ADVERTISEMENT
home / आरोग्य
perfect food

गर्भधारणेसाठी करताय प्रयत्न, मग वेळीच बदला आहाराच्या चुकीच्या सवयी

लग्न झाल्यानंतर काही महिन्यात घरी असो अथवा बाहेर असो लहान बाळ कधी येणार असे प्रश्न विचारण्यात येऊ लागतात. गर्भधारणा हा तुमच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही तयार असाल तेव्हाच तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करा. पण जर तुम्ही गर्भधारणेकरिता प्रयत्न करत आहात तर मग त्याकरिता सर्वात आधी तुम्ही जो आहार घेताय त्यातून तुम्हाला पुरेशी पोषकतत्वे मिळत आहेत की नाही हे जाणून घेणे अधिक आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार करता तेव्हा तुम्ही निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. त्याकरिता आपली जीवनशैली, आहार आणि व्यायाम या काही गोष्टी गर्भधारणेत महत्वाची भूमिका निभावतात. मद्यपान, धुम्रपानाचे सेवन टाळणे आवश्यक आहे. प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही डॉ. रिचा जगताप, वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांच्याकडून योग्य आहार जाणून घेतला. तुम्हीही हा लेख नक्की वाचा आणि त्याप्रमाणे आपल्या आहारात बदल करण्याचा प्रयत्न करा. 

अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या

कसा असावा आहार?

–    ताजी फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि बीट, शिमला मिरची यांचे सेवन करा

–    अंकुरीत धान्य, सोयाबीन, पनीर, डाळ, अंडी, मांसाहार अशी उच्च-प्रथिनांचा स्रोत असलेला आहार घ्या

ADVERTISEMENT

–    संतुलित आहार हा नैसर्गिकरित्या सर्व प्रकारची आवश्यक जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे मिळवून देण्यास मदत करेल

–    दररोज मर्यादित प्रमाणात सुका मेव्याचे सेवन करा. कारण सुका मेवा हा अँटीऑक्सिडंट्स समृद्ध स्रोत आहे.

–    पीसीओएस, वंध्यत्व असलेल्या हायपोथायरॉईडीझमसारख्या अंतःस्रावी विकारांनी ग्रस्त रूग्णांचे वजन कमी करण्याचे सुचविले जाते. जरी त्यांनी 5% वजन कमी केले तर त्यांना स्त्रीबीजाचे चक्र योग्यरित्या कार्य करते. या रूग्णांनी 3 मोठे आहार घेण्याऐवजी दिवसातून 5 ते 6 थोड्या-थोड्या प्रमाणात आहार घ्यावा. दररोज 30-45 मिनिटांसाठी व्यायाम करावा आणि पुरेसे पाणी प्यावे. या रूग्णांना व्हिटॅमिन डी पूरक आहार पुरविला जातो कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे गेमेट्सची गुणवत्ता खराब होऊ शकते

–    साखरेची पातळी सामान्य श्रेणीत आहे की याचीदेखील तपासणी करणे आवश्यक आहे. साखरेचे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण मिळते. साखरेचे उच्च प्रमाण हे व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित औषधोपचारांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते

ADVERTISEMENT

–    खाण्या-पिण्यावर पूर्णपणे बंधने न आणता मर्यादित प्रमाणात एखाद्या पदार्थाचे सेवन करण्यास हरकत नाही. आहारातून तेलाचा वापर पूर्णपणे न वगळता तेलाचा मर्यादित प्रमाणात वापर करण्यास हरकत नाही. चांगल्या खाण्याच्या आणि व्यायामाच्या सवयी वेळीच लाऊन घ्या.

अधिक वाचा – गर्भधारणेदरम्यान सुरुवातीच्या काळातच पोटात कळा येण्याची कारणे, तज्ज्ञांचे मत

या पदार्थांचे सेवन टाळाच  

तळलेले, चरबीयुक्त आणि उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ जसे की लाल मांस आणि चीज, तेलकट पदार्थ, लोणी, तूप, मैदा आणि साखर यांचे सेवन कमी प्रमाणात करणे फायदेशीर ठरेल. व्हाईट ब्रेडला ब्राऊन ब्रेडचा पर्याय तर व्हाईट राईसला ब्राऊन राईसचा पर्याय वापरु शकता. चपात्या बनविण्यासाठी मल्टीग्रेन पीठ वापरण्याचा प्रयत्न करा.

अधिक वाचा – जोडप्याने सरोगसीचा पर्याय नक्की कधी वापरावा, जाणून घ्या

ADVERTISEMENT

हे विसरू नका

रोज न चुकता व्यायाम करा. यामुळे योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) राखता येईल. व्यायामाने कॅलरीचेज बर्न करणे शक्य होते. आहार आणि व्यायाम हे दोन्ही घटक प्रजनन क्षमता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात. नुसते बसून राहणे शक्यतो टाळा. दिवसातून किमान पाऊण तास चालण्याचा व्यायाम करा. अन्य कोणताही व्यायाम तुम्हाला करणे शक्य नसले तरीही तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल होऊ देण्यासाठी हा व्यायाम नक्की करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT