2020 हे वर्ष सर्वांसाठीच अत्यंत धक्कादायक होतं. कोरोनाचा कहर तर होताच पण काही असे कलाकार होते ज्यांनी या जगाचा निरोप घेत सर्वांनाच धक्का दिला. अजूनही या धक्क्यातून चाहत्यांना सावरणं कठीण होतंय. याबद्दलच आपण अधिक जाणून घेऊया. कोणतीही कल्पना न देता लहान वयातच हे कलाकार चाहत्यांना धक्का देत या जगातून निघून गेले. त्यापैकी काही कलाकारांच्या बाबतीत तर असा का? हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात सतावत आहे. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
सुशांत सिंह राजपूत
यामध्ये सर्वात पहिलं नाव घ्यावं लागेल ते अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं. 14 जूनला आपल्या राहत्या घरी गळफास घेत सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आणि संपूर्ण जगामध्ये याचे पडसाद उमटले. केवळ 34 वर्ष असणाऱ्या आणि आयुष्यात अत्यंत सफल असणाऱ्या आणि गुणी अभिनेत्याने नक्की इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. त्यानंतर आजपर्यंत सहा महिने होऊनही सुशांतच्या धक्कादायक मृत्यूमुळे सर्वांनाच हे पचवणं जड जात आहे. त्याशिवाय त्याच्या मृत्यूनंतर अनेक जणांवर गडांतर आलेलेदेखील पाहायला मिळालं आहे. सुशांतचा नक्की गळफास लाऊन मृत्यू झाला की तो खून होता यावर अनेक चर्चा रंगल्या मात्र त्यावरील उत्तर सुशांतसह निघून गेले आहे असंच म्हणावं लागेल. मात्र त्यामुळे संपूर्ण बॉलीवूड ढवळून निघालं यात शंका नाही.
दिव्या भटनागर
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेत्री दिव्या भटनागरचाही अचानक गेल्या महिन्यात मृत्यू झाला. कोविड आणि अन्य काही कारणांमुळे दिव्याला आपले प्राण गमवावे लागले. यासाठी तिची जवळची मैत्रीण आणि घरातल्या व्यक्तींनी तिचा पती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या पतीवर अनेक आरोप करण्यात आले असले तरीही त्याने ते आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र दिव्याच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आत तिचा नवरा तिला सोडून गेला होता आणि तिची मानसिक स्थिती अत्यंत हालाखीची होती हे तिच्या जवळच्या व्यक्तींना माहीत होते. मात्र तिचे असे सोडून जाणे सगळ्यांनाच त्रासदायक ठरले.
कोरोनामुळे झाले अभिनेत्रीचे निधन, देवोलीनाची भावूक पोस्ट व्हायरल
आशिष रॉय
‘ससुराल सिमर का’ मालिकेतील अभिनेता आशिष रॉयचे नोव्हेंबरमध्ये किडनीच्या त्रासामुळे निधन झाले. हादेखील चाहत्यांना एक धक्काच होता. आशिष रॉय वयाने लहान होता. त्यामुळे त्याचे असे जाणे बऱ्याच जणांसाठी धक्का होता. तसंच तो अनेक महिने डायलिसिसवर होता आणि पैशाच्या तंगीमुळे रूग्णालयातील बिल्स भरण्यासाठी त्याला त्रास होत होता हेदेखील वास्तव्य आहे. या सगळ्यामुळे कलाकारांच्या अडचणी आणि त्यांना होणारे त्रासही समोर आले. कलाकारांना असणारी तंगी या कोरोनाच्या काळात जास्त दिसून आली. मात्र त्यादरम्यान आशिषसारख्या गुणी अभिनेत्याला प्राण गमवावे लागले.
साठीनंतरही डिंपल कपाडियाचे केस आहेत बाऊन्सी, अशी घेते काळजी
समीर शर्मा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. यापैकी एक नाव म्हणजे अभिनेता समीर शर्मा. 44 वर्षीय समीर शर्माने आपल्या मालाडच्या राहत्या घरी गळफास लाऊन घेतल्याचे समोर आले. समीर शर्माच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र काम नसल्यामुळे आणि पैशाच्या तंगीमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात आले. मालिकांमध्ये काम करणाऱ्या समीरचा मृत्यूही सर्वांसाठीच धक्कादायक होता.
Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग
प्रेक्षा मेहता
25 वर्षीय प्रेक्षा मेहतानेही आपल्या घरी आत्महत्या केली. नैराश्याची शिकार झालेल्या प्रेक्षाने हे टोकाचे पाऊल उचलले. लॉकडाऊनमध्ये अजिबात काम नसल्याने आणि पैशाची तंगी आल्याने प्रेक्षाला आलेले नैराश्य ती सहन करू शकली नाही आणि तिने स्वतःचे आयुष्य संपवले. लाल इश्क आणि क्राईम पेट्रोलसारख्या मालिकांमधून काम केलेल्या प्रेक्षाने आयुष्यात हार मानली आणि जगाला अलविदा केला.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक