ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
types-of-bra-that-can-be-dangerous

तुम्हीही वापरत आहात का अशा ब्रा, करतात तुमच्या त्वचेचे नुकसान

महिलांसाठी गरजेची गोष्ट काय यामध्ये जर एखाद्या गोष्टीचं नाव समाविष्ट करायचे झाले तर त्यामध्ये नक्कीच ब्रा चे नाव घ्यावे लागेल. आपल्या स्तनांना सपोर्ट करण्यासाठी ब्रा बनविण्यात येते. पण बऱ्याचदा आपल्याला जाणवते की, बऱ्याच महिला या चुकीच्या आकाराच्या ब्रा वापरतात अथवा त्यांना आपल्या स्तनांसाठी योग्य आकाराची ब्रा माहीतच नसते. आता तुम्हीच विचार करा की, ज्यांना आपल्या स्तनांसाठी कोणत्या आकाराची आणि प्रकारची ब्रा वापरायला हवी हेच माहीत नसेल त्या आपल्यासाठी योग्य ब्रा कशा प्रकारे निवडू शकतील. बाजारामध्ये पुशअप्स ब्रा (Push Up Bra) पासून ते अगदी स्पोर्ट्स ब्रा (Sports Bra) पर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. अधिकाधिक ब्रा या स्तनांना सपोर्ट देण्यासाठी आणि सध्याच्या स्टाईल लुकनुसार बनविण्यात येतात. पण अशादेखील काही ब्रा आहेत ज्या तुम्ही नियमित घालणे योग्य नाही. या ब्रा चा वापर तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतात. अशा कोणत्या ब्रा आहेत ते आपण जाणून घेऊ. 

अधिक वाचा – स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी – (How To Choose A Bra In Marathi)

झिरो सपोर्ट ब्रा (Zero Support Bra)

एक ब्रा जी योग्य स्वरूपात तुम्हाला फिट होते आणि मान आणि पाठीला योग्य सपोर्ट देऊ शकते. पण तुमचे स्तन जर थोडे मोठे असतील आणि तुम्ही योग्य ब्रा घालत नसाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही योग्य फिटिंगची ब्रा घालणे आवश्यक आहे. तुमच्या मानेला आणि पाठीलादेखील याचा सपोर्ट मिळतो. अन्यथा तुम्हाला मसल्सदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही झिरो सपोर्टची ब्रा नियमित घालू नये.

चुकीच्या आकाराची ब्रा

तुम्ही कोणत्याही प्रकारची ब्रा घेतली तरी त्याची साईज योग्य आहे की नाही हे तपासून पाहायाला हवे. तुमची ब्रा फिटिंगला योग्य हवी हे कायम लक्षात ठेवा. ब्रा जर योग्य फिटिंगची नसेल तर तुमच्या त्वचेला नक्कीच हानी पोहचते. त्वचेवर रॅश येणे, ब्रा घासल्यामुळे खाज येणे अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. तुमची ब्रा मोठ्या आकाराची असेल तर स्तन व्यवस्थित राहू शकत नाहीत आणि घट्ट असेल तर त्वचेला घर्षण होऊन जळजळ होणे आणि खाज येणे अशा समस्या होतात. त्यामुळे तुमची ब्रा योग्य आकाराची असेल याची काळजी घ्या. तसंच तुमचा रक्तप्रवाहदेखील घट्ट ब्रा गोठवू शकते. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!

स्टिकी ब्रा (Sticky Bra)

रोजच्या वापरासाठी स्टिक ऑन ब्रा चा उपयोग करणे अजिबात योग्य नाही. चिकट ब्रा ही ग्लू च्या मदतीने तुमच्या स्तनांना चिकटते. तुमच्या त्वचेला सतत कोणत्याही केमिकलचा वापर होऊ देणे योग्य नाही. स्टिक ब्रा मध्ये असणारे केमिकल हे त्वचेला हानी पोहचवू शकते. त्यामुळे याचा रोज वापर करू नये. तसंच ही ब्रा घातल्यानंतर श्वास घेण्यासही त्रास होतो. त्यामुळे काही काळासाठीच तुम्ही ही ब्रा वापरू शकता. 

काही वेळासाठी अथवा अगदी कोणत्या तरी समारंभासाठी जिथे तुम्ही ऑफशोल्डर गाऊन ड्रेस घालणार असाल तर याचा वापर करणे योग्य आहे. तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही ग्लू, घाम आणि श्वासाला त्रास होणाऱ्या अथवा खाज, रॅशच्या समस्या येणाऱ्या ब्रा घालू नयेत.

अधिक वाचा – Bra-Myths: ब्रा च्या बाबतीत या 9 गोष्टी आहे एकदम चुकीच्या!

ADVERTISEMENT

प्लास्टिक ब्रा 

मागच्या काही काळापासून प्लास्टिक ब्रा ची खरेदी वाढलेली दिसून येत आहे. प्लास्टिक ब्रा अधिक फॅशनेबल आणि आरामदायी मानल्या जातात. पण खरं तर सर्वात खराब ब्रा कोणत्या असतील तर प्लास्टिक ब्रा आहेत. कारण या केवळ असहजच नाही तर या घातल्यानंतर एक वेगळा आवाजही येत राहतो. तसंच ही ब्रा घातल्यावर तुमच्या त्वचेला श्वासही घेता येत नाही. याशिवाय त्वचेला खाज येणे आणि त्वचा लालसर होणे अशा समस्याही होतानाही दिसून येतात. 

तुम्हीदेखील या प्रकारच्या ब्रा चा वापर करणे सहसा टाळण्याचा प्रयत्न करा. जरी अशा ब्रा वापरणार असाल तरी नियमित न वापरता तुम्ही काही काळापुरत्या अथवा कामापुरत्या वापरून काढून टाका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT