गोव्यात जाणे आणि धम्माल करणे हे सगळ्यांच्याच प्लॅनमध्ये असते. आता काही जणांचे प्लॅन यशस्वी होतात आणि काहींचे प्लॅन फ्लॉप. पण प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये हे गोव्याला जाणे हे असतेच. तुमच्याही बकेट लिस्टमध्ये गोवा असेल. तुम्हाला खास समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट करायचे असेल तर खास तुमच्यासाठी आम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स. शिवाय गोव्याचा असा भाग शेअर करणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही खास फोटो शूट करु शकता. चला जाणून घेऊया #goalover साठी फोटोशूटबद्दलची अधिक माहिती
कोव्हिड काळात फ्लाईटचे बुकिंग करताना या गोष्टी असू द्या लक्षात
फोटोशूटसाठी निवडा खास बीच
गोवा म्हटलं की खूप जणांना कलंगुट, बाघा, आरंबोळ,मीरामार हे बीचच माहीत असतात. या बीचवर प्रचंड गर्दी आणि नाईटलाईफ पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही फोटोशूटसाठी विचार करताना ही ठिकाणं तितकी परफेक्ट नाहीत. गोवा हे लहान राज्य असले तरी येथील काही बीचेस आणि ठिकाणं ही खूप गर्दीची नाही तर दर्दी लोकांसाठी खास आहेत. उदा.माजोरडा बीच, कोबा द रामा असे काही बीचेस आहेत जे खूप दूर आहेत. लोकांच्या संपर्कापासून लांब आहेत. जिथे हॉटेल्स किंवा टुरिस्ट खूप दिसणार नाहीत. कदाचित खाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या सोयींनी युक्त नाहीत. पण तरीदेखील ही ठिकाणं दिवस घालवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी खूपच सुंदर आहे. या ठिकाणी तुम्हाला सुंदर असे स्पॉट्स असल्यामुळे तुम्ही खूप फोटोज काढू शकता.
वेकेशनसाठी हॉटेल बूक करण्यापूर्वी या गोष्टी जरूर जाणून घ्या
फोटोशूटसाठी कपडे निवडा
फोटोशूट म्हटले की, कपडे आलेच. मुलींसाठी तर खास करुन कपडे हे फारच महत्वाचे असतात. पण गोव्याची पिकनिक करताना तुम्ही नेहमीच जास्त कपडे न घेता जा. यातचे कारण असे की, या ठिकाणी तुम्हाला बीच वाईब्स देणारे स्वस्त आणि मस्त कपडे मिळतात. जे तुम्हाला गोव्यात असल्याचा नक्कीच फिल देतात. त्यामुळे गोव्यात जाणार असाल तर इकडून कपडे घेऊन जाऊच नका. तुम्हाला अगदी 500 ते 1000 च्या ड्रेसेस आणि बिकिनीज मिळतात. जे तुम्ही इथेच घालून फेकून दिले तरी देखील चालू शकतात. फोटोशूटसाठी कपड्यांची निवड करताना तुम्ही लाँग ड्रेसेस, शॉर्ट पँट्स, बोहो जॅकेट्स असे कपडे निवडा. अजून थोडा गोवा फिल येण्यासाठी तुम्ही मस्त केसांना ब्रीड्स करुन घ्या. तुम्हाला ते नक्की आवडेल.
आरोग्याची काळजी महत्वाची
कोणतेही फोटोशूट करायचे म्हणजे काही वेळांचे बंधन पाळावे लागते. प्रोफेशल फोटोशूट करणाऱ्यांना काही खास वेळेतच फोटो काढायचे असतात. त्यांना सनराईज आणि सनसेटलाच फोटो काढायचे असतात. त्यामुळे तुम्हाला पहाटेच उठून जावे लागते. त्यामुळे अनेकदा सकाळी खाता येत नाही. पण अशी चूक करु नका. काही जणांना उपाशी राहिल्यामुळे त्रास होऊ शकतो. गोव्यात सगळे सुशेगात असल्यामुळे खूप जण सकाळी उठत नाही. नाश्त्याला या ठिकाणी काही खास पदार्थ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही काही ब्रँड निवडून सकाळीच तिथे चहा नाश्ता करुन घ्या. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस शूट करता येऊ शकेल.
काय आहे वॅक्सिन पासपोर्ट, कसा करावा उपयोग जाणून घ्या माहिती
आता गोव्यात खास फोटोशूट करताना तुम्ही या गोष्टींचा विचार करायला हवा.