंड होण्याची अनेक कारणे असतात –
तुमचे शरीर थंड होणे – रक्ताचा प्रवाह हा हात, पाय आणि नाक याठिकाणी अत्यंत सौम्य होत असतो आणि थंडीच्या दिवसात तर रक्ताचा प्रवाह हा मुख्य अंगाच्या दिशेने अधिक होतो, ज्यामुळे शरीराचे फंक्शन योग्य होऊ शकते. हेच कारण आहे की, नाक, कान, हात आणि पाय हे अधिक प्रमाणात थंड होतात. या अवयवांवर अधिक पटकन परिणाम होतो.
थायरॉईडची समस्या – नाक थंड होण्याचे कारण तुमचे असंतुलित थायरॉईडदेखील असू शकते. असे हायपोथायरॉईडिज्म तेव्हाच होते जेव्हा तुमचे शरीर अधिक थंड होते अथवा अशी परिस्थिती उद्भवत नाही.
निमोनिआ – तुमचे शरीर जेव्हा गरजेपेक्षा अधिक थंड होते आणि शरीर जेव्हा थंडीमध्ये अधिक प्रतिसाद देते तेव्हा तुम्हाला निमोनिआ झाली असण्याचीही शक्यता असते. अशावेळी नाकाचा रंगदेखील बदलतो. तसंच नाक अधिक पांढरे, निळ्या रंगाचे दिसते आणि अधिक सुन्न होते
ब्लड शुगर लेव्हल – हेदेखील थंडीमध्ये नाक थंड होण्याचे कारण असू शकते. तुमचे अंग सुन्न होते. वास्तविक जेव्हा रक्तातील साखरेची पातळी अधिक होते तेव्हा नाक अधिक थंड होते. नाक सुन्न होणे हे मधुमेह असल्यास जर होत असेल तर हे नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. तर अशावेळी तुम्हाला त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
याशिवाय काही व्यक्तिगत आरोग्याच्या समस्यांमुळेही नाक सुन्न होते आणि नाक थंड होण्याची समस्या निर्माण होते. हृदयाचा आजार, फ्रॉस्ट बाईट इत्यादी समस्यांमध्येही हा त्रास होतो.
कसे ठेवावे आपले नाक गरम?
आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नाक थंडीच्या दिवसात कसे गरम ठेवावे. अधिक थंडी असल्यास, नाक गरम ठेवण्यासाठी तुम्हाला काही पर्यायांचा वापर करता येतो
- रोज वाफ घेतल्यामुळे नाकाला अधिक गर्मी मिळते आणि त्याप्रमाणेच सायनस असेल तर निघून जाण्यास मदत मिळते
- जेव्हा थंडीत तुम्ही घराबाहेर निघता तेव्हा तुम्ही नाक स्वेटर अथवा मफलच्या सहाय्याने झाकून घ्या. असं केल्यामुळे तुमचे नाक गरम राहाते
- गरम सूप नेहमीच थंडीच्या दिवसात फायदेशीर ठरते. नाकासाठी तुम्ही चिकन सूप, हॉट अँड सॉर सूप, मनचाव सूप अशा पर्यायांचा वापर करा. ज्यामध्ये काळ्या मिरीचा वापर करण्यात आला असेल.
- नाक गरम ठेवण्यासाठी तुम्हाला चहा अथवा कॉफीचाही वापर करता येईल
- कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तसंच थंडीच्या दिवसात कोमट पाण्याचा वापर नेहमी करा ज्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा राहत नाही
या सर्व टिप्सचा वापर केल्यानंतरही तुमच्या नाकाला जर सतत थंडी वाजत असेल आणि नाक थंडच राहात असेल तर तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांना नक्की संपर्क करा आणि कोणत्याही आजाराचे तर हे लक्षण नाही ना याची तुम्ही शहानिशा करून घ्या. स्वतःच्या मनाने कोणतेही औषधोपचार न करता तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक