ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ईशाच्या आनंदावर पडणार विरजण…

ईशाच्या आनंदावर पडणार विरजण…

‘तुला पाहते रे (Tula Pahte Re)’ मालिकेत ईशा निमकर ही ईशा विक्रांत सरंजामे होताच तिच्या आयुष्यातील संकटांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसतंय. एकीकडे जालिंदरने ईशाला गाठून विक्रांतबद्दल पुन्हा एकदा सुचित केलं तर दुसरीकडे आपल्या आईबाबांवर आलेल्या संकटापासून ईशा पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

ईशा आणि विक्रांतच्या नात्यात लवकरच येणार ट्वीस्ट

जालिंदरने अखेर ईशाला गाठलंच  

बरेच दिवसांपासून विक्रांतला जी चिंता होती ती अखेर ठरत ईशाच्या पतंगबाजीच्या आनंदावर विरजण पडलंच. ईशा आणि जयदीपने फार्महाऊसवर आयोजित केलेल्या संक्रांतीच्या पतंगबाजीच्या दिवशी जालिंदर ईशासमोर आलाच. ईशाला गाठून जालिंदरने तिला पुन्हा एकदा ‘विक्रांतवर विश्वास ठेऊ नकोस. तो तुझा विश्वासघात करणार आहे. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे’,असं पुन्हा एकदा ईशाला सांगून त्याने घाबरवलंय. विक्रांतसमोरच जालिंदर ईशाला असं सांगून तिथून पळ काढतो. विक्रांतही त्याला पकडण्यात अपयशी ठरतो. या धक्क्याने ईशा बेशुद्ध पडते.

ADVERTISEMENT

विक्रांत पुढे काय करणार ?

जालिंदरने ईशाची भेट घेतल्यामुळे विक्रांत चिंतेत आहे. त्यातच ईशा बेशुद्ध पडल्याने सरंजामे कुटुंबियही काळजीत आहेत. पण एवढ्यावरच न थांबता जालिंदर विक्रांतला फोन करतो आणि ईशाची चौकशी करतो. तसंच सहजासहजी आपण हाती लागणार नाही, असंही सांगून विक्रांतला चिथवतो आणि विक्रांतला मारायची धमकी देतो. विक्रांतही त्याला हिम्मत असल्यास समोर येण्यास सांगतो. ईशाच्या काळजीमुळे विक्रांत बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करतो. पण विक्रांत अजूनही जालिंदरबाबत काय करावं याचा विचार करत आहे.  

विक्रांत आणि ईशा #vikisha च्या लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण

ईशाच्या आनंदावर पडणार विरजण

ADVERTISEMENT

या सगळ्या घटनेनंतर आईसाहेब ईशाला घेऊन देवीच्या दर्शनाला जायचं ठरवतात. तर दुसरीकडे पहिल्या हळदीकुंकूनिमित्त ईशाला राजनंदिनी साडीही देतात. ईशा आनंदाने आईबाबांना हळदीकुंकूवाचं आमंत्रण करण्यासाठी फोन करते. पण ईशाला अजूनही हे माहीत नाही की, तिचे आईबाबा बेघर होणार असून आर्थिक संकटात सापडले आहे. निमकरांनीही ईशाला हे कळू द्यायचं नाही असं ठरवलंय. पण अशाही परिस्थितीत ते आपल्या मुलीच्या पहिल्या हळदीकुंकूच्या निमित्ताने काय भेट देता येईल याचा विचार करत आहेत.

एकंदरच सर्व घडामोडी पाहता सध्या आनंदात असलेली ईशा खरी परिस्थिती कळल्यावर कसा सामना करणार हा खरा प्रश्न आहे. एकीकडे विक्रांतही तिच्यापासून सत्य लपवतोय आणि आईबाबाही तिला न सांगता घर विकून बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही संक्रांत ईशासाठी नक्कीच संकटांची ठरणार असं दिसतंय.

फोटो सौजन्य : Instagram

22 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT