ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बॉलीवूडमधील 10 असे चित्रपट जे कुटुंबाबरोबर पाहू नाही शकणार

बॉलीवूडमधील 10 असे चित्रपट जे कुटुंबाबरोबर पाहू नाही शकणार

बॉलीवूडमध्ये वेगवेगळया विषयावर चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामध्ये रोमँटिक, कॉमेडी, बायोपिक, ऐतिहासिक, फॅमिली ड्रामा असे अनेक विषय असतात. पण या सगळ्यामध्ये काही असे चित्रपटही प्रदर्शित करण्यात येतात जे अतिशय एरोटिक असतात. शिवाय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कमाल केली आहे. वास्तविक तुम्ही हे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता पण तुमच्या कुटुंबाबरोबर नक्कीच पाहू शकत नाही. आम्ही अशा काही टॉप एरोटिक चित्रपटांची यादी बनवली आहे. जे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर पाहू शकणार नाही. या चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स, सेक्स आणि शिव्यांनी भारंभार असे संवादही आहेत. बऱ्याच जणांना असे चित्रपट कुटुंबाबरोबर पाहताना लाज वाटते अथवा बघणं शक्य होत नाही. तर जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत.

1. ऐतराज (Aitraaz)

top-sexy-erotic-films-of-bollywood-aitraaz
बॉलीवूड स्टार्स प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूरचा हा चित्रपट बोल्ड सीन आणि संवादाने असे भरलेला आहे. या चित्रपटाची कथा थोडी वेगळी असली तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. यामध्ये प्रियांका चोप्राने अशा एका मॉडलची भूमिका साकारली आहे, जी एका श्रीमंत आणि म्हाताऱ्या माणसाशी लग्न करून त्याच्या कंपनीची बॉस होते. त्याच कंपनीमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड काम करत असतो. ज्याच्याबरोबर ती सेक्स करण्याची इच्छा व्यक्त करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयकुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यामध्ये काहीतरी वेगळं प्रकरण असल्याच्या चर्चांना ऊत आला होता आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने त्याला पुन्हा प्रियांकासोबत काम करण्यासाठी मनाई केली होती.

2. फायर (Fire)

ADVERTISEMENT

top-sexy-erotic-films-of-bollywood-fire
दीपा मेहताच्या या चित्रपटाच्या टायटलवरूनच सर्वांना याची कल्पना येते. या चित्रपटामध्ये महिलेच्या शारीरिक गरजांबद्दल सांगण्यात आलं आहे जी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या स्त्री च्या शरीराची मदत घेते. नंदिता दास आणि शबाना आझमी यांनी या चित्रपटामध्ये काम केलं असून हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूपच गाजला होता. या चित्रपटाला खूप विरोधही झाला होता. बऱ्याच प्रेक्षकांना विश्वास बसत नव्हता की, अशा तऱ्हेने कोणता चित्रपट येऊ शकतो. वास्तविक हा चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळवायलादेखील खूप मेहनत घ्यावी लागली होती.

3. 7 खून माफ (7 Khoon Maaf)

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नेहमीच आपला बोल्डनेस दाखवून दिला आहे. प्रियांका चोप्राचा 7 खून माफ हादेखील बॉलीवूडमधील एरॉटिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये काही सीन्समध्ये संपूर्ण कपडे काढून शॉट देण्यात आला आहे. शिवाय या चित्रपटामध्ये प्रियांकाने विवान शाह, अन्नू कपूर, इरफान खान, नसिरुद्दीन शाह आणि नील नितीन मुकेशसारख्या कलाकारांबरोबर अतिशय बोल्ड सीन्स दिले आहेत.

4. डर्टी  पिक्चर (Dirty Picture)

ADVERTISEMENT

dirty picture
विद्या बालन ही एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या सुरुवातीच्या चित्रपटापासून बोल्ड सीन्स दिले आहेत. पण डर्टी पिक्चर हा तिच्या आयुष्यात कलाटणी देणारा चित्रपट ठरला. तिने आतापर्यंत केलेल्या बोल्ड चित्रपटांपैकी हा सर्वात बोल्ड चित्रपट होता. हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहता येणार नाही. यामध्ये दक्षिणेतील बोल्ड अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यातील घडामोडी दाखवण्यात आल्या असून विद्या बालनने नसिरुद्दीन शाहबरोबर बोल्ड सीन्स केले आहेत. जे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर नक्कीच पाहू शकत नाही.

5. रंगरसिया (Rangrasiya)

rangrasiya
रंगरसिया या चित्रपटामध्ये नंदना सेन आणि रणदीप हुडाने अतिशय बोल्ड सीन्स केले आहेत. हा चित्रपट जरी कलेवर असला तरीही नंदना सेनने दिलेले बोल्ड सीन्स हे नक्कीच कुटुंबाबरोबर पाहण्यासारखे नाहीत. यामध्ये रणदीप हुडा आणि नंदना सेन यांनी खूपच जास्त प्रमाणात हे सीन्स दिले आहेत. खरं तर हा चित्रपट एकांतामध्येच पाहण्यासारखा आहे.   

6. गर्लफ्रेंड (Girlfriend)

ADVERTISEMENT

FI-top-sexy-erotic-films-of-bollywood
मलायका अरोराची बहिण अमृता अरोराला जास्त चित्रपट बॉलीवूडमध्ये केले नाहीत. पण जितके चित्रपट केले आहेत त्यापैकी बरेच एरोटिकच आहेत. या चित्रपटापैकी एक गर्लफ्रेंड हा चित्रपटदेखील होता. यामध्ये तिच्याबरोबर ईशा कोपीकरने काम केलं होतं. लेस्बियन रिलेशनशिपवर आधारित हा चित्रपट करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स होते. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली नव्हती. प्रेक्षकांना अजिबात हा चित्रपट आणि त्याचा विषय आवडला नव्हता. पण हा विषय आणि त्यातील दृष्यं ही कमालीची एरोटिक होती हे मात्र नक्की. त्यामुळे कुटुंबातील लोकांसमोर असा चित्रपट नक्कीच पाहता येणार नाही.

7. ख्वाहिश (Khwahish)

top-sexy-erotic-films-of-bollywood-1
बॉलीवूडमध्ये एक वेळ अशी होती की, कंट्रोव्हर्सी क्वीन मल्लिका शेरावतच्या चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहत होते. तिच्या चित्रपटांमध्ये रोमान्स आणि सेक्सव्यतिरिक्त गाणीही चांगली असायची. बॉलीवूड चित्रपट ख्वाहिशमधून मल्लिकाने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटामध्ये मल्लिका आणि हिमांशु मलिकने घेतलेल्या 17 हॉट किसिंग सीन्सची प्रचंड चर्चा झाली होती. या चित्रपटातील सीन्सही प्रचंड एरोटिक होते. मल्लिकाला अशा अवतारात कुटुंबासमवेत पाहणं कोणालाही शक्य नाही.

8. मर्डर (Murder)

ADVERTISEMENT

top-sexy-erotic-films-of-bollywood-murder
मल्लिका शेरावतने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार करत मर्डर हा चित्रपट खूपच प्रसिद्ध केला होता. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर बॉलीवूड (Bollywood) चा सिरीयल किसर इमरान हाशमीदेखील होता. चित्रपटात जेव्हा इमरान आणि मल्लिका असणार तेव्हा अर्थातच चांगल्या सीन्सची अपेक्षा करणं शक्यच नाही. या चित्रपटामध्ये बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन्स होते. या चित्रपटाच्या यशानंतर मर्डर 2 देखील प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिसबरोबर इमरानने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते.

9. जिस्म (Jism)

top-sexy-erotic-films-of-bollywood-jism
बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड (bold) चित्रपटांमध्ये या चित्रपटाचं नाव घेण्यात येतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यावेळी या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. जिस्म या चित्रपटात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमच्या हॉट आणि लव्ह मेकिंग सीन्सचा खूपच गाजावाजा झाला होता. बिपाशाने अनेक बोल्ड सीन्स या चित्रपटामध्ये दिले होते. जे खूपच हिट झाले होते. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वलदेखील काढण्यात आला होता ज्यामध्ये पॉर्नस्टार सनी लिओनने काम केलं. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता.

10. साहेब, बीवी और गँगस्टर (Saheb, Biwi Aur Gangster)

ADVERTISEMENT

top-sexy-erotic-films-of-bollywood-saheb-biwi-aur-gangster
वास्तविक लग्न होण्यापूर्वी कोर्टशिप पीरियडमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण या चित्रपटामध्ये कोर्टशिप पीरियडची भाषाच बदलून टाकली आहे. माही गिलने साकारलेली भूमिका ही सेक्सने अक्षरशः पछाडलेली अशी दाखवण्यात आली आहे. रणदीप हुडा आणि माही गिल दरम्यान चित्रीकरण करण्यात आलेले सीन्स हे अतिशय बोल्ड आहेत. या चित्रपटाचीदेखील बरीच चर्चा झाली होती.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा – 

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

ADVERTISEMENT

आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)

तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास

 

 

ADVERTISEMENT

 

 

14 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT