मेष- आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा दिवस आहे. दूर गेलेल्या एखाद्या मित्र अथवा प्रेमीची अचानक भेट होईल. बिघडलेले प्रेमसंबंध चांगले होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मनोबल वाढेल. आईवडीलांचा सहवास लाभेल. सायंकाळी घरी एखाद्या खास पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.
कुंभ- आज जमीन कायदेशीर पद्धतीने ताब्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिकबाबतीत समाधानी व्हाल. बिझनेस आणि नोकरीमध्ये उत्कर्ष होईल. पार्टटाईम उद्योगासाठी वेळ काढू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मीन- आळस आणि दुर्लक्ष केल्यास नोकरी संंकंटामध्ये येण्याची शक्यता आहे. चुकीच्या निर्णयाचा बिजनेसवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. एकाग्रता वाढवा. इतरांच्या सहकार्यामुळे यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ- शारीरिक दुखणी डोकं वर काढतील. चिडचिडपणा वाढेल. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. नात्यामधील कडवटपणा कमी होईल. मित्रांच्या सहकार्यांतून बिघडलेली कामे सुधारतील. वाहन चालवताना सावध रहा. आजचा दिवस समाधानाचा असेल.
मिथुन- बेरोजगारांना नोकरी मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. गृहोपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल. नवीन प्रोजेक्ट मिळविण्यात यश मिळेल. जोडीदारासोबत नाते दृढ होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क- एखादी मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्यता आहे.सावध रहा. विनाकारण खर्च करू नका. बोलताना सावध न राहिल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधी त्रास देतील. आत्मविश्वास वाढेल. मानसन्मान मिळेल. व्यवहार करताना सावध रहा. जमा-खर्च संतुलित ठेवा.
सिंह- जुन्या आजारपणातून सुटका होईल. धैर्य वाढवा. वाद-विवादांपासून दूर रहा. खर्चावर नियंत्रण ठेवा.मित्रांवरील राग कमी होईल. लव्ह-लाईफ रोमॅंटिक होईल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.
कन्या- कुंटुबकलहामुळे शारीरिक आणि मानसिक क्लेश वाढेल. कामात व्यस्त व्हाल. चुकीच्या वागणूकीतून जवळच्यांना नाराज कराल. खर्च वाढतील त्यामुळे पैशांची चिंता सतावेल. नवीन योजना सफळ होतील.
तुळ- बिझनेसमधील योजना पूर्ण झाल्याने यश मिळेल. उद्योग वाढेल. धनलाभाचादेखील योग आहे. जमीन अथवा वाहन खरेदीचा संकल्प पूर्ण होईल. आहाराबाबत सावध रहा. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- वडीलांच्या आजारपणामुळे निराश व्हाल. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. मित्राच्या सहकार्यामुळे उद्योगात वाढ होईल. मानसन्मान मिळेल. वरिष्ठांशी सामंजस्य वाढेलय. जोडीदाराशी मतभेद होतील. सावध रहा.
धनु- आज एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. नातेसंबंध मधुर होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.सायंकाळी कुंटुबाला वेळ द्या. कुंटुंबामध्ये मंगल कार्य होण्याची शक्यता आहे.
मकर- शिक्षणात समस्या आल्याने तणाव वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.नवीन कार्यासाठी काळ शुभ नाही. कुंटुंबात गोड बातमी येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबधात दूरावा येईल.