गणपती म्हटलं की त्याच्या नेवैद्याला उकडीचे मोदक हे असायलाच हवेत. वर्षभर हे उकडीचे मोदक मिळण्यासाठी कितीतरी जण बाप्पाची वाट पाहात असतात. कारण बऱ्याच घरांमध्ये गणपतीला खास उकडीचे मोदक केले जातात. बाप्पाला प्रिय असणारे हे उकडीचे मोदक सर्वांना जमतातच असं नाही. त्याची खास रेसिपी आम्ही ‘POPxo मराठी’च्या वाचकांसाठी देत आहोत. उकडीचे मोदक करताना तांदळाच्या पिठाचे प्रमाण आणि उकड कशी काढायची हे गणित अत्यंत महत्त्वाचे आहे. ते एकदा जमले की तुम्हाला फक्कड उकडीचे मोदक करता येतील. त्याचा आकार बनवणे हीदेखील एक कलाकृतीच आहे. त्यामुळे त्याचा जितका सराव कराल तितका तुम्हाला चांगला मोदक बनवता येईल. यावर्षी तुम्हीही घरी करून पाहा उकडीचे मोदक आम्ही मराठीत दिलेली ही रेसिपी वाचून. चला तर वेळ नका दवडू. लागा कामाला. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ यासाठी लागणारे साहित्य
साहित्य
उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य
- अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ
- 2 ग्लास पाणी
- चवीपुरते मीठ
- तूप
- तेल (उकड मळण्यासाठी तेल जास्त प्रमाणात लागते. तसंच मोदक बनवताना पाकळ्या करतानाही हाताला तेल लावावे लागते)
झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)
सारणासाठी लागणारे साहित्य
- एक नारळ
- पाव किलो गूळ
- खवा (आवडीनुसार)
- वेलची पावडर
- सुका मेवा
कृती
उकड काढण्यासाठी कृती
- आंबेमोहर तांदूळ धुऊन सुकत घालावा
- सुकल्यावर त्याचे पीठ करून घ्यावे
- 2 ग्लास पाणी उकळत ठेवावे
- तितकेच तांदळाचे पीठ घ्यावे
- पाण्याला अर्धवट उकळी आली की तांदळाचे पीठ त्यात घालावे आणि ढवळावे. त्यात थोडं तूप घालावं
- झाकण ठेऊन त्याला वाफ काढावी
- व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर परात घ्यावी त्यात ही गरम तांदळाची पिठी काढून तेल लाऊन मळावी
- उकड गरम असतानाच मळावी तरच मोदक चांगले होतात
- हाताला तेल लावा आणि मोदकची पारी करायला घ्या
- त्याची पारी करून त्यात सारण भरावे
- मोदकाच्या सुबक पाळ्या करून हे मोदक मोदकपात्रात साधारण 20 मिनिट्स वाफवावेत
- गरम मोदक तूप घालून खायला द्यावे
रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)
सारणाची कृती
- नारळ खवणून घ्यावा
- खोबऱ्याचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घेऊन हलक्या हाताने नारळ खवणावा
- गूळ बारीक चिरून घ्यावा
- खोबरं आणि गूळ एकत्र मंद गॅसवर भाजावे आणि सारण तयार करावे
- तुम्हाला खवा आवडत असल्यास यात खवा घालावा
- सारण तयार होत आल्यावर वेलची पावडर घालावी
- आवडत असल्यास सुका मेवा अर्थात काजू, बदाम, बेदाणा घालावे
टीप –
- उकडीचे मोदक करण्यासाठी आंबेमोहोर तांदूळ वापरावा. हा चिकट होत नाही.
- हळदीच्या पानात मोदक उकडवल्यास, त्याची चव छान लागते
- मोदकपात्र किमान पाच मिनिट्स आधी पाणी ठेऊन गॅसवर ठेवावे
- मोदकपात्रात चाळण ठेऊन त्यामध्ये केळीचे पान घालावे त्यावर तेल लावा आणि मगच मोदक आत ठेवा. असं केल्याने
- मोदक चिकटत नाहीत आणि केळीच्या पानाचा स्वादही त्याला सुंदर येतो
- गर्दी करून मोदक ठेऊ नका. सुटसुटीत ठेवा जेणेकरून तांदळाची काढलेली उकड व्यवस्थित शिजेल आणि खाताना घशाला चिकटणार नाही
- खवा घातल्यास, सारणाचा स्वाद अधिक चांगला होतो
You Might Like These:
अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज (Smoothie Recipe In Marathi)
घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याची रेसिपी (Panipuri Recipe In Marathi)
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा