मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मात्र बऱ्याचदा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे मासिक पाळी देखील कोणत्याही क्षणी येते. दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं. काही महिलांमध्ये मासिक पाळीचा फ्लो हा साधारणपणे तीन-चार दिवस असतो. तर काही महिलांना अगदी पाच ते सात दिवस मासिक पाळी येते. प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात. तर काहींची कंबर या दिवसांमध्ये खूप दुखते. कोणाच्या छातीमध्ये जडपणा येतो तर कुण्याच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी काही दिवस डोकेदुखीचा त्रास होतो तर काहींना मासिक पाळी सुरू असताना पोटात असह्य वेदना होतात. थोडक्यात प्रत्येक महिलेला मासिक पाळी सुरू असताना वेदना, क्रॅम्प सहन करावेच लागतात. शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. यासाठीच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहीत असणे आवश्यक आहे.
मासिक पाळी आल्यावर पोटात का दुखते याचं उत्तर असं की, या काळात गर्भाशय रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे संकुचित होत असल्यामुळे या वेदना जाणवतात. गर्भाशयाला रक्ताचा पूरवठा अपूरा झाल्यामुळेही या वेदना जाणवू शकतात. या वेदना मुख्यतः ओटीपोट आणि खालच्या भागात जाणवतात. कधी कधी यामुळे कंबरेतही वेदना होतात. मात्र हा त्रास काही काळापुरता आणि तात्पुरता असतो. यावर मासिक पाळी पोट दुखणे उपाय केल्यामुळे त्वरित आराम मिळू शकतो. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक क्रिया असल्यामुळे मासिक पाळीत पोट दुखणे याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही. फारच असह्य त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
shutterstock
मासिक पाळीत प्रत्येकीला जाणवणाऱ्या वेदना या कमी जास्त असू शकतात. त्यामुळे तुमच्या त्रासानुसार तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकवल्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. कारण यामुळे तुमच्या ओटीपोटातील स्नायू आणि गर्भाशयाचे स्नायू रिलॅक्स होतात. स्नायूंना आराम मिळाल्यामुळे त्यांचे संकुचित होणे थांबते. ओटीपोटाजवळील रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या ओटीपोटातील वेदना कमी होतात. घरच्या घरी करण्यासारखा हा अतिशय सोपा उपाय आहे. गरम पाण्याची पिशवी तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये विकत मिळते. त्यामध्ये गरम पाणी भरा आणि पोट शेकवा. आजकाल यासाठी वीजेवर गरम होणारे हिट पॅडही मिळतात. जे कुठेही वापरण्यासाठी अतिशय सोयीचे असतात.
गरम पाण्याने पोट शेकवण्यापूर्वी तुम्ही पोटाला इसेंशिअल ऑईल अथवा नारळाच्या तेलाने मसाज करू शकता. तेलामध्ये तुमचे स्नायू रिलॅक्स करण्याची क्षमता असते. कारण मसाज केल्यामुळे तेल तुमच्या त्वचेत मुरते आणि पोटातील स्नायूंना रिलॅक्स करते. मसाजमुळे तुमच्या ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळेही तुमच्या ओटीपोटातील वेदना कमी होतात. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, बदामाचे तेल अथवा कोणतेही त्वचेला लावायचे तेल वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा तेल जोरजोरात पोटावर रगडू नका. हलक्या हाताना गोलाकार मोशनमध्ये पोटाला मसाज द्या.
जर तुम्ही घराबाहेर असाल आणि तुम्हाला पोटाला तेल लावणं अथवा शेकवणं शक्य नसेल तर तुम्ही पटकन एखादी ओटीसी पेनकिलर घेऊ शकता. अॅस्प्रिन अथवा बुफ्रीन सारखी ओटीसी औषधे या काळात तुमच्या बॅगेत असायला हवी. कारण या औषधांमुळे तुम्हाला ऑफिस अथवा कॉलेजमध्ये असताना पटकन आराम मिळू शकतो. ऑफिसमध्ये एखादं महत्त्वाचं प्रेझेंटेशन अथवा मिटिंग असेल तर अशा वेळी मासिक पाळीच्या वेदनेपासून सुटका मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मात्र लक्षात ठेवा सतत अशी औषधे घेण्याची सवय स्वतःला लावू नका. त्यापेक्षा इतर घरगुती औषधे या काळात घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल.
shutterstock
काही संशोधनानुसार मासिक पाळीमध्ये ओटीपोटातील स्नायू संकुचित झाल्यामुळे होणाऱ्या वेदना व्यायामामुळेही बऱ्या होऊ शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर हळू हळू मासिक पाळीत पोट दुखणे कमी होत जाते. यासाठी स्वतःला योगासने, एरोबिक्स व्यायाम, चालणे, सायकल चालवणे अशा व्यायाम प्रकाराची सवय लावा. आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावली तर मासिक पाळीचा हा त्रास नक्कीच कमी होईल.
कोमट पाण्यात डुंबण्यामुळे तुमच्या शरीराचे सर्वच स्नायू रिलॅक्स होतात. अंगाला मालिश केल्यावर कोमट पाण्यात अंघोळ करणं अथवा कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये काही काळ डुंबणे तुम्हाला नक्कीच आराम देणारं असेल. यासाठी जर तुम्ही घरी असाल तर हा प्रयोग नक्की करा. कारण यामुळे काही मिनिटातच तुमच्या मासिक पाळीत पोटात होणाऱ्या वेदना कमी होतील. त्यासोबतच जाणून घ्या एकाच महिन्यात का येते दोनदा मासिक पाळी
शरीराचे रक्ताभिसरण सुधारले की तुमच्या शरीरात होणाऱ्या वेदनाही कमी होतात. यासाठीच नियमित व्यायाम आणि योगासने करणे खूप गरजेचं आहे. योगासनांमुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. मासिक पाळीत हॉर्मोनल बदलांमुळे तुमच्या मूडवरही परिणाम झालेला असतो. यासाठीच नियमित योगासनांची सवय लावा. आठवड्यातून कमी कमी साठ मिनिटे योगा केल्यामुळे तुमच्या शरीराप्रमाणेच मनावरही चांगला परिणाम होतो.
मासिक पाळी सुरू झाल्यावर ओटीपोटात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही एक कप कॅमोमाईल टी पिऊ शकता. कारण या चहामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या पोटातील स्नायूनां आराम मिळतो आणि वेदनेमुळे होणारा दाह कमी होतो. या चहामुळे ज्या महिलांना या काळात मळमळ, उलटी, डोकेदुखीचा त्रास होतो तो त्रासही कमी होऊ शकतो. पटकन फ्रेश होण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी घरच्या घरी एक कप असा चहा घेणं हा एक सोपा उपाय असू शकतो. मासिक पाळी सुरू होताना आठवडाभर आधी या कारणांमुळे तुम्हाला जाणवतो मासिक पाळीचा थकवा
मासिक पाळीत स्वच्छता राखणं आणि स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. ओटीपोटातील स्नायू डिहायड्रेशनमुळेही ताणले जाऊ शकतात. ज्यामुळे मासिक पाळीत पोटात दुखते. यासाठीच या काळात भरपूर पाणी, पेय, सरबत प्या. दिवसभरात आठ ग्लास पाणी पिण्यामुळे तुम्ही कायम हायड्रेट राहाल. शिवाय त्यासोबत नियमित अंघोळ आणि मासिक पाळीतील इतर स्वच्छता राखा. ज्यामुळे तुम्हाला कोणतेही इनफेक्शन होणार नाही.
अनेक आरोग्य समस्यांवर आजकाल अॅक्युप्रेशर या चायनिज आरोग्य उपचारांचा वापर केला जातो. या उपचारांमध्ये बोटांनी योग्य दाब देऊन शरीरातील काही महत्त्वाचे भागांवर उपचार केले जातात. असं म्हणतात की हाताचे अथवा पायाचे तळवे यावर शरीरातील प्रत्येक अवयवांचे केंद्रबिंदू असतात. ते योग्य प्रेशरने दाबल्यास त्या अवयवांमध्ये जाणवणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात. मात्र यासाठी तुम्ही योग्य तज्ञ्जांची मदत घेणं नक्कीच गरजेचं आहे.
मासिक पाळीच्या काळात शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवणारे आणि शरीराचे पोषण करणारे पदार्थ खावे. या काळात फळं, फळांचे रस, पालेभाज्या, आल्याचा रस, ओट्स , भरपूर पाणी, कॅल्शिअमयुक्त पदार्थ, दही असे पदार्थ खावे.
मासिक पाळीच्या काळात वेदना दूर करण्यासाठी कॅल्शिअमयुक्त पदार्थ खावे. दूधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात दूध, दही घेणं नक्कीच फायद्याचे असेल.
मासिक पाळीच्या वेदना या नैसर्गिक असल्यामुळे तुम्ही यावर वर मासिक पाळी पोट दुखणे उपाय करू शकता. मात्र हे उपाय करूनही तुम्हाला असह्य वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.