त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी तुमच्या डेली स्किन केअर रूटिनमध्ये क्लिंझर, मॉईस्चराईझर, टोनर आणि सनस्क्रीन असणं आवश्यक आहे. सकाळी आणि संध्याकाळी स्किन केअर रूटिन फॉलो करणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर न पडणं. कारण सुर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं होणारं नुकसान फक्त सनस्क्रीनमुळेच रोखलं जातं. सनस्क्रीन लावण्यामुळे तुम्हाला सनटॅन, सनबर्नचा त्रास होत नाही. यासाठी सनस्क्रीन नेमकं कधी आणि कसं वापरावं याबाबत काही प्रश्न नेहमीच सतावत असतात. कधी कधी यातून काही समज आणि गैरसमज निर्माण होतात. ज्यामुळे मग सनस्क्रीन लावण्याची टाळाटाळ केली जाते. यासाठीच प्रत्येक महिलेला सनस्क्रीनबाबत या गोष्टी माहीत असायलाच हव्या.
मेकअप करताना सनस्क्रीन लावावं की नाही –
अनेक महिला मेकअप करताना सनस्क्रीनचा वापर करणं टाळतात. कारण त्यांना वाटतं की मेकअप केल्यावर सनस्क्रीनची काहीच गरज नाही. मात्र हा अनेक महिलांमध्ये असलेला एक खूप मोठा गैरसमज आहे. मेकअप करण्याापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे घराबाहेर पडल्यावर प्रखर सुर्यप्रकाशापासून तुमच्या त्वचेचं रक्षण होतं. शिवाय असं केल्यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो.
प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीनची गरज असू शकते का –
होय प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही त्वचेवर सनस्क्रीन लावायला हवं. मात्र अनेकींना असं वाटत असतं की फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन लावायला हवं. ज्यामुळे त्या पावसाळा अथवा हिवाळ्यात सनस्क्रीन लावण्याची टाळाटाळ करतात. आपण भारतात राहतो आणि भारतात कोणत्याही ऋतूमध्ये ऊन हे असतंच. ज्यामुळे त्याच्या प्रखर किरणांचा तुमच्या त्वचेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावणं खूप आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.
अतीप्रमाणात सनस्क्रीन लावण्यामुळे त्वचेचा कॅन्सर होतो का –
सनस्क्रीन बाबत अनेक समज गैरसमज आहेत. त्यापैकीच हा एक मोठा गैरसमज अनेकींमध्ये दिसून येतो. कोणत्याही संशोधनात असं आढळून आलेलं नाही. त्यामुळे मनातील ही शंका बाहेर काढून टाका. संशोधनानुसार सनस्क्रीन लावण्यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होतं. त्यामुळे त्वचेच्या समस्या अथवा असे काही विकार नको असतील तर नियमित सनस्क्रीन लावा.
सावळ्या रंगाच्या लोकांना सनस्क्रीन लावण्याची गरज असते का –
रंग कोणताही असू दे तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची नक्कीच गरज असते. मात्र काही लोकांना गडद अथवा सावळ्या रंगावर सनस्क्रीन लावण्याची गरज नाही असं वाटत असतं. कोणत्याही रंगाच्या व्यक्तीच्या त्वचेवर सुर्यप्रकाशाचा परिणाम होत असतो. त्यामुळे सनबर्न झाल्यास त्वचेवर भाजलेले व्रण उठतात. यासाठीच स्कीन एक्पर्ट सांगतात की प्रत्येक स्कीन टोनच्या व्यक्तीने सनस्क्रीन लावणं नक्कीच आवश्यक आहे.
सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत कोणती-
घराबाहेर पडण्यापूर्वी नियमित या पद्धतीने सनस्क्रीन त्वचेवर लावलं तर तुमच्या त्वचेचं सुर्यप्रकाशापासून नक्कीच संरक्षण होईल
- सर्वात आधी चेहरा, मान आणि हात स्वच्छ धुवा
- त्यानंतर त्वचेला मॉईस्चराईझर लावा
- काही मिनिटांनी मॉईस्चराईझर त्वचेत मुरेल
- त्वचेचा जेवढा भाग सुर्यप्रकाशाच्या सानिध्यात येणार आहे तेवढ्या भागावर सनस्क्रीन लावा
- सनस्क्रीन एसपीएफ 50 पेक्षा जास्त असेल याची काळजी घ्या
- सनस्क्रीन लावल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी घराबाहेर पडा
- जर चार तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
या कारणासाठी मॉईस्चराईझरमध्ये कधीच मिसळू नये सनस्क्रीन