ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
tips-to-take-care-of-gemstone-jewellery

जेमस्टोन दागिन्यांची अशी घ्यावी काळजी, टिकतील अधिक काळ

दागिने म्हटले की महिलांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय, सोन्याचे दागिने असोत वा अगदी ऑक्सिडाईज्ड दागिने ते खरेदी करून त्यांना जपणे आणि वेळोवेळी कार्यक्रमांना योग्य दागिन्यांची निवड करून घालणे हा महिलांचा आवडता छंद आहे. पण खरे दागिने अत्यंत महाग असतात आणि काही वेळा सोने, हिऱ्याचे दागिने याची चमक फिकी पडते. तर काही वेळा दागिने वर्षानुवर्षे लॉकरमध्ये ठेवल्याने त्यांना पॉलिशची गरज भासते. जेमस्टोन दागिने (Gemstone Jewellery) महाग असते त्यामुळे ती अधिक काळ टिकविण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही या टिप्स फॉलो करा आणि आपल्या दागिन्यांची व्यवस्थित काळजी घ्या. 

अधिक वाचा – नववधूसाठी आधुनिक भारतीय दागिन्यांचा ट्रेंड, लेटेस्ट डिझाईन्स

हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery)

Freepik

हिरा म्हणजे प्रत्येक महिलेसाठी एक स्वप्नं असतं. आपल्याकडे हिऱ्याचा किमान एक तरी दागिना असायलाच पाहिजेच असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण हिरा प्रत्येकाला फळतोच असं नाही. पण ज्यांच्याकडे हिरा आहे त्यांना हिऱ्याची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत करण्याची गरज नाही. हिरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात साबण घालून त्या पाण्यात हिरा घालून स्वच्छ करून शकता. याशिवाय माईल्ड क्लिंन्झर ज्यामध्ये अमोनिआ नसेल याच्या मदतीने तुम्ही हिऱ्यांचे दागिने स्वच्छ ठेऊ शकता. लक्षात ठेवा हिऱ्यांच्या दागिन्यांवर कधीही अमोनिआचा वापर करू नका. याशिवाय तुम्ही व्होडका अथवा मेकॅनिकल क्लिनरच्या मदतीनेही हिऱ्यांचे दागिने स्वच्छ करू शकता. त्यामुळे तुम्हाला सतत दागिन्यांच्या दुकानात जाऊन स्वच्छ करून घेण्याची गरज भासणार नाही. 

अधिक वाचा – सिल्व्हर प्लेटेट दागिने आहे सध्याचा ब्रायडल ट्रेंड

ADVERTISEMENT

कोरल ज्वेलरी (Coral Jewellery)

Freepik

कोरल दागिने हे अत्यंत नाजूक दागिने असतात. याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागते. हे दागिने स्वच्छ करण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नये. इतकंच नाही तर मेकॅनिकल क्लिनर अथवा रासायनिक गोष्टींपासून अथवा हार्श ब्रशपासूनदेखील या दागिन्यांना दूरच ठेवा. याच्या स्वच्छतेसाठी तुम्ही एखादा मऊ आणि मुलायम कपडा घ्या आणि अगदी हलक्या हाताने स्वच्छ करा. यासाठी दुकानदार सहसा एथिल अल्कोहोलचा वापरही करतात. तुम्हीदेखील याचा वापर करू शकणार असाल तरच जोखीम घ्या. दागिन्यांची चमक वर्षानुवर्ष टिकून राहते. नियमित स्वच्छ कपड्याने साफ करून याची काळजी घेत राहा. 

पाचूचे दागिने (Emerald Jade Jewellery)

Freepik

पाचूचे दागिनेही महिलांना खूपच आपलेसे वाटतात. सोन्याचे, हिऱ्याचे आणि पाचूचे दागिने जास्त प्रमाणात आपल्याला महिला वापरताना दिसून येतात. पाचूच्या स्वच्छतेसाठी तुम्ही अगदी कोमट पाण्यात साधारण वॉशिंग पावडर मिक्स करा आणि आपले पाचूचे दागिने यामध्ये भिजवा. अत्यंत हलक्या हाताने हे स्वच्छ करा. याशिवाय तुम्ही नरम ब्रशचादेखील वापर करू शकता अथवा मुलायम कपड्याने याची स्वच्छता करा. मेकॅनिकल क्लिनर अथवा रासायनिक गोष्टींपासून हे दागिने दूरच ठेवा. याचा वापर केल्यास, दागिने खराब होऊ शकतात. इतकंच नाही तर पाचूचे दागिने नीट वापरण्यासाठी आणि याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी तुम्ही रिऑईलिंग करत राहा. 

अधिक वाचा – गणपतीच्या सणासाठी निवडा ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची स्टाईल

नीलम दागिने (Blue Sapphire Gemstone)

नीलम हा अत्यंत कठीण स्टोन आहे. याची काळजी घेणे मात्र अगदी सोपे आहे. या स्वरूपाचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात साधारण साबणाचा वापर करू शकता. तसंच तुम्ही हे दागिने स्वच्छ करण्यासाठी मेकॅनिकल क्लिनरचाही वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्याजवळ कोरल दागिने असोत वा हिऱ्यांचे दागिने. घरच्या घरी तुम्ही याची अत्यंत उत्तमरित्या काळजी या टिप्स वापरून नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी सतत दुकानदाराकडे जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र आपल्या दागिन्यांची स्वच्छता करताना अगदी हलक्या हाताने याची काळजी घेतली जाईल याकडे नक्की लक्ष द्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT