ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

आजकालच्या धकाधकीच्या काळात स्वयंपाक पटकन करण्यासाठी अनेक आधुनिक साधनसामुग्रीची मदत होते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फ्रीज तर एक वरदानच आहे. कारण फ्रीजमध्ये अन्नपदार्थांसोबतच फळं, भाज्या, दूध असे अनेक नाशिवंत पदार्थ बरेच दिवस टिकवून ठेवता येतात. पण फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या टिकवून ठेवण्यासाठी ते व्यवस्थित साठवून ठेवायला हवे. नाहीतर जास्त दिवस ठेवल्यानंतर फळं आणि भाज्या ओलाव्यामुळे सडू शकतात. यासाठीच जास्तीत जास्त दिवस भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये टिकवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

फ्रीजमध्ये कशा साठवून ठेवाव्या भाज्या आणि फळं

आजकाल फ्रीजमध्ये खूप वेगवेगळे प्रकार मिळतात. डबल डोअर, ट्रिपल डोअर आणि चक्क कपाटाएवढे मोठे अवाढव्य फ्रीजदेखील आजकाल सर्वांकडे असू  शकतात. या फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्या यासाठी वेगवेगळे सेक्शन असतात. जसं फ्रीजच्या जवळचा भाग हा डेअरी प्रॉडक्ट ठेवण्यासाठी असतो. फ्रीजचे तापमान या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या पद्धतीने नियंत्रित करता येते. मासे अथवा मटण नेहमी फ्रीजरमध्ये साठवले जाते. त्याचप्रमाणे भाज्या आणि फळं ठेवण्यासाठी निरनिराळे रॅक असतात. ज्यामुळे तुम्ही सतत फ्रीजचा दरवाजा उघडला तरी त्या ठिकाणचे तापमान नियंत्रित राहते. 

instagram

ADVERTISEMENT

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत

शक्य असल्यास फळं फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेरच ठेवावी. मात्र काही फळं जी लवकर खराब होतात जसं की कलिंगड, पपई, स्टॉबेरी तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. मात्र सर्व फळांचं पॅकिंग वेगवेगळं असावं. कारण प्रत्येकाची पिकण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. भाज्या स्वच्छ निवडून, धुवून, सुकवून मगच फ्रीजमध्ये ठेवाव्या. ज्यामुळे त्या जास्त काळ टिकू शकतात. कोथिंबीर अथवा पालेभाज्या मुळांसकट फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. तसंच सोललेला लसूण फ्रेश राहण्यासाठी असा ठेवा साठवून

फ्रीजचे तापमान नियंत्रित करा

फ्रीजमध्ये वेगवेगळ्या सेक्शनचे  तापमान नियंत्रित करण्याची सोय असते. त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये कोणतं सामान ठेवलं आहे आणि त्याला किती तापमानाची गरज आहे यावरून ते व्यवस्थित सेट करा. कारण पालेभाज्या ठेवलेल्या भागाचं तापमान अती कमी असेल तर थंडाव्यामुळे त्या लवकर खराब होऊ शकतात. पालेभाज्या नेहमी एखाद्या हवेशीर बॉक्स अथवा डब्ब्यात सुती कापड अथवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्या. ज्यामुळे अतिरिक्त ओलावा कापड अथवा टिश्यू शोषून घेऊ शकतो.  शिवाय त्यातील कापड अथवा पेपर सतत बदलत राहावा. 

instagram

ADVERTISEMENT

फ्रीजमध्ये भाज्या आणि फळं साठवण्यासाठी सोप्या टिप्स

भाज्या फळं फ्रीजमध्ये साठवण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. 

  • फळं अथवा भाज्या कधीच प्लास्टिकच्या हवाबंद पिशव्या अथवा डब्यात ठेवू नका.
  • भाज्या आणि फळं एकत्र साठवून ठेवू नका असं केल्यास त्या लवकर सडतात.
  • कंदमुळे साठवून ठेवण्यापूर्वी त्याच्या देठाकडचा भाग कापून मग त्या साठवून ठेवा. 
  • नाजूक फळं जसे की स्टॉबेरी, ब्लू बेरी, अंजीर अथवा टोमॅटो सारख्या भाज्या एकमेंकांवर ठेवू नका.
  • पालेभाज्या निवडून, धुवून आणि सुकवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. 
  • एखादी भाजी अथवा फळं खराब झालं तर ते लगेच इतर भाज्या आणि फळांपासून वेगळं करा नाहीतर त्यामुळे इतर भाज्या अथवा फळं खराब होतात. 

मटार सोलून ते प्रक्रिया करून मगच साठवून ठेवावे. यासाठी जाणून घ्या ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप टिप्स

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

सुकामेवा जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

31 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT