ADVERTISEMENT
home / मनोरंजन
'तुझ्यात जीव रंगला' मधील या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, चाहत्यांना सुखद धक्का

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, चाहत्यांना सुखद धक्का

काहा मालिका आणि त्यातील व्यक्तीरेखा या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. अशाच मालिकांपैकी एक मराठी मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक व्यक्तिरेखा होती ती म्हणजे सखीची. अभिनेत्री ऋचा आपटेने ही व्यक्तिरेखा साकारली होती. राणाला कुस्ती शिकविण्यासाठी आलेली सखी सर्वांनाच आवडली होती. तर आता ऋचाने आपल्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इतकंच नाही तर ऋचाने एक वर्षापूर्वीच साखरपुडा केल्याचे आता समोर आले आहे. अभिनेता क्षितीज दाते याच्यासह ऋचाने साखरपुडा केल्याचे समोर आल्याने आता सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर ऋचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खुषखबर! ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म

‘बन मस्का’ मालिकेच्या सेटवर झाली ओळख

ऋचा आपटे आणि क्षितीज दाते हे दोन्ही चेहरे आता मराठी मालिकांना नवे नाहीत. क्षितीजने मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये साकारलेली गण्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर ठासली गेली आहे. तसंच क्षितीज एक उत्तम दिग्दर्शकही आहे. क्षितीजने मराठी  मालिकेतील साकारलेली विठोबाची भूमिका तर खूपच गाजली होती. आजही त्याला या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षक ओळखतात. तर क्षितीजने अनेक मराठी  दिग्गज कलाकरांबरोबरही काम केले आहे. देवाशपथ, गोंद्या आला रे यातून आपल्या अभिनयाची छाप क्षितीजने प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. बन मस्का या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मागच्यावर्षी साखरपुडा झाला असून आता एक वर्षानंतर ऋचाने फोटो शेअर केला आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षभरात ही खुषखबर गुपितच होती असं म्हणावं लागेल. 

बागी 4 मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

ADVERTISEMENT

ऋचा आणि क्षितीज सध्या दोघेही कामात व्यग्र

ऋचा सध्या अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेतून मुक्ता  ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर क्षितीज लवकरच सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राणी – मात्रचे दिग्दर्शन क्षितीज दातने केले असून. मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही ठिकाणी क्षितीज कार्यरत आहे. ऋचाने याआधीदेखील क्षितीजबरोबर काही फोटो पोस्ट केले असून त्यामध्ये तिने ‘माझा अत्यंत जवळचा मित्र’ असे म्हटले आहे.  मात्र तेव्हा कोणाच्याही लक्षात आले नसावे की, ऋचा आणि क्षितीज हे एकमेकांना डेट करत आहेत. ऋचाने अचानक फोटो  शेअर केल्यामुळे नक्कीच सर्वांना सुखद धक्का बसला आहे.  तर आता ऋचा आणि क्षितीज लग्नगाठ कधी बांधणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. त्यामध्येच आता ऋचा आणि क्षितीजच्या नावाचाही समावेश असणार का असंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत ऋचा वा क्षितीज दोघांपैकी कोणीही वाच्यता केलेली नाही. दरम्यान क्षितीजनेही हाच फोटो शेअर केला असून त्यालाही इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रमैत्रिणींकडून अभिनंदनाचे मेसेज कमेंट्समध्ये मिळत आहेत. आशुतोष गोखले, हृता दुर्गुळे, पियुष रानडे  या सर्वांनीच दोघांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. 

माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री मिळणे नाही,कंगनाला प्रशांत भूषणने दिले असे उत्तर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Feb 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT