2020 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. वर्ष सरता सरता आता पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे टीव्हीवरील आडवत्या जोडप्यांपैकी एक असणारी जोडी पूजा गोर आणि राजसिंह अरोरा ही जोडी वेगळी झाली आहे. 2009 पासून नात्यात असणारी ही जोडी 10 वर्षांच्या आपल्या नात्यानंतर वेगळी झाली असल्याचे आता समोर आले आहे. पूजा गोरने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर सांगितले असून हा निर्णय घेणं अत्यंत कठीण होतं असंही सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वीच ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला होता. आता पूजा आणि राज यांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेत आपल्या व्यक्तीगत आयुष्यात पुढे जाण्याचे ठरवले आहे.
छोट्याशा अफेअरसाठी किती दिवस गळा काढणार – कंगनाचा ऋतिकला सवाल
सोशल मीडियावर व्यक्त केल्या पूजाने भावना
आपण वेगळे होत असल्याचे आणि यासंदर्भात नक्की आपल्या भावना काय आहेत हे व्यक्त करण्यासाठी पूजाने सोशल मीडियाची मदत घेतली आहे. पूजाने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत ही बातमी शेअर केली. तिने एक नोट लिहिली असून त्यात लिहिले, ‘2020 हे वर्ष अनेक बदल घडवून आणणारे होते. चांगलेही आणि वाईटही. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. हा निर्णय घेण्यासाठी खूपच कठीण होता. हा निर्णय घेण्यापूर्वी मला काही वेळ हवा होता. मी आणि राजने वेगळे व्हायचे ठरवले आहे.’ यानंतर पूजाने लिहिले की,‘आयुष्यात काही निर्णय घेणे आणि त्यानुसार वागणे कठीण असले तरीही आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम आणि आदर हा नेहमी तसाच राहील.माझ्या आयुष्यात नेहमीच तो महत्त्वाचा राहिला आहे आणि त्याचं चांगलं व्हावं हीच माझी कायम इच्छा राहिल. आमची मैत्री कायम राहील ती कधीही बदलणार नाही. याबद्दल बोलण्यासाठी मी बराच वेळ घेतला आहे आणि त्यासाठी मला बरेच धैर्यही जमवावे लागले आहे आणि सध्या मला इतकंच सांगायचं आहे. आमच्या खासगी आयुष्याला समजून घेतल्याबद्दल आणि आदर ठेवल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.’
Bigg Boss 14 : राखी सावंत आहे टोटल इंटरटेन्मेंट, राखीबद्दल प्रेक्षकांचे बदलतेय मत
लॉकडाऊनपासूनच झाली होती चर्चांना सुरूवात
लॉकडाऊनदरम्यान पूजा आपल्या आईवडिलांसह वेळ घालवत होती. तेव्हापासूनच पूजा आणि राज वेगळे झाले आहेत अशी चर्चा होती. मात्र दोघांनाही याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. दरम्यान राज यावेळी आपल्या फोटोग्राफीवर लक्ष केंद्रीत करत होता तर पूजाने आपली चित्रकलेची आवड जपत आपले लक्ष वळवले होते. मात्र आता पूजाने स्वतः याबाबत खुलासा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र या दोघांच्या चाहत्यांना नक्कीच यामुळे धक्का बसला आहे. 2021 मध्ये हे दोघं लग्न करतील अशी अनेक चाहत्यांनी नक्कीच आशा केली होती. मात्र आता इतक्या वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र आपली मैत्री कायम तशीच राहील असंही पूजाने सांगितल्यामुळे या जोडीने पुनर्विचार करावा असंही चाहत्यांना वाटत आहे.
प्रियांका चोप्राचं ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू,भेट स्वरूपात मिळालं जिंजरब्रेड हाऊस
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक