ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
प्रवासासाठी बेस्ट आहेत ट्रॅकर्स पँट, अशी करा कॅरी

प्रवासासाठी बेस्ट आहेत ट्रॅकर्स पँट, अशी करा कॅरी

प्रवास सुखाचा व्हावा असे वाटत असेल तर प्रवासासंदर्भातील काही हॅक्स हे प्रत्येकाला माहीत असायला हवेत. बॅग कशी पॅक करावी, सामानाचे नियोजन कसे करावे यासोबतच आणि एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रवासाला नेमके कोणते कपडे घालावे. प्रवास जवळचा असो किंवा दूरचा कपड्यांच्या बाबतीत काही गोष्टी या सगळ्यांनी लक्षात ठेवायला हव्यात. प्रवासात घट्ट कपडे घालायला कंटाळा येतो. जीन्स घातल्यानंतर ती का घातली असे का वाटू लागते. प्रवासात स्टायलिश दिसायते आहे आणि घातलेल्या कपड्यांमध्ये आरामदायी वाटावे असे वाटत असेल तर ट्रॅकर्स पँट हा एक उत्तम पर्याय आहे जो कॅरी करणं देखील खूप सोपं आहे. जर तुम्ही अशा पॅंटस घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टायलिंग करु शकता.

समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण

ट्रॅकर्स पँट

Instagraam

ADVERTISEMENT

स्ट्रेट फिट ट्रॅकर्स

स्ट्रेट फिट ट्रॅकर्स हा स्टायलिश असा पर्याय आहे. एखाद्या जीन्सप्रमाणे हा देखील स्ट्रेट फिटचा प्रकार आहे या ट्रॅकर्स अंगालगत जरी असल्या तरी त्या जीन्सप्रमाणे घट्ट वाटत नाही. यामध्ये पाय स्ट्रेच करण्यासाठी खूप जागा असते. याचे कोणतेही वळ शरीरावर उठत नाही. स्ट्रेट फिट ट्रॅकर्स हे तुम्हाला लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही टॉप्सवर घालता येतात. ते खूप सुंदर दिसतात. शिवाय होजिअरी मटेरिअल असल्यामुळे यामध्ये हवाही खेळती राहते. स्पोर्टस शूज किंवा किटोज कोणत्याही चपलांच्या प्रकारावर तुम्हाला घालता येतात. त्यामुळे तुम्ही याची सहज स्टायलिंग करु शकता. घालून झाल्यानंतर यांचे वजनही फार नसल्यामुळे त्या कॅरी करणेही सोपे असते.

बीचवर टॅन व्हायचं नसेल तर अशी घ्या त्वचेची काळजी

लेग फिटेट ट्रॅकर्स

लेग फिटेट ट्रॅकर्स हा प्रकार देखील अनेकांच्य आवडीचा आहे. एकदम स्पोर्टी लुक देणाऱ्या या ट्रॅकर्स पँटचा प्रकार असून या पँटस तुम्हाला एकदम कुल लुक देतात. जर तुम्हाला प्रवासात स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही लेग फिटेट ट्रॅकर्स पँट घालायला काहीच हरकत नाही. लेग फिटेट ट्रॅकर्स पँटच्या बॉटमला एक इलास्टिक असते. त्यामुळे या पँट बॉटमला घट्ट असतात. लेग फिटेट ट्रॅकर्स या स्पोर्टसशूजवर खूप चांगल्या उठून दिसतात.यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग, कोऑरडिएल सेट्स असे प्रकार मिळतात. त्यामुळे तुम्ही अशा लेग फिटेट ट्रॅकर्सची निवड करायला काहीच हरकत नाही.

अशी करा स्टायलिंग

अशी करा स्टायलिंग

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्ही ट्रॅकर्स पँट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टायलिंग करु शकता. 

  • ट्रॅकर्स पँट या लाँग टॉप पेक्षा क्रॉप टॉपवर अधिक उठून दिसतात. क्रॉप टॉपमध्ये फुल हँडचे जे पर्याय असतात असे टॉप निवडा. त्याच्या आत तुम्ही स्पोर्टस ब्रा घातली तर तुम्हाला एक कम्फर्टदेखील मिळते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हालचाल करु शकतात. 
  • ट्रॅकर्स पँट्सवर शूजची निवड ही फार महत्वाची असते. कारण प्रवासात तुम्हाला स्पोर्टस शूज घालणे हे नेहमीच चांगले त्यामुळे तुमची उंचीही चांगली दिसते आणि तुम्हीही उठून दिसता. त्यामुळे तुम्ही स्पोर्टस शूजची निवड करा.
  •  रंगाची निवड ही कोणत्याही ट्रॅकर्ससाठी फार महत्वाची आहे. प्रवासासाठी तुम्ही फिकट रंगाच्या ट्रॅकर्स पँटची निवड करु नका. कारण प्रवासात असे रंग निवडू नका. गडद आणि ब्राईट रंगाच्या ट्रॅक पँटची निवड करा. ते अधिक चांगले दिसतात

आता प्रवासासाठी निघणार असाल तर तुम्ही ट्रॅकर्स पँटची निवड करा.

ब्रेस्ट साईज असेल मोठी तर टाळा हे इनरवेअरचे प्रकार

ADVERTISEMENT
09 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT