कोरोनामुळे गेली दोन वर्ष पर्यटनावर अनेक मर्यादा आल्या होत्या. इच्छा असूनही फिरण्याचा आनंद कोणालाच घेता आला नव्हता. मात्र आता सर्व काही पुन्हा सुरळीत सुरु होत असल्यामुळे अनेकांनी आपले वेकेशेन प्लॅन पुन्हा सुरू केले आहेत. वेकेशनवर जाणं म्हणजे फक्त मनसोक्त भटकंती आणि खादाडी असं नाही. कारण तुम्ही जिथे राहता तिथला अनुभवही तुमच्या प्रवासाचाच एक भाग असतो. सहाजिकच वेकेशनसाठी हॉटेल बूक करताना काही गोष्टी नीट तपासून पाहायला हव्या. कारण तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहा अथवा एखाद्या लोकल होम स्टेमध्ये तिथे काय काय सुविधा तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्हाला हॉटेल बूक करण्यापूर्वी माहीत असायला हवं. यासाठी फॉलो करा या टिप्स
चेकइन आणि चेकआऊट
वेकेशनवर जाताना प्रवास करून थकल्यावर सर्वात आधी हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होणं ही तुमची प्राथमिक गरज असते. मात्र जर तुम्ही बूक केलेल्या हॉटेलचं चेकइन आणि चेकआऊट टाईम नीट पाहिला नसेल तर तुम्हाला रूमध्ये जाण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. रूम क्लिन होईपर्यंत वाट पाहायची नसेल तर या वेळ व्यवस्थित पाळा. त्याचप्रमाणे हॉटेल सोडताना जर तुम्ही चेकआऊटची वेळ पाळली नाही तर तुम्हाला थोडे जास्तीचे पैसे उगाचच मोजावे लागू शकतात. यासाठी हॉटेल बूक करण्यापूर्वी या गोष्टी नीट पाहा आणि त्यानुसार तुम्हाला प्रवास प्लॅन करा.
लोकेशन
हॉटेल बूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही प्रवासात जी पर्यटन स्थळे पाहणार आहात त्या ठिकाणापासून तुमचे हॉटेल अगदी जवळ असेल. नाहीतर तुमचा वेळ हॉटेलमध्ये जाण्यायेण्यातच वाया जाईल. त्यामुळे हॉटेल बूक करताना याचा सर्वात आधी विचार करा.
सोयीसुविधा
हॉटेलच्या वेबसाईटवर तुम्हाला कोणकोणत्या सोयीसुविधा दिल्या जाणार याची माहिती असते. त्यामुळे हॉटेलचे रूम एसी आहेत की नॉन एसी, त्यात वायफाय आहे का, तुम्हाला सकाळाचा नाश्ता कॉम्लिमेंटरी मिळणार आहे का, रूममध्ये चहा, कॉफी आणि इतर सॅनटरी वस्तू असणार का या सर्व गोष्टी नीट तपासा. जर तुम्ही एखाद्या होम स्टेमध्ये राहणार असाल तर या गोष्टी नसतील तर तुमची पंयाईत होऊ शकते. त्यामुळे रूम बूक करण्यापूर्वीच या गोष्टींची चौकशी करा.
100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi
रिव्ह्यू पाहा
हॉटेल बूक करण्यापूर्वी तुम्हाला वेबसाईवर त्या हॉटेलसाठी, रूम्ससाठी, सेवासुविधांसाठी इतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया दिसू शकतात. हॉटेल बूक करण्यापूर्वी त्या प्रतिक्रिया सावधपणे वाचा. कारण यावरून तुम्हाला हॉटेलमध्ये कशी सेवा असेल याचा अंदाज मिळू शकतो. कारण बऱ्याचदा वेबसाईटवरील फोटोवरून पुरेशी माहिती मिळेल याची शक्यता कमी असते. असे रिव्ह्यू वाचून तुम्ही तुमचा निर्णय सहज घेऊ शकता.
ट्रॅव्हल पॅकेज बूक करण्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीकडून जाणून घ्या ही माहिती
रिफंड पॉलिसी
हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण कोरोनामुळे मागील दोन वर्षात अनेकांना त्यांचे वेकेशन प्लॅन अचानक कॅन्सल करावे लागले होते. अशा वेळी हॉटेल बूक करण्यापूर्वीच तुम्हाला कॅन्सलेशन करताना तुमचे नेमके किती नुकसान होऊ शकते हे आधीच माहीत असेल तर योग्य राहिल. यासाठी त्यांची रिफंड पॉलिसी कशी आहे हे नीट जाणून घ्या.
पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेकेशनवर असताना ‘या’ गोष्टी करायलाच हव्या