चांगली त्वचा ही स्त्रियांचा वीक पॉईंट आहे. त्वचा चांगली राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न महिला करतात. चिरतरुण, डाग विरहीत, गुलाबी, चमकदार अशी त्वचा आपल्या सगळ्यांना हवी असते. त्वचा चमकदार राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला त्वचेची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घेता? असा प्रश्न तुम्हाला केला तर तुमच्याकडे त्याची बरीच उत्तरे असतील. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही 5 असे स्किनकेअर प्रॉडक्ट वापराला हवे जे तुमच्या त्वचेसाठी पुरक असतील. तुमच्या त्वचेच्या रुटीनसाठी आम्ही असेच 5 स्किनकेअर प्रॉडक्ट निवडले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत.
SKIN VITALITY SHEET MASK – ROSE – 20GM
सध्याच्या परिस्थितीत तुमच्या त्वचेला सगळ्यात जास्त त्रास होत असेल तर तो म्हणजे प्रदूषणाचा. दिवसभर काम करुन घरी परतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही चेहरा धुता त्यावेळी तुम्हाला त्वचेमध्ये झालेला बदल नक्की जाणवत असेल. पण चेहरा धुणे म्हणजे त्वचा प्रदूषणविरहीत होणे असे अजिबात नाही. तुमच्या त्वचेच्या पोअर्सच्या आत जाऊन ही घाण बसलेली असते. तिला बाहेर काढण्यासाठी Organic Harvest चा हा शीट मास्क खूपच फायद्याचा आहे. आठवड्यातून एकदा जरी तुम्ही तुमच्या त्वचेला हा शीट मास्क लावला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये असलेले घटक स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी चांगल्या असतात. याशिवाय हे प्रॉडक्ट पॅराबिन फ्री, मिनरल ऑईल फ्री असते त्यामुळे त्याचा फायदा त्वचेला होण्यास मदत मिळते.
ORGANIC VITAMIN A FACE TONER
चेहऱ्याच्या रोजच्या रुटीनमध्ये फेस टोनर हे असायलाच हवे. फेस टोनरच्या वापरामुळे चेहऱ्यावरील पोअर्स हे बंद होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर त्वचेच्या पोअर्सची स्वच्छता करण्यास मदत मिळते. विटॅमिन A असलेल्या टोनरमध्ये ब्रोकोली,ॲलोवेरा यांचे घटक असतात. त्वचेला अधिक चांगले काम करण्याचे काम हे टोनर करत असतात. तुम्ही मेकअप काढल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर तुम्ही या टोनरचा वापर करायला हवा. पुरुष आणि स्त्री या दोघांसाठीही हे प्रॉडक्ट सुटेबल आहेत. त्यामुळे याचा तुम्ही त्याचा नियमित वापर करा
MYGLAMM 3% HYALURONIC ACID HYDRATING SERUM ENRICHED WITH KAKADU PLUM & MARINE ALGAE
त्वचा हायड्रेट होण्यासाठी सीरम हे खूपच जास्त गरजेचे असते. हल्ली अनेक जण हायरोलोनिक सीरम वापरतात. या सीरममुळे त्वचेला आवश्यक असलेले हायड्रेशन मिळते. त्वचेला हे सीरम लावल्यानंतर त्वचेला आवश्यक असलेला ओलावा मिळतो. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही याचा समावेश करायला हवा. त्वचा डल झाली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही याचा वापर रोज करायला हवा. अगदी थोडेसे सीरम घेतले तरी देखील ते तुमच्या त्वचेला पुरेसे असते.
MANISH MALHOTRA METHI FACE SCRUB GEL
त्वचेला स्क्रब करणे हे देखील तितकेच जास्त गरजेचे असते. त्वचेला योग्य स्क्रब मिळाले तर तुमची त्वचा अधिक चांगली होते. या स्क्रबमध्ये ॲलोवेरा जेल, मेथी, आवळा, वॉलन्ट असे घटक असतात. त्यामुळे त्वचा स्क्रब होण्यास मदत मिळते. इतर स्क्रबमुळे त्वचा डिहायड्रेट होत असेल पण या स्क्रबमुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल यामध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेवरील आणि पोअर्स आतील घाण काढून त्वचा स्वच्छ करण्याचे काम करते. याचा उपयोग तुम्ही आठवड्यातून एकदा झोपण्याच्या आधी करायला काहीच हरकत नाही.
MANISH MALHOTRA ROSE LIP MOISTURISING GEL
आपल्या ओठांची काळजी हे देखील स्किनकेअरचाच एक भाग आहे. त्वचा मॉश्चराईज करण्यासाठी तुम्ही हे लिप मॉश्चराईजिंग जेल वापरायला हवे. ओठांवर हे जेल वापरल्यामुळे ओठांवरील मृत त्वचा कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये रोझ, बीटरुट आणि ग्रेप सीड ऑईल असते. त्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करतात. ओठ हा चेहऱ्यावरील असा भाग आहे जो उठून दिसला तर चेहरा अधिक चांगला दिसतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास हे देखील तुमच्या स्किनकेअरमध्ये समाविष्ट करायला हवे.
आता तुमच्या स्किनसाठी हे 5 स्किनकेअर प्रॉडक्ट नक्की निवडा