ADVERTISEMENT
home / Diet
protein poisoning

सावधान, आहारात जास्त प्रोटीन घेतल्याने होऊ शकते प्रोटिन पॉयझनिंग

जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रथिने ही पहिली गोष्ट असते जी आपण आपल्या आहारात वाढवतो. असे म्हटले जाते की प्रथिनांचे सेवन केल्यास आपल्याला जास्त काळ भूक लागत नाही. प्रोटिन्स आपले स्नायू तयार करण्यास मदत करतात आणि तीव्र वर्कआउट्सनंतर सेल दुरुस्तीस प्रोत्साहन देतात. एवढेच नाही तर प्रथिने त्वचा टोन करण्यास, केसांची चमक वाढवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. प्रत्येकाने दररोज प्रत्येक जेवणात किमान प्रमाणात प्रोटिन्सचा समावेश करणे आवश्यक असते. तरीही बऱ्याच लोकांना नेमके किती प्रमाणात प्रोटीन खावे हे माहिती नाही. 

प्रोटीन्सचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु जर तुम्ही विचार न करता त्यांचे सेवन सुरू केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स व  प्रथिने हे तीन मॅक्रोन्यूट्रिएंट्स शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहेत. परंतु आहारात गरजेपेक्षा जास्त प्रथिने असल्यास व फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स नसल्यास शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. सध्या सगळीकडे हाय -प्रोटीन डाएटचे फॅड आले आहे. अशा वेळी जर आहार संतुलित  नसेल तर प्रोटीन पॉयझनिंग होऊ शकते. 

प्रोटीन पॉयझनिंग म्हणजे काय 

प्रोटीन पॉयझनिंग म्हणजे जेव्हा आहारात दीर्घ कालावधीसाठी फक्त प्रोटीन घेतले जाते आणि पुरेसे फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स नसतील तर अशावेळी असंतुलित आहारामुळे शरीराचेही संतुलन बिघडते व शरीर काही लक्षणे दाखवते त्याला प्रोटीन पॉयझनिंग असे म्हणतात. या स्थितीला  “रॅबिट स्टार्व्हेशन” किंवा “माल डी कॅरिबू” अशी इतर नावे देखील आहेत. जरी शरीराला प्रथिनांपासून पुरेशा कॅलरीज मिळतात, तरीही शरीराला सर्व कार्ये सुरळीत चालण्यासाठी फॅट्स आणि कर्बोदकांसारख्या इतर पोषक तत्वांची गरज असते आणि जेव्हा ते शरीराला योग्य प्रमाणात मिळत नाहीत तेव्हा कुपोषणासारखी परिस्थिती निर्माण होते. यकृत आणि मूत्रपिंडे प्रथिनांच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा प्रोटीन्सचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा रक्तातील अमोनिया, युरिया आणि अमीनो ऍसिडची पातळी वाढते आणि त्यामुळे प्रकृतीला धोका निर्माण होतो. असे होणे अत्यंत दुर्मिळ असले तरी, विविध डाएट्सच्या फॅड मुळे प्रोटीन पॉयझनिंगची शक्यता वाढलेली आहे. 

प्रोटीन पॉयझनिंगची लक्षणे काय आहेत?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुमच्या शरीराच्या प्रत्येक किलोग्रॅम वजनासाठी तुमच्या शरीराला एक ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. कार्बोहायड्रेट आणि फॅटशिवाय यापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्यास प्रोटीन पॉयझनिंग होऊ शकते. प्रोटीन पॉयझनिंगची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. 

ADVERTISEMENT

डिहायड्रेशन 

जास्त प्रमाणात प्रथिने तुमच्या मूत्रपिंडांवर नकारात्मक परिणाम करू शकतात कारण त्यांना मूत्रातून शरीराबाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडांना खूप कष्ट करावे लागतात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणूनच डॉक्टर,शरीराला पुरेसे पाणी आणि मिनरल्स मिळण्यासाठी आपल्याला भरपूर भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देतात.

वजन वाढणे

जास्त प्रमाणात प्रथिने तुमच्या आतड्यावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे पचनाच्या तक्रारींबरोबरच अनावश्यक वजन वाढू शकते.

नैराश्य 

ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात प्रथिने आणि कमी कार्बोहायड्रेट्सचे सेवन करतात त्यांना नैराश्य, चिंता, मूड स्विंग्स आणि नकारात्मक भावना यासारख्या मानसिक समस्यांचा धोका जास्त असतो.

श्वासाची दुर्गंधी 

आहारात कार्बोहायड्रेट्स व फॅट्स नसतील आणि केवळ संपूर्ण प्रथिने-आधारित आहार असेल तर अशावेळी श्वासाची दुर्गंधी येऊ शकते.  

ADVERTISEMENT

प्रोटीन पॉयझनिंगवर उपचार करणे अगदी सोपे आहे. आहारात जास्त चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश करणे आणि प्रथिनांचे सेवन कमी करणे हा यावर उपाय केला जातो. आपल्या मनाने कोणतेही फॅड-डाएट फॉलो न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहाराचे नियोजन करावे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT