गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अनेक कलाकरांना यामुळे एक नवी ओळख मिळाली. कौटुंबिक प्रकारातील ही मालिका आणि यामधील पात्र आजही अनेकांच्या लक्षात राहतील असे आहेत. या मालिकेतील दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी हिचा मालिकेत पुन्हा येण्यावरुन वाद सुरु असताना आता जेठालाल आणि टप्पू अर्थात अभिनेते दिलीप जोशी आणि राज अनदकत यांच्यामध्येही वाद सुरु असल्याचे समजत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप जोशी हे राजच्या एका वागण्यामुळे हैराण असून त्यांनी त्याला अनेकदा या विषयी सुचना केल्या आहेत. पण दुसरीकडे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे.
माधुरी दीक्षितच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, मोठा मुलगा अरिन झाला पदवीधर
काय आहे वाद ?
गेल्या 13 वर्षांपासून सुरु असलेली ही मालिका अतिशय शिस्तबद्ध आहे. इतक्या वर्षांमध्ये या मालिकेत कोणताही वाद कधीही झालेला नाही. यामधील काही महत्वपूर्ण पात्र नक्कीच बदलली गेली. टप्पूची भूमिका साकारणारा भाव्य गांधी याने देखील या मालिकेला रामराम केला यानंतर या मालिकेमध्ये अजून एकाची निवड झाली आणि आता या मालिकेत टप्पूची भूमिका राज अनदकत साकारत आहे. आता वादाचे कारण म्हणाल तर दिलीप जोशी या मालिकेच्या सेटवर दिलेल्या वेळी नेहमीच हजर असतात. त्यांना सेटवर येण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही. पण या मालिकेतील टप्पू हा कायम काही ना काही कारणास्तव सेटवर उशीर पोहोचतो. त्याच्या उशीरा पोहचण्यामुळे अनेकदा दिलीप जोशी यांना वाट पाहावी लागते. एकदा तर त्यांना चक्क 1 तासभर वाट पाहावी लागली अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच दिलीप जोशी हे राजवर नाराज असल्याचे म्हटले जाते. सिनिअर कलाकार असून त्यांना कामाची कदर आहे पण राजला नाही यासाठी त्यांनी त्याला सुनावल्याचेही बोलले जाते.
पुन्हा एकदा सुशांत सिं राजपूतच्या केसला वेग
दिलीप जोशींनी नाकारला वाद
एकीकडे त्यांच्या वादाची चर्चा जोर घेताना दिलीप जोशींनी दिलेल्या एका मुलाखतीत असा कोणताही वाद नाही असे म्हणत या गोष्टीवर पडदा टाकण्याचे काम केलेले आहे. पण या सोबतच त्यांनी त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचेही म्हटले जात आहे. पण POPxo मराठीकडे या संदर्भातील कोणतीही माहिती नाही. दरम्यान, दिलीप जोशींनीच हा वाद नाही असे म्हटल्यामुळे ही चर्चा आता बऱ्यापैकी मंदावली आहे.
राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी
दयाबेनचा वाद
दिलीप जोशींसोबत या मालिकेतील लक्षवेधी भूमिका साकारणारी दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिने देखील मालिकेला राम राम केला आहे. दिशाने प्रेग्नंसी दरम्यान या मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुम्हा एकदा मालिकेत येणार होती. पण तिने तिच्या सुट्ट्या वाढवल्यामुळे मालिकेलाही त्रास होऊ लागला. ती नसल्यामुळे सध्या ती अहमदाबादला गेली आहे असे दाखवण्यात आले. बरेच महिने ही मालिका तिच्याशिवाय सुरु होती. दया- जेठाची जोडी आणि त्यांचे विनोद पाहण्यात अनेकांना रस होता. पण या मालिकेत अद्यापही तिने पुनरागमन केलेले नाही. उलट तिला अनेकदा नोटिस पाठवून देखील ती या मालिकेत आली नाही. मध्यंतरीच्या काळात ती येण्याची चर्चा होत होती, पण अजूनही यावर कोणत्याही प्रकारचा शिक्कामोर्तब झालेला नाही. पण तिच्या जागी अन्य कोणाची नियुक्तीही केली जात नसल्यामुळे दिशाच येणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, जेठालाल टप्पू यांच्या वादाचे करण कळले असले तरी देखील हा वाद नसल्याचे दिलीप जोशींनी सांगितल्यामुळे हा विषय इथेच संपला असे मानावे लागेल.