ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
नवरात्रीचे उपवास आणि भक्त

नवरात्रीचे उपवास आणि भक्त

उदे गं अंबे उदे भक्तांच्या जल्लोषात आता देवीचा जागर सुरू होईल. निमित्त अर्थातच शारदीय नवरात्राचे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे फारच शुभ मानले जातात. त्यामुळे बहुतेक जण या नऊ दिवसांदरम्यान कडक उपवास करतात आणि विशेष पूजा-अर्चना करतात. असं मानलं जातं की, नवरात्रीदरम्यान उपवास केल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते. पण गंमतीची बाब अशी की, आपल्या आसपास आपण बऱ्याच प्रकारचे लोकं पाहतो, ज्यांची उपवास करण्याची पद्धत अगदीच हटके असते. काहीजण तर उपवासाबाबत खूपच गोंधळलेलेही दिसतात. पण त्यांच्या मनातील भक्तीभाव मात्र स्पष्ट असतो. आम्ही नवरात्रीच्या निमित्ताने अशाच उपवास करणाऱ्यांच्या गमतीजमती सांगणार आहोत. जे तुम्ही आपल्या आसपास नक्कीच पाहिले असतील. मग यंदा नवरात्रीच्या शुभेच्छांसोबतच हा लेखही नक्की शेअर करा.

पहिल्यांदा उपवास करणारे

बरेच जण असे असतात, जे मोठ्या भक्तीभावाने पहिल्यांदा नवरात्रीत उपवास ठेवणार असतात. त्यामुळे त्यांच्या मनात अक्षरशः प्रश्नांची लिस्ट असते. जसं की उपवासाला काय खावं, काय खाऊ नये, याबद्दल ते सतत विचारताना दिसतात. जसं उपवासाच्या दिवसात चॉकलेट खाल्लं तर चालतं का? असा प्रश्न विचारला की, समजून जा तो उपवास करणारा पहिल्यांदा नवरात्रीचे उपवास करत आहे.

सतत भूक लागणारे

काहींना तर उपवासाच्या दिवसातही भूक कंट्रोल होत नाही, असंही पाहायला मिळतं. जे खरंतर नऊ दिवसाच्या व्रतात असतात पण संपूर्ण दिवस काही ना काही खाताना दिसतात. एवढंच नाहीतर खास उपवास मेन्यू शोधणे आणि त्याचा आनंदही घेताना दिसतात. जसं उपवासाची थाळी, लस्सी, चिप्स इ.

पुढे-मागे उपवास करणारे

नवरात्री हा नऊ दिवसांचा सण असतो. त्यामुळे साहजिकच नऊ दिवस उपवास असतात. पण काहीजण अशी असतात जी फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. ज्याला घट बसताना आणि उठताना उपवास करणे असं म्हणतात.

ADVERTISEMENT

वजनासाठी उपवास करणारे

काहीजण एकाच निशाण्यात दोन काम करणारे असतात. जसं देवाचे उपवासही होतील आणि त्यामुळे वजनही कमी होईल असा विचार करणारे. ज्यांचा मुख्य हेतू हा वजन कमी करणे हा असतो. पण त्यांना एका गोष्टीचा साफ विसर पडतो की, नऊ दिवसानंतर हे रूटीन फॉलो केलं नाहीतर वजन तर वाढणारच आहे. नाही का?

खाऊन-पिऊन उपवास करणारे

असे उपवास करणारे खरंच खास टाईपचे असतात. जे उपवास करतातही आणि करत नाहीत. हो… जसं सामिष जेवण आणि कांदा-लसूण सोडून सर्व काही खाणारे व तरीही स्वतःला उपवास करतो म्हणून घेणारे. तुमच्या पाहण्यात आलंय का असं कोणी?

सदैव गोंधळलेले असणारे

काहीजण प्रत्येक बाबतीत गोंधळलेले असतात मग उपवास त्याला अपवाद कसा असेल. प्रत्येक बाबतीत आईबाबांना विचारणे की, उपवासाला हे चालेल का? एवढंच नाहीतर उपवास ठेवण्याआधी आणि नंतरच्या बाबतीतही त्यांचा गोंधळ असतो. जसं पूर्ण 9 दिवस उपवास करावा की नाही.

आदर्शवादी उपवास करणारे

उपवास करणाऱ्यांमध्ये काहीजण अगदीच आदर्शवादी असतात जे प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नियमाने फॉलो करत असतात. जशी काही तरूण मंडळी खरंच मनोभावे नवरात्रीच्या उपवासाचं व्रत करतात आणि त्यांना आम्ही आदर्शवादी उपवास करणारे असं म्हणतो.

ADVERTISEMENT

उपवासाचे पदार्थ आवडणारे

नवरात्रीचे उपवास काहीजण उपवासाचे पदार्थ आवडतात म्हणूनही करताना दिसतात. ज्यांना उपवासाची प्रत्येक डिश आवडते. कारण त्यांना इतर जेवणापेक्षा हे सात्विक जेवण फारच आवडतं. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात तुम्हाला असेही उपवास करणारे दिसतील.

ज्ञान पाजळणारे

काहींना आपलं ज्ञान वेळोवेळी पाजळायची फार सवय असते. मग ते उपवासाच्या बाबतीत कसे मागे राहतील. कारण ते प्रत्येक बाबतीत लोकांना ज्ञान देतच असतात. जसं उपवासाला साबुदाणा खावा की नाही, उपवास करणाऱ्यांनी काय करावं काय करू नये.

मग आहेत ना उपवास करणाऱ्यांच्या गमतीजमती मजेदार. ते काहीही असो या सर्वांसोबत मनात देवीची भक्ती असणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण मनातील भाव हेच आपल्या देवाला जास्त महत्त्वाचे असतात. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.

05 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT