घनदाट, मुलायम आणि बाऊन्सी केस हे अनेकांना आवडतात. प्रत्येक महिलेला असे केस हवे असतात. घनदाट आणि बाऊन्सी केस तुमचे सौंदर्य वाढविण्यास अधिक मदत करतात. तसंच तुम्हाला आत्मविश्वास वाढविण्यासही याचा फायदा मिळतो. अनेक महिला या आपल्या फ्लॅट आणि पातळ केसांमुळे अजिबातच विश्वासाने वागत नाहीत. तसंच त्यांना आपले केस आपल्याला अधिक चांगले दिसत नाहीत असं वाटत राहातं. घनदाट केस मिळावे यासाठी महिला काय काय नाही करत. घनदाट केसांसाठी घरगुती उपायांपासून ते अगदी पार्लरमध्ये जाऊन उपचार घेण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीही केस घनदाट आणि बाऊन्सी दिसत नाहीत. तुम्हीदेखील पातळ केसांपासून त्रस्त असाल तर तुम्ही या मदतीने तुम्ही केस घनदाट आणि बाऊन्सी दाखवू शकता.
हेअर स्टायलिंग दरम्यान ब्लो ड्रायचा करा वापर
पातळ केसांची स्टाईलदरम्यान केस स्ट्रेट केल्यास, केस पातळ आणि चपटे असे दिसतात. पातळ केस अधिक घनदाट दाखविण्यासाठी तुम्ही वेव्ही हेअरस्टाईल (Wavy Hairstyle) अथवा कर्ल हेअरस्टाईल (Curl Hairstyle) केल्यास, तुम्ही अधिक स्टायलिश दिसाल. यामुळे केस अधिक घनदाट दिसतात. केसांना स्टाईल करताना ब्लो ड्रायचा तुम्ही वापर करा. ब्लो ड्राय वापर केल्यास, तुमचे केस अधिक घनदाट आणि बाऊन्सी दिसतात. ब्लो ड्रायमुळे तुमचे केस अधिक व्हेवी लुक देतात आणि तुमच्या केसांना अधिक व्हॉल्युमही दिसतो.
केसांना करा हायलाईट
पातळ केस अधिक घनदाट दाखविण्यासाठी तुम्ही केस अधिक हायलाईट करू शकता. केसांना हायलाईट केल्याने केसांना अधिक व्हॉल्युम दिसतो. केसांना ब्राऊन, कॉफी अथवा कॅरामल रंगाने तुम्ही हायलाईट केल्यास, तुमचे पातळ केस अधिक बाऊन्सी दिसतात आणि त्याशिवाय घनदाट दिसण्याही मदत होते. तसंच तुम्ही अधिक फॅशनेबल आणि आकर्षक दिसता. हायलाईट केसांमुळे तुमच्या केसांच्या पातळपणापेक्षा त्या रंगाकडे अधिक लक्ष वेधलं जातं.
आपल्या केसांचा भांग बदला
बरेचदा सतत एकाच बाजूचा भांग ठेवल्यास अथवा एकाच प्रकारचा भांग ठेवल्याने केस अधिक पातळ आणि चपटे दिसून येतात. काही महिन्यांनंतर तुम्ही केसांचा भांग बदलत राहायला हवा. केसांना तुम्ही वेगळा भांग पाडल्यास केसांचा व्हॉल्युम दिसून येतो आणि केसांचा पातळपणाही दिसून येत नाही. त्यामुळे काही महिन्यांनंतर तुम्ही केसांचा भांग बदलत राहा.
बदलत्या ऋतुनुसार शँपू आणि कंडिशनर बदला
पातळ केसांनी तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही तुमचा शँपू आणि कंडिशनर योग्य आहे की नाही याची आधी पडताळणी करा. तुम्ही आपला शँपू आणि कंडिशनर बदला. बरेचदा एकच शँपू आणि कंडिनशर वापरल्याने तुमचे केस अधिक पातळ आणि चपटे दिसून येतात. त्यामुळे केस धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनरचा वापरही करावा. केसांना कंडिशनर लावल्याने केस अधिक मुलायम आणि बाऊन्सी दिसतात. याचा तुम्ही नियमित वापर करावा. खरं तर तोच तोच शँपू सतत वापरू नये. अन्यथा केस कोरडे आणि निस्तेज होतात. मात्र आपण आपल्या केसांसाठी योग्य शँपू आणि कंडिशनर वापरत आहोत की नाही याचीही पडताळणी करून घ्या.
पातळ केसांना जर बाऊन्सी दाखवायचे असेल तर तुम्ही या टिप्सचा नक्की वापर करा आणि तुम्हाला तुमच्या केसांमध्ये काही बदल दिसून येत आहे की नाही हे आम्हालादेखील टॅग करून नक्की कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक